पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 380 संचालक आणि उपसचिवांबरोबर संवाद साधला. ऑक्टोबर महिन्यातल्या विविध दिवशी चार गटात त्यांनी संवाद साधला. यातील शेवटचा संवाद 17 ऑक्टोबरला झाला. सुमारे दोन तास हा संवाद चालायचा.
प्रशासन, भ्रष्टाचार, सार्वजनिक उद्योग, ई-बाजारपेठ, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी, वाहतूक, राष्ट्रीय एकात्मता, जलस्रोत, स्वच्छ भारत, संस्कृती, दळणवळण आणि पर्यटन यावर या संवादसत्रांमध्ये चर्चा झाली.
वर्ष 2022 पर्यंत नवभारताच्या निर्मितीसाठी अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या कामकाजात पूर्वग्रह हे मोठे अडथळे असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाच्या विविध प्रक्रियांमध्ये गती आणण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. कामातल्या अधिक चांगल्या निष्पत्तींसाठी संचालक आणि उपसचिवांनी याच आधारे पथके तयार करावीत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
या संवादसत्रांना प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग आणि प्रधानमंत्री कार्यालयातले वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय सचिव उपस्थित होते.