नेपाळ दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन खालीलप्रमाणे आहे.
“नेपाळचे पंतप्रधान माननीय के.पी.शर्मा ओली यांच्याकडून आलेल्या निमंत्रणानुसार मी 11 आणि 12 मे 2018 रोजी नेपाळला भेट देण्यासाठी जात आहे. पंतप्रधान म्हणून माझी ही तिसरी नेपाळ भेट आहे. नेपाळबरोबर भारताचे असलेले जुने ऋणानुबंध आणि प्रगाढ मैत्रीचे धागे माझ्या कारकिर्दीतही अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होते. त्याचबरोबर नेपाळच्या दृष्टीने भारताला असलेले महत्वही अधोरेखित होते.
गेल्या महिन्यात पंतप्रधान ओली यांनी भारत दौरा केला होता. आता माझा नेपाळ दौरा म्हणजे त्याचाच पुढचा भाग आहे. माझ्या सरकारने ‘आधी शेजारधर्म’’’ हे धोरण नेहमीच पाळले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उभय देशात उच्चस्तरीय चर्चा नियमितपणे होत आहेत. आपल्या सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसारच भारत वाटचाल करत आहे.
गेल्या काही वर्षात दोन्ही देशांनी संयुक्तपणे काही प्रकल्पांचे काम केले आहे. काही प्रकल्पांचे कार्य प्रगतीपथावर आहे. आम्ही दोन्ही देशातील जनतेच्या लाभासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी पावले उचलली आहेत.
अलिकडेच नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान ओली आणि माझ्यामध्ये उभय देशांच्या दृष्टीने हितावह असणाऱ्या अनेक विषयांवर अतिशय विस्तृत चर्चा झाली आहे. आणि आता या चर्चेतून सहकारी भागीदारीतून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल.
काठमांडूबरोबरच या दौऱ्यात मी जनकपूर आणि मुक्तीनाथ येथे भेट देण्यासाठी उत्सुक आहे. या दोन्ही स्थळांना दरवर्षी खूप मोठ्या संख्येने भाविक भेट देत असतात. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये अतिशय प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि धार्मिक ऋणानुबंध खूप मजबूत आहेत, याची साक्ष दोन्ही शहरांमुळे आपल्याला मिळते.
नेपाळ आता एका नवीन युगात प्रवेश करतोय. सर्वंकष लोकशाहीचा फायदा या देशाला मिळत आहे. त्यामुळे नेपाळची प्रगतीही वेगाने होत आहे. नेपाळ सरकार “समृद्ध नेपाळ, सुखी नेपाळ” हे लक्ष्य समोर ठेवून सर्व क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांचे हे लक्ष्य गाठण्यासाठी भारत एक शेजारी मित्र राष्ट्र म्हणून नेपाळच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे.
नेपाळमधल्या राजकीय नेत्यांची आणि स्नेह्यांची भेट घेण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या या नेपाळ दौऱ्यामुळे उभय देशातले ऋणानुबंध, मैत्री अधिक सुदृढ होईल. माझा हा दौरा उभय देशांना लाभदायक ठरेल असा विश्वास मला आहे”.
I will be visiting Nepal on 11th and 12th May at the invitation of PM Mr. KP Sharma Oli. This visit reflects the high priority India attaches to friendly relations with Nepal. I will be holding extensive talks with PM Oli on ways to further deepen bilateral cooperation.
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2018
Apart from Kathmandu, there would be visits to Janakpur and Muktinath during this Nepal visit. These are vibrant centres of pilgrimage and tourism. They are also testimony to the strong cultural ties that bind our nations.
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2018
As Nepal enters a new era of consolidating the gains of a democracy and achieving economic growth, India remains a steadfast parter of the Nepal Government to implement their vision of ‘Samriddha Nepal, Sukhi Nepali.' https://t.co/EJvRwsmRBw
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2018