पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे 9 एप्रिलला नवी दिल्लीत विज्ञान भवनात सीपीएसई परिषदेला संबोधित करणार आहेत.
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आणि विविध मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.सीपीएसई मधल्या उत्तम प्रथा यावेळी मांडल्या जातील.
कॉर्पोरेट प्रशासन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, नव कल्पकता या संकल्पनावर आधारित सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला संबोधित करतील.