कझाकस्तान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले वक्तव्य पुढीलप्रमाणे :-
“कझाकस्तानमध्ये अस्ताना येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मी 8 आणि 9 जून असे दोन दिवस दौऱ्यावर जात आहे.
या बैठकीत प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारत शांघाय सहकार्य संघटनेचा पूर्ण सदस्य होईल त्यामुळे संघटनेचे भारताचे मानवी प्रतिनिधीत्व 40 टक्के तर जागतिक सकल उत्पादनातील प्रतिनिधीत्व 20 टक्के इतके राहील.
गेल्यावर्षी शांघाय सहकार्य संघटनेच्या ताश्केंत येथे झालेल्या बैठकीत पूर्ण सदस्यत्वाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पूर्ण सदस्यत्वामुळे आर्थिक, जोडणीविषयक आणि दहशतवादाची लढा देण्यासंदर्भातील सहकार्य वृध्दिंगत होईल, असा विश्वास मला वाटतो.
शांघाय सहकार्य संघटनेतील सर्व सदस्यांचे भारताशी दीर्घकालीन संबंध आहेत आणि परस्परांची भरभराट तसेच संबंधित देश आणि तेथील नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने हे संबंध अधिक परिपक्व होतील.
द्विपक्षीय सहकार्याच्या लाभदायक अशा नव्या संधी आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्या क्षमतेनुसार सामाईक आवाहनाचा मुकाबला करणे शक्य होईल.
9 जूनच्या संध्याकाळी “भविष्यातील ऊर्जा या संकल्पनेवर आधारित अस्तांना प्रदर्शनाच्या उद्घाटनालाही मी उपस्थित राहणार आहे”.
Will join the SCO Summit in Astana. Here are more details. https://t.co/wgoxLH8b5e
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2017