QuotePM Modi calls for collective effort to completely eliminate the ‘treatable disease’ of leprosy from India
QuoteMahatma Gandhi had an enduring concern for people afflicted with leprosy: PM
QuoteEffort to eliminate leprosy from this country under the National Leprosy Eradication Programme is a tribute to Mahatma Gandhi’s vision: PM

भारतातून कुष्ठरोग या बऱ्या होणाऱ्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी तसेच राष्ट्र उभारणीत आपण एकत्रित काम करण्‍याची गरज असल्याचे कुष्ठरोग विरोधी दिनानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे. आपल्या देशातले हे नागरिक महात्मा गांधीजींच्या स्वप्नांमधील आयुष्य जगण्यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

कुष्ठरोग बाधित व्यक्तींप्रती महात्मा गांधींना काळजी वाटत होती, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. या लोकांवर केवळ उपचार करणे हीच त्यांची दूरदृष्टी नव्हती तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचाही विचार गांधीजींचा होता असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत या देशातून कुष्ठरोगाचे उच्चाटन करणे ही महात्मा गांधींच्या दूरदृष्टीला आदरांजली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. राष्ट्रीय पातळीवर दर 10 हजार लोकसंख्येमागे एकापेक्षा कमी रुग्ण हे कुष्ठरोग निर्मूलनाचं लक्ष्य 2005 मध्ये साध्य झाल्याचे त्यांनी सांगितलं. रुग्ण शोधून काढण्याचा दर त्यानंतर काहीसा घसरला असला तरी रोग निदानाच्या वेळी दिसून येणाऱ्या व्यंगात वाढ झाली आहे, असे ते म्हणाले. एक देश म्हणून अंतिम लक्ष गाठण्यासाठी आपण भगीरथ प्रयत्न तर केलेच पाहिजेत पण या रोगाशी निगडीत सामाजिक कलंक संपूर्ण नष्ट करण्यासाठी कार्य करण्याचीही गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

समाजात कुष्ठरोगाची लागण लवकर शोधून काढण्यासाठी 2016 मध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत त्रिस्तरीय रणनिती आखण्यात आल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

2016मध्ये विशेष कुष्ठरोग निदान, विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 32 हजाराहून अधिक सणांचे निदान झाले आणि त्यानंतर औषधोपचार सुरू झाले. याशिवाय रुग्णांच्या नजीकच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तांना या रोगाची लागण होण्याची शक्यता कमी करण्यासाठी औषधे दिली गेली. 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi Distributes Over 51,000 Appointment Letters At 15th Rozgar Mela

Media Coverage

PM Modi Distributes Over 51,000 Appointment Letters At 15th Rozgar Mela
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 एप्रिल 2025
April 27, 2025

From Culture to Crops: PM Modi’s Vision for a Sustainable India

Bharat Rising: PM Modi’s Vision for a Global Manufacturing Powerhouse