पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सरकारच्या 80 अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांशी संभाषण केले. हे ठरविलेल्या 5 संभाषणांपैकी तिसरे असून, याद्वारे संबंधित अधिकाऱ्यांचे मत, अभिप्राय, अनुभव पंतप्रधान जाणून घेत असतात.
आजच्या संभाषणात कृषी, पेयजल, नागरी मध्यवर्ती प्रशासन, सरकारमध्ये एकत्रित कामाच्या प्रक्रियेला प्रोत्साहन, प्रकल्प अंमलबजावणी, शिक्षण निर्मिती, अंतर्गत सुरक्षा आणि सौरऊर्जा या विषयांवर पंतप्रधानांनी उपस्थित सचिवांची मते जाणून घेतली.
या वेळी बोलतांना पंतप्रधानांनी प्रकल्प समन्वयनासाठी ‘प्रगती’ला प्राथमिकता देत असल्याचा उल्लेख केला. निर्मितीसंदर्भात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतातील इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीतील इको सिस्टीमद्वारे आता वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीवर प्रकाश टाकण्यात यायला हवा.
पंतप्रधानांनी सरकारमध्ये सकारात्मक कार्यपद्धतीचे वातावरण असायला हवे, यावर भर देतांना सांगितले की, कार्यस्थळ हा संघटनात्मक उद्योग आहे. ते पुढे म्हणाले की, एकदा नवीन कायदे अस्तित्वात आल्यानंतर जुन्या कायद्यांचे परिक्षण करुन, नको असलेले कायदे काढुन टाकण्यात येतील. सध्या भारताला जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगतांना पंतप्रधानांनी सचिवांना वर्ष 2022 पर्यंतच्या नवीन भारताच्या निर्मितीमध्ये विशिष्ट उद्देश ठेऊन कार्य करण्याचे आवाहन केले.
त्यांनी अधिकाऱ्यांना भारतातील सर्वाधिक मागासलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे ते जिल्हे विविध विकासात्मक मापदंडाद्वारे राष्ट्रीय सरासरी पातळीपर्यंत पोहोचू शकतील, असे सांगितले.