We have extensive cooperation with SCO nations. We want to deepen the focus on connectivity: PM
Terrorism is a major threat to humanity: PM Narendra Modi at SCO Summit
SCO can devote attention towards climate change: PM Modi

महामहिम राष्ट्राध्यक्ष,नूरसुलतान नजरबाएव्ह,
शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य आणि निरीक्षक,
शांघाय सहकार्य संघटनेचे महासचिव,
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव,
आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख,
महामहिम,
महिला आणि पुरुषवर्ग,
शांघाय सहकार्य संघटनेच्या सफल नेतृत्वाबद्दल मी सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष नजरबाएव्ह यांचे हार्दिक अभिनंदन करतो.आमचे आदरातिथ्य आणि या परीषदेच्या उत्तम नियोजनाबद्दलही मी राष्ट्राध्यक्ष नजरबाएव्ह यांचे अभिनंदन करतो.

महामहिम,

प्रादेशिक आणि जागतिक परिघावरही शांघाय सहकार्य संघटना, शांतता आणि सुरक्षेचा एक प्रमुख स्तंभ आहे. 12 वर्षे निरीक्षक म्हणून राहिल्यानंतर भारताला आज शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्यत्व मिळत आहे.आमच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व देशांचे हार्दिक आभार मानतो.सदस्यत्वाचा विस्तार केल्यानंतर शांघाय सहकार्य संघटना जगातल्या सुमारे 42 टक्के लोकसंख्येचे, 20 टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन आणि 22 टक्के भूभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. शांघाय सहकार्य संघटनेची प्रगती म्हणजे जगातल्या विशाल जनसंख्येची आणि भूभागाची प्रगती आहे.

महामहिम,

आम्हाला सदस्यत्व आज मिळत आहे हे खरे असले तरी आपणा सर्व देशांबरोबर आमचे ऐतिहासिक संबंध आहेत.परस्पर विश्वास आणि सद्भावना हा आमच्या राजनैतिक आणि आर्थिक सहकार्याचा मुख्य आधारस्तंभ आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांबरोबर आमच्या सहकार्याचे अनेक आयाम आहेत.ऊर्जा, शिक्षण, कृषी, सुरक्षा, खनिज,क्षमता वृद्धी,विकासात्मक भागीदारी,व्यापार आणि गुंतवणूक ही यातली प्रमुख क्षेत्रे आहेत.शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्यत्व, आपल्या सहकार्याला निश्चितच एक नवा आयाम देऊन नव्या शिखरावर नेईल. महामहिम,

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांबरोबर दळणवळणाला भारताचे प्राधान्य आहे. या दळणवळणामुळे आपल्या देशातल्या भावी पिढ्या आणि समाजातल्या सहकार्य आणि विश्वासाचा मार्ग सुकर व्हावा अशी आमची इच्छा आहे.यासाठी दळणवळण योजनेची सफलता आणि त्यांना मान्यता यासाठी प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर आवश्यक आहे.त्याचबरोबर या योजना सर्वसमावेशक आणि निरंतरही असणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर आणि चाबहार करार त्याचबरोबर अश्काबाद करारात सहभागी होण्याचा आमचा निर्णय, भारताला या क्षेत्राबरोबर आणखी दृढतेने जोडेल.

महामहिम,

दहशतवाद हे मानवी अधिकाराचे आणि मानवी मूल्यांचे सर्वात मोठे उल्लंघन आहे.त्यामुळेच दहशतवादाविरोधात लढा, हा शांघाय सहकार्य संघटनेच्या सहकार्याचा प्रमुख भाग आहे.दहशतवाद्यांचे प्रशिक्षण असो वा त्यांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचा मुद्दा असो जोपर्यंत आपण सर्व देश या दिशेने एकजुटीने संघटित आणि जोमाने प्रयत्न करणार नाही तोपर्यंत या समस्येवर तोडगा अशक्य आहे.यासंदर्भात शांघाय सहकार्य संघटनेने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.भारत आणि शांघाय सहकार्य संघटना यांच्यातल्या सहकार्याने, दहशतवादाविरोधातल्या लढ्याला एक नवी दिशा आणि नवी शक्ती प्राप्त होईल असा मला विश्वास आहे.जागतिक दृष्टिकोनातून पाहता, हवामान बदलाच्या समस्येवरही शांघाय सहकार्य संघटना लक्ष केंद्रित करू शकते.या संदर्भात 'अस्ताना प्रदर्शन 2017 ' मध्ये 'भविष्यातली ऊर्जा' ही संकल्पना निवडल्याबद्दल मी कझाकिस्तान आणि राष्ट्राध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

महामहिम,

महिला आणि पुरुष वर्ग,

आज शांघाय सहकार्य संघटनेचा प्रवास एका ऐतिहासिक वळणावर आहे.शांघाय सहकार्य संघटनेबरोबर भरीव आणि सकारात्मक भागीदारीसाठी भारत कटिबद्ध आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष नजरबाएव्ह यांचे हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना, चीनकडे येणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या अध्यक्षतेच्या यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi