बिहारमधील चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष समारोप कार्यक्रम उद्या होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून स्वच्छाग्रहींना मार्गदर्शन करणार आहेत.
चंपारण सत्यागृहाच्या शताब्दी वर्ष समारोपाचा कार्यक्रम उद्या मोतीहारी येथे होणार आहे. या कार्यक्रमात देशभरातून 20 हजार स्वच्छताग्रही म्हणजेच स्वच्छतादूत सहभागी होणार आहेत. ग्रामीण स्तरावर उघड्यावर शौच केले जाऊ नये म्हणून शौचालयाचे स्वच्छतागृहाचे महत्त्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या स्वच्छताग्रहींनी खूप चांगली प्रभावी भूमिका बजावली आहे. त्याच्या कार्यामुळे अनेक गावांमध्ये उघड्यावर केले जाणारे शौच पद्धत आता बंद झाली आहे. शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच दि. 10 एप्रिल 2017 रोजी महात्मा गांधी यांनी चंपारण सत्याग्रहाला प्रारंभ केला होता. या सत्याग्रहाद्वारे महात्मा गांधी यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी ब्रिटीश राजसत्तेविरुद्ध लढा पुकारला होता. दि. 10 एप्रिल 2018 रोजी चंपारण सत्याग्रहाचे शतक महोत्सव वर्ष संपणार आहे. त्याचे औचित्य साधून ‘सत्याग्रह ते स्वच्छतागृह” ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ करणार आहे.