पंतप्रधान, नरेंद्र मोदी आसाम येथील गुवाहाटीमध्ये आयोजित जागतिक गुंतवणूक परिषद २०१८ च्या उद्घाटन समारंभाला उद्या संबोधित करतील.
या दोन दिवसीय शिखर परिषदेला आसाम शासनाने सर्वात मोठा गुंतवणूक आणि सुलभीकरण उपक्रम म्हणून घोषित केले असून परिषदेचा आसाममधील गुंतवणूकदारांना भू- धोरणात्मक फायद्या संबंधी उपलब्ध संधी दर्शविणे हा या मागचा उद्देश आहे. हा कार्यक्रम दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियामधील वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी निर्यात-आधारित उत्पादन आणि सेवांच्या दृष्टीने उत्पादक वृत्ती वाढविणे या राज्य सरकारच्या दृष्टिकोनाचे प्रदर्शन करेल.
ऊर्जा, कृषी व अन्न प्रक्रिया, आयटी आणि आयटीईएस, नदी वाहतूक आणि बंदर टाउनशिप, प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल्स, फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल उपकरणे, हातमाग, वस्त्रोद्योग आणि हस्तकला, पर्यटन, आतिथ्य , नागरी विमानवाहतूक आणि पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस या गोष्टींवर भर दिला जाईल.