QuotePM’s statement prior to his departure to Sweden and UK

स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन दिले आहे.

भारत-नॉर्डिक परिषद आणि राष्ट्रकुल देश आणि त्यांच्या सरकारी प्रमुखांच्या बैठकीसाठी मी 17-20 एप्रिल 2018 दरम्यान स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर जात आहे.

17 एप्रिलला मी स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्या आमंत्रणावरुन स्टॉकहोमला जाणार आहे. स्वीडनचा हा माझा पहिलाच दौरा आहे. भारत आणि स्वीडन या दोन्ही देशांमध्ये चांगली मैत्री आहे. आमची भागीदारी लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. खुल्या, सर्वसमावेशक आणि नियमाधारित जागतिक व्यवस्थेसाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. दोन्ही देशांमधल्या आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी मला आणि पंतप्रधान लॉफवेन यांना मिळणार आहे. व्यापार आणि गुंतवणूक, नावीन्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कौशल्य विकास, स्मार्ट शहरे, स्वच्छ ऊर्जा, डिजिटाइझेशन आणि आरोग्य या संदर्भातील सहकार्यासंदर्भात भविष्यातल्या आराखड्याची आखणी आम्ही करणार आहोत. स्वीडनचे राजे आदरणीय कार्ल 16 वे “गुस्ताफ” यांचीही मी भेट घेणार आहे.

भारत आणि स्वीडन यांनी संयुक्तपणे फिनलँड, नॉर्वे, डेन्मार्क आणि आईसलॅण्ड या देशांच्या पंतप्रधानांसमवेत 17 एप्रिलला भारत-नॉर्डिक परिषद स्टॉकहोम येथे आयोजित केली आहे. स्वच्छ तंत्रज्ञान, पर्यावरणीय मार्ग, बंदर आधुनिकीकरण, शीत साखळी, कौशल्य विकास आणि नावीन्यता यातील नैपुण्यासाठी नॉर्डिक देश जगभरात ओळखले जातात. नॉर्डिक स्पर्धात्मकता भारताच्या परिवर्तनासाठीच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुयोग्य आहे.

पंतप्रधान थेरेसा मे यांच्या आमंत्रणावरुन मी 18 एप्रिल 2018 ला लंडनला जात आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये मी युनायटेड किंगडमला भेट दिली होती. दृढ ऐतिहासिक संबंधांबरोबरच भारत आणि इंग्लंडमध्ये आधुनिक भागीदारीचे बंधही आहेत.

माझ्या लंडन दौऱ्यामुळे वाढत्या द्विपक्षीय भागीदारीला नव्याने गती मिळण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आरोग्य, नाविन्यता, डिजिटाइझेशन, विद्युत वाहने, स्वच्छ ऊर्जा आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात दोन्ही देशांमधले सहकार्य वृद्धिंगत करण्यावर मी लक्ष्य केंद्रीत करणार आहे. “लिविंग ब्रिज” या संकल्पनेंतर्गत, भारत आणि इंग्लंडचे संबंध समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या लोकांना भेटण्याची संधी मला मिळणार आहे.

मी आदरणीय महाराणींना भेटणार आहे. आर्थिक भागीदारीच्या नव्या विषयपत्रिकेवर काम करणाऱ्या दोन्ही देशातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मी भेट घेणार आहे. लंडनमध्ये आयुर्वेदिक गुणवत्ता केंद्राचा प्रारंभ करणार आहे आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत नवा सदस्य म्हणून युनायटेड किंगडमचे स्वागत करणार आहे.

युनायटेड किंगडमच्या यजमानपदाखाली 19 आणि 20 एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत मी सहभागी होणार आहे. विकसनशील सदस्‍य देशांना विशेषत: छोटे देश आणि छोट्या विकसनशील बेटांच्या सदस्य देशांना राष्ट्रकुलचा वैशिष्ट्यपूर्ण मंच अत्यंत उपयुक्त साहाय्यता पुरवतो. तसेच विकासाच्या मुद्यांवर आवाज उठवणारा तो खंबीर आंतरराष्ट्रीय मंच आहे.

स्वीडन आणि युनायटेड किंगडमचा हा दौरा या देशांबरोबरचा संबंध द्विगुणित करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India Doubles GDP In 10 Years, Outpacing Major Economies: IMF Data

Media Coverage

India Doubles GDP In 10 Years, Outpacing Major Economies: IMF Data
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 मार्च 2025
March 23, 2025

Appreciation for PM Modi’s Effort in Driving Progressive Reforms towards Viksit Bharat