पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील 15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे आयोजित दसरा उत्सवात सहभागी झाले .
लव्ह-कुश रामलीला समितीद्वारे आयोजित रामलीलाही यावेळी पंतप्रधानांनी पाहिली. वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवण्यासाठी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या भव्य पुतळ्यांचे दहनही या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद व इतर मान्यवर उपस्थित होते.