पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑगस्ट, 2021 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वार्षिक बैठक 2021ला संबोधित करणार आहेत. ‘इंडिया@75:गवर्नमेंट अँड बिजनेस वर्किंग टूगेदर फॉर आत्मनिर्भर भारत’ हा बैठकीचा विषय आहे.
सीआयआय वार्षिक बैठक 2021 बाबत माहीती :
सीआयआयची वार्षिक बैठक 2021 दोन दिवसांसाठी 11-12 ऑगस्टला आयोजित केली जाणार आहे. या बैठकीला विशेष आंतराराष्ट्रीय अतिथी वक्त्याच्या रुपात सिंगापूरचे उप पंतप्रधान आणि आर्थिक धोरणां संबंधित समन्वय मंत्री श्री हेंग स्वी कीत संबोधित करतील. या बैठकीत अनेक सन्माननीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ञ आणि भारतीय उद्योग जगतातील प्रमुख प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.