पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.
श्री किम यांनी भारताच्या व्यापार सुलभीकरणातील ऐतिहासिक झेपेबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, १.२५ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाने केवळ मागील चार वर्षात, ६५ स्थानापर्यंत मजल मारली हि एक उल्लेखनीय बाब आहे.
किम पुढे म्हणाले कि, पंतप्रधान मोदींची , विश्वासू बांधिलकी आणि नेतृत्वामुळे हे मोठ्या प्रमाणावर शक्य झाले. त्यांनी या यशाचे ऐतिहासिक, अभूतपूर्व असे वर्णन केले. श्री. किम यांनी पंतप्रधानांना अलीकडेच ‘यूएनईपी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड ‘ आणि सेऊल शांतता पुरस्काराने सन्मानित केल्याची आठवण केली आणि त्यांचे अभिनंदनही केले .
श्री. किम यांनी, भारताने, व्यवसायातील सुलभिकरणात घेतलेल्या पुढाकारात जागतिक बँकेचा सदैव निश्चयी पाठिंबा राहील असे. आश्वासन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष श्री किम यांचे बँकेने निरंतर केलेल्या मार्गदशनासाठी आणि पाठिंब्यासाठी आभार मानलेत. बँकेचे हे मार्गदर्शन म्हणजे भारताला सातत्याच्या व्यावसायिक सुलभीकरणात एक प्रेरणा स्रोत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.