पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंगेरीचे पंतप्रधान महामहिम व्हिक्टर ऑर्बन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि तात्काळ शस्त्रसंधी आणि मुत्सद्देगिरी आणि संवाद पुनर्स्थापित करण्याच्या आवश्यकतेवर सहमती दर्शविली.
युक्रेन-हंगेरी सीमेवरून 6000 हून अधिक भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी महामहिम ऑर्बन आणि हंगेरी सरकारचे मनापासून आभार मानले. युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान ओर्बन यांनी शुभेच्छा दिल्या आणि हंगेरीमध्ये त्यांना पुढील शिक्षण सुरू ठेवण्याची इच्छा असेल तर ते सुरु करू शकतात असे सांगितले. या उदार आश्वासनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी सद्यस्थितीत संपर्कात राहण्याचे आणि संघर्ष संपवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्याबाबत सहमती दर्शवली.