राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेची आज सांगता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.
या परिषदेदरम्यान दिलेल्या विविध सूचनांबद्दल पंतप्रधानांनी राज्यपालांचे आभार मानले.
भारतात कल्पना स्रोत आणि क्षमतांची कमतरता नाही. मात्र, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे काही राज्ये विकासाच्या गतीत मागे पडली आहेत असे पंतप्रधान म्हणाले. ज्या राज्यात सुप्रशासन आहे तिथे गरीबांच्या कल्याणासाठी असलेल्या सरकारी योजनांची उत्तम अंमलबजावणी सुरु आहे असे सांगत त्यांनी राज्यपालांनीही सरकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्या यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
भारताची एकता आणि अखंडता अधिक बळकट करण्यासाठी राज्यपालांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” आणि “रन फॉर युनिटी” अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असेही पंतप्रधान म्हणाले.