दि. 29 ऑक्टोबर, 2019 रोजी मी एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी सौदी अरेबियाची यात्रा करीत आहे. ही भेट सौदी अरबचे शाह सलमान बिन अब्दुल अजीज अल-सऊद यांच्या निमंत्राणानुसार रियाद येथे आयोजित केली आहे. या भेटीत भविष्यात करावयाच्या गुंतवणुकीविषयी उभय देशांमध्ये महत्वपूर्ण चर्चा सत्रे पार पडणार आहेत.
रियाद भेटीच्या दरम्यान, मी सऊदी अरेबियाचे शाह यांच्याबरोबर व्दिपक्षीय चर्चा-मसलत करणार आहे. मी सऊदी अरेबियाचे राजे एचआरएच मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबरच्या आपल्या बैठकीमध्ये व्दिपक्षीय सहकार्याव्यतिरिक्त एकमेकांच्या हिताचे क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्यांविषयी अनेक प्रश्नांवर विचार -विनिमय करणार आहे.
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ आणि मैत्रिपूर्ण आहेत. भारताला आवश्यक असलेल्या ऊर्जेची पूर्तता सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणावर होते. ऊर्जा क्षेत्रात भारताचा अतिशय विश्वासू साथीदार हा देश आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये सौदी अरेबियाचे राजांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी भारतामध्ये प्राथमिक क्षेत्रात 100 बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यासाठी आपला देश कटिबद्ध असल्याचे नवी दिल्ली इथं स्पष्ट केले होते.
संरक्षण, सुरक्षा, व्यापार, संस्कृती, शिक्षण आणि लोकांचा एकमेकांमध्ये थेट संपर्क यासारख्या विषयामध्ये सौदी अरेबियाबरोबर व्दिपक्षीय सहयोग आणि इतर महत्वपूर्ण क्षेत्रांविषयीचे सहकार्य करार करण्यात येणार आहेत.
या यात्रेच्या काळात सामरिक सहकार्य परिषदेच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात येईल. भारत-सौदी अरेबिया यांच्यात सामरिक भागीदारीला एका नवीन स्तरापर्यंत पुढे नेण्यात येईल.
या तिस-या भविष्यकालीन गुंतवणुकीसंबंधी होत असलेल्या बैठकीविषयी मला खूप आशा आहेत. तिथे मी, जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांना आणि व्यापारी वर्गाला भारतामध्ये असलेल्या अमर्याद संधीविषयी वार्तालाप करणार आहे. कारण 2014 पर्यंत भारताला आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची बनवायची आहे, त्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे.