PM Modi applauds doctors, Medical Staff, Para-Medical Staff, sanitation workers in hospitals and everyone associated with Corona Vaccine
PM Modi complements Corona warriors for their authentic communication about the pandemic and vaccination
World's largest vaccination programme is going on in our country today: PM Modi

हर हर महादेव

वाराणसीच्या सर्व जनतेला वाराणसीच्या या सेवकाचा प्रमाण. या कार्यक्रमाशी संबंधित सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी,निम-वैद्यकीय कर्मचारी, रुग्णालयात सर्वात महत्वाचे काम करणारे, आपले सफाई कामगार बंधू, सर्व बंधू-भगिनी , कोरोना लसीशी संबंधित प्रत्येकजण, कोरोना लस घेतलेले सर्व लोक, मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरेतर यावेळी मला तुम्हा सगळ्यांसोबत असायला हवे होते. परंतु अशा काही परिस्थिती निर्माण झाल्या ज्यामुळे मला आभासी पद्धतीने तुम्हाला भेटावे लागले. परंतु हे देखील तेवढेच सत्य आहे की, काशी साठी मला मी नेहमी जितके शक्य आहे तितके करण्याचा प्रयत्न करतो.

मित्रांनो,

वर्ष 2021 ची सुरुवात अनेक चांगल्या संकल्पांसोबत झाली आहे आणि काशीबद्दल तर असे म्हणतात की केवळ काशीच्या स्पर्शानेच सगळे पावन होते. या सिद्धीमुळेच आज जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशात सुरु झाला आहे. आणि याआधी पहिल्या दोन टप्प्यात, 30 कोटी देशवासियांना लस दिली जात आहे. आज देशात असे वातावरण आहे, अशी इच्छाशक्ती आहे की देशातच लस बनविली जात आहे. तेही, केवळ 1 लस नव्हे तर दोन-दोन भारतात तयार करण्यात आलेल्या लसी. आज देशाच्या कानाकोपऱ्यात वेगाने लस पोहोचत आहे आपण इतकी तयारी केली आहे आणि आज भारत, जगाच्या या सर्वात मोठ्या गरजेसंदर्भात पूर्णपणे स्वावलंबी झाला आहे. एवढेच नव्हे तर भारत अनेक देशांना मदत देखील करत आहे.

मित्रांनो,

गेल्या सहा वर्षांत, वाराणसी आणि आजूबाजूच्या परिसरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील मोठ्या बदलामुळे कोरोना काळात संपूर्ण पूर्वांचलला यामुळे खूप मदत झाली. आता लससाठी देखील बनारस त्याच वेगाने वाटचाल करत आहे. मला सांगण्यात आले आहे की वाराणसीमध्ये पहिल्या टप्प्यात 20 हजाराहून अधिक आरोग्य व्यावसायिकांना लस दिली जाईल. यासाठी 15 लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. या संपूर्ण मोहिमेसाठी मी सर्व डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे अभिनंदन करतो, योगीजींच्या सरकारचे अभिनंदन करतो, विभागातील सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

वाराणसी मधील तुमचा अनुभव काय आहे, लसीकरणात कोणतीही अडचण नाही ना? हे सर्व जाणून घेण्यासाठी मी आज तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. आपण आभासी माध्यमातून बोलूया. मी आज कोणतेही भाषण करायला आलो नाही. आणि मला वाटते की माझी काशी आणि माझ्या काशीतील लोक, त्यांच्याकडून मिळालेले अभिप्राय मला इतर ठिकाणीही उपयोगी येतील. तुम्ही स्वतः लस घेतली आहे आणि लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी देखील झाले आहेत, म्हणजे येथे सगळ्या प्रकारचे लोक आहेत. आणि मला सांगण्यात आले आहे की सर्वात आधी मला बहुदा वाराणसी जिल्हा महिला रुग्णालयातील मेट्रन पुष्पाजी यांच्याशी संवाद साधायचा आहे.

मोदी जी – पुष्पा जी नमस्ते

पुष्पा जी - आदरणीय पंतप्रधानांना माझा नमस्कार. माझे नाव पुष्पा देवी आहे. मी जिल्हा महिला रुग्णालयात मी एका वर्षापासून मेट्रन म्हणून काम करत आहे.

मोदी जी - सर्वप्रथम मी आपले अभिनंदन करतो कारण पहिल्या टप्प्यात ज्यांना लस दिली त्यांच्यापैकी तुम्हीही एक आहात. एक काळ असा होता की लोक कोरोनाचे नाव ऐकले तरी घाबरायचे. आता मला पुष्पाजी यांचे काय म्हणणे आहे हे जाणून घ्यायला आवडेल, संपूर्ण देश ऐकत आहे, मी देखील ऐकत आहे.

पुष्पाजी – सगळ्यात आधी, कोरोना लसीसाठी मी माझ्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या वतीने तुमचे आभार मानू इच्छिते. लस घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही आरोग्य विभागाची निवड केली, आणि पहिल्या टप्प्यात 16 जानेवारी रोजी लस देण्यात आली त्यापैकी मी देखील एक आहे. मला लस दिली आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान मानते. आणि त्याच वेळी मला सुरक्षित देखील वाटत आहे, मला वाटते की माझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे, मला वाटते की संपूर्ण समाज सुरक्षित झाला आहे. सर, मी माझ्या सर्व परिचारिकांना, निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, लस घेण्यासाठी आग्रह करत आहे, लस घेतल्याने माझ्यावर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत हे मी सगळ्यांना सांगत आहे. लस घेतल्याने मला कोणत्याही प्रकारची समस्या झाली नाही. इतर इंजेक्शन प्रमाणेच हे इंजेक्शन दिले. म्हणून तुम्ही सगळ्यांनी स्वतःहून पुढे येऊन ही लस घ्या जेणेकरून तुम्ही सुरक्षित व्हाल, तुमचे कुटुंब सुरक्षित असेल तर तुमचा समाजही सुरक्षित होईल.

मोदिजी - पुष्पाजी मेड इन इंडिया लस ही, आपल्यासारखे कोट्यावधी योद्धे आणि 130 कोटी देशवासीयांचे यश आहे, आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब तर आहेच. बरं मला सांगा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही अडचण आली नाही, कोणताही मानसिक त्रास झाला नाही, याचाच अर्थ तुम्ही अगदी विश्वासाने कोणालाही सांगू शकता की लसीबाबत तुमचा अनुभव एकदम उत्तम अनुभव आहे?

पुष्पाजी – हो

मोदिजी – बोला पुष्पाजी

पुष्पाजी – काय सर?

मोदिजी – तुम्हाला ऐकू येतंय?

पुष्पाजी – हो सर

मोदिजी – तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण जशी नेहमी लस घेतो ही देखील तशीच होती. काही लोकांच्या मनात थोडी चिंता आहे. तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहात आणि तुम्ही स्वतः ही लस घेतली आहे त्यामुळे तुम्ही लोकांना असे काही तुमचे अनुभव सांगा की लोकांचा विश्वास वाढेल.

पुष्पाजी – ही लस तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे हे लोकांना पटवून दिले पाहिजे. आणि आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी नऊ महिन्यांमध्ये लस उपलब्ध करून दिली आणि भारतात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. ही लस घेतल्यानंतर तुम्ही पूर्णतः सुरक्षित असाल आणि ही लस घेतल्यानंतर आमच्यावर काही दुष्परिणाम किंवा यामुळे काही नुकसान होईल अशी कोणतीही भीती तुम्ही मनात आणू नका. म्हणून, प्रत्येकाने लस घ्यायची आहे आणि मनातून भीती काढून टाकायची आहे.

मोदीजी - पुष्पाजी, तुम्ही अगदी बरोबर बोललात. कोणतीही लस तयार करताना, त्यामागे आमच्या वैज्ञानिकांचे कठोर परिश्रम असतात आणि एक संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रिया असते. आणि तुम्ही तर ऐकलं असेल, लस लवकर का येत नाही? लस कधी मिळणार? यासाठी सुरुवातीला माझ्यावर खूप दबाव होता. राजकारणात दोन्ही बाजूने बोलले जाते. तेव्हा मी एकच उत्तर द्यायचो, वैज्ञानिक जे सांगतील आम्ही तसेच करणार. हे ठरविणे आपल्या राजकारण्यांचे काम नाही, आणि आपल्या वैज्ञानिकांची लस निर्मितीची प्रक्रिया ज्याक्षणी पूर्ण झाली त्याक्षणी आम्ही बोललो "आता आपण कुठून सुरुवात करूया?” म्हणून आम्ही पहिल्यांदा अशा लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला जे नेहमी रुग्णांच्या संपर्कात येतात. जर ते सुरक्षित झाले तर ते समाजातील प्रत्येकाची चिंता कमी होईल. आणि इतक्या कठीण प्रक्रियेनंतर आणि वैज्ञानिक तपासणीनंतर, आता लस आली आहे, सर्वातआधी आम्ही आरोग्य सेवेशी निगडीत लोकांना प्राधान्य दिले आहे; काही लोक माझ्यावर रागावले आहेत, आमच्यासाठी लवकर सुरु करा; परंतु माझ्या मते सर्वात आधी तुमचे लसीकरण झाले पाहिजे आणि ते ही जेवढ्या लवकर होईल याची खबरदारी घ्या आणि ही मोहीम पुढे घेऊन जा. अनेक टप्प्यापर्यंत या निष्कर्षा पर्यंत पोहोचलो आहोत की या लसीची कोणतेही दुष्परिणाम नाहीत, त्यानंतरच या लसीला मान्यता देण्यात आली आहे. म्हणूनच, देशवासीयांनी आपल्या शास्त्रज्ञांवर आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्यासारखे वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत लोकं जेव्हा याबाबत बोलतात तेव्हा लोकांचा विश्वास बसतो. पुष्पाजी, तुमचे मनापासून आभार. आपण निरोगी रहा आणि सेवा करत रहा.

मोदिजी – राणी जी नमस्ते

राणी कुंवर श्रीवास्तव - नमस्कार सर. सर्व काशीवासियांच्या वतीने माननीय पंतप्रधानांना माझा नमस्कार. सर, माझे नाव राणी कुंवर श्रीवास्तव आहे. मी सहा वर्षांपासून जिल्हा महिला रुग्णालयात ए एन म म्हणून काम करत आहे.

मोदिजी - सहा वर्षात तुम्ही किती लस दिल्या आहेत? एका दिवसात तुम्ही किती लस देता?

राणी कुंवर श्रीवास्तव - सर, एका दिवसात आम्ही सुमारे 100 इंजेक्शन्स देतो, लोकांना 100 लसी देतो.

मोदिजी – म्हणजे आतापर्यंतचे तुमचे सर्व विक्रम या लसीकरण मोहिमेदरम्यान तुटणार आहेत. आता तुम्हाला इतक्या लोकांना इंजेक्शन्स द्याव्या लागतील की कदाचित तुमचे हे विक्रम मोडतील.

राणी कुंवर श्रीवास्तव – सर, कोविड-19 सारख्या भयानक आजाराची लस लोकांना देण्याची संधी मला मिळाली आहे याचा मला खूप आनंद झाला आहे, मी स्वत: ला खूप भाग्यवान समजते.

मोदिजी – लोकं आता तुम्हाला आशीर्वाद देत असतील?

राणी कुंवर श्रीवास्तव – हो सर, खूप आशीर्वाद मिळतात. सर, लोकं माझ्यासोबात सगळ्यात जास्त तुम्हाला आशीर्वाद देतात कारण दहा महिन्यांच्या कालावधी मध्येच कोरोनाची लस तयार झाली आणि लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरु देखील झाली.

मोदिजी – यांचे श्रेय मला जात नाही. सर्वात आधी तर यांचे श्रेय तुम्हाला जाते, कारण एवढी काळजी, अनिश्चितता, आम्ही आमच्यासोबत कोरोना तर घरी घेऊन जाणार नाही न? या वातावरणात देखील आपण लोक धैर्याने काम केले, चिकाटीने काम केले, गरिबांची, आजारी लोकांची सेवा केली. दुसरे आहेत आमचे वैज्ञानिक. जे संपूर्ण आत्मविश्वासाने प्रयोगशाळेत; हा कोरोना एक अज्ञात शत्रू होता, तो कसा आहे हे माहित नव्हते, ते प्रयोगशाळेत त्याच्या विषयी संशोधन करत होते, त्याच्या मागेच लागले, रात्रंदिवस कष्ट केले; आणि शास्त्रज्ञ हे तर आजचे आधुनिक ऋषी आहेत. या सगळ्यांनी हे काम केले त्यानंतर हे सर्व शक्य झाले आहे. म्हणूनच याचे श्रेय मला नाही तर तुम्हाला जाते. चला, तुमच्याशी संवाद साधून मला चांगले वाटले आणि तुम्ही आत्मविश्वासाने तुमचे काम करत आहात. लोकांचा आत्मविश्वास वाढवा, काम पुढे घेऊन जा. राणीजींना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.

राणी कुंवर श्रीवास्तव – धन्यवाद सर, नमस्ते

 

मोदिजी – नमस्ते डॉक्टर

डॉ. व्ही. शुक्ला – नमस्ते सर. मी डॉ व्ही. शुक्ला पंडित दीनदयाल उपाध्याय, वाराणसी येथे मुख्य वैद्यकीय अधीक्षक आहे, मी माझ्या आणि माझ्या रूग्णालयाच्या परिवाराच्या वतीने तुम्हाला नमस्कार करतो.

मोदिजी – बोला शुक्ला जी, काय अनुभव येत आहे तुम्हाला, मला सांगा, आमचे काशीवासी सुखी आहेत का?

डॉ. व्ही. शुक्ला - सर, खूप सुखी आहेत. प्रत्येकामध्ये खूप उत्साह आहे. अल्पावधीतच, विकसनशील देश असूनही आपण लस निर्मितीच्या बाबतीत विकसित देशांना मागे टाकले आहे. लसीकरणासाठी तुम्ही सर्वात आधी आमची निवड केली ही आमचा वैद्यकीय समुदाय आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी तर ही अभिमानाची बाब आहे. यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत.

मोदिजी - मी तुमचा आभारी आहे, पण खरोखर तुम्ही लोकांनी अद्भुत काम केले आहे. इतक्या मोठ्या संकटातून देशाला वाचविण्यात कोरोना योद्ध्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे आणि मी हे वारंवार बोलतो आहे. हा शुक्लाजी, बोला.

डॉ. व्ही शुक्ला – सर, सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल हा आरोग्य विभागाला तुम्ही जो विश्वास दिला आहे त्यमुळे आमच्यामध्ये उत्साह संचारला आहे आणि आम्ही दुप्पट उत्साहाने आमचे काम करत आहोत. आणि या आजारापासून लोकांना वाचविण्यासाठी जे लोकं काम करत आहेत त्यांनाच आधी लस देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे, पंतप्रधान आणि वैज्ञानिकांनी जर यांची निवड केली याचा अर्थ हाच होतो की ही लस पूर्णतः सुरुक्षित आहे, आणि हाच संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहे.

मोदिजी - हे पहा, ही तर देवाची कृपा आहे की आम्ही गेली चार-पाच वर्षे जी स्वच्छता मोहीम राबवित आहोत, पिण्याच्या पाण्याची मोहीम राबवीत आहोत, शौचालयाची मोहीम राबवीत आहोत; यासगळ्या गोष्टींमुळेच आपल्या देशातील अगदी गरीबातील गरीब व्यक्तीमध्ये देखील या आजाराशी लढण्याची शक्ती मिळाली आहे. आम्हाला या गोष्टींचा अप्रत्यक्ष फायदा असा झाला की, आपल्या देशातील गरीब नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनी देखील हा कोरोनाविरूद्धचा लढा सामर्थ्याने दिला. यामुळे आपल्याकडील मृत्यू दर खूपच कमी झाला आहे. स्वच्छता, शौचालय, पाणी या सर्व गोष्टींनी खूप मदत केली. शुक्लाजी तुमच्याकडे एक मोठी टीम कार्यरत आहे. वेगवेगळ्या स्तरावरील लोक कार्यरत आहेत. एकूणच, प्रत्येकाचा विश्वास कसा आहे? सर्व सहकार्यांचा विश्वास कसा आहे?

डॉ. व्ही. शुक्ला – चांगला आहे. प्रत्येकजण पूर्णपणे समाधानी आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. लसीकरण सुरू होण्यापूर्वी देखल, आम्ही यावर सामूहिक चर्चा केली आणि सगळ्यांना सांगितले की सगळ्यांनी बाहेर जाऊन लोकांना सांगा की, ही मोहीम म्हणजे पूर्वीपासून सुरु असलेल्या लसीकरणासारखीच आहे, त्यानंतरही कुठेतरी एक लहान,हलक्या स्वरुपाची वेदना किंवा ताप, थंडी यासारखे परिणाम ही एक सामान्य गोष्ट आहे, ही काही फार मोठी गोष्ट नाही. आणि या लसीनंतर आम्हाला देखील या गोष्टी येऊ शकतात, म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. तथापि, कोणाच्या मनात शंका असल्यास, टी दूर करण्यासाठी, आम्ही सर्वात आधी आमच्या केंद्रावर लस दिली आणि त्या दिवशी आमच्या येथे 82 टक्के लसीकरण झाले. आणि यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येकजण स्वतःहून याचा प्रचार करत आहे.

मोदिजी – हे बघा आम्ही भले लोकांना सांगितले की काळजी करू नका, लस घ्या त्याऐवजी तुमचा एक शब्द, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत एक व्यक्ती जेव्हा हे सांगतो तेव्हा रुग्णाचा विश्वास वाढतो. नागरिकांचा विश्वासही वाढतो. तुम्हाला देखील लोकं बरेच प्रश्न विचारून भंडावून सोडत असतील , मग ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळता?

डॉ. व्ही. शुक्ला - सर, प्रत्येक लसीकरणानंतर छोटे-मोठे परिणाम होतात, आम्ही हे लोकांना समजावून सांगतो. आतापर्यंत, आपल्या देशात 10 लाख लोकांना लस दिली आहे आणि त्यापैकी बरेच कमी जण आमच्याकडे आले आहेत ज्यांना अगदीच किरकोळ त्रास झाला आहे. लसीकरणानंतर जितक्या लोकांना आम्ही येथे लसी दिली आहे, त्यांना येथे अर्धा तास बसून राहावे लागले, त्यानंतर सर्वजण पुन्हा त्यांच्या कामाला लागले. आमच्या येथे सफाई कामगारांनी देखील लस घेतल्यानंतर लगेचच सफाई करण्यास सुरवात केली. आम्ही देखील आमची सर्व कामे करायला सुरुवात केली. ज्यांना हृदयरोग, श्वसनाचा आजार किंवा कर्करोग असे गंभीर आजार आहेत; त्यांनाही लस दिली जाणार आहे, अशा कोट्यवधी लोकांमध्ये जर एखाद्या व्यक्तीला काही मोठे परिणाम दिसून आले, जर काही दुर्घटना घडलीच तर त्याचा संबध लसीकरणा सोबत जोडू नये. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि कोणतीही लस कोणालाही अमरत्व प्रदान करणार नाही. त्यामुळे या गोष्टीस लसीकरणाशी जोडणे चुकीचे आहे. लसीच्या सुरक्षिते बाबत आपल्या देशात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रयोगात्मक अहवाल आला आहे जगात इतरत्र येऊ शकत नाही. लसीकरणा नंतर दहा लाख लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत. आमच्यासाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि आतापर्यंत भारता व्यतिरिक्त जगात इतर कुठेही इतकी मोठी लसीकरण मोहीम झाली नाही हा संदेश देखील सर्वदूर जात आहे.

मोदिजी - शुक्लाजी, तुमचा आत्मविश्वास इतका दृढ आहे आणि तुमचे नेतृत्व कणखर आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही तुमच्या रूग्णालयात लसीकरण केले, मला आता सर्व रुग्णालयांना सांगायचे आहे की आता त्यांनी देखील ठरवावे की त्यांच्या रुग्णालयात देखील 100% काम किती लवकर पूर्ण होईल. स्पर्धा करा, वातावरण निर्मिती करा जर आपल्या रूग्णालयात 100% काम झाले तर काय होईल? पुढील फेरी आम्ही लवकरच सुरु करू शकतो आणि 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना लस देण्याचे काम ताबडतोब सुरु करू शकतो. तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यामुले तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. परंतु, आपल्याकडून प्रेरणा घेऊन, इतर संस्थेमध्ये, रूग्णालयात, जे योद्धे आहेत त्यांना मदत केली तर फार बरे होईल. शुक्लाजी तुमच्या चमूचे मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.

मोदिजी – रमेश जी नमस्ते

रमेश चंद राय - नमस्कार सर, आदरणीय पंतप्रधानांना माझा नमस्कार. मी पंडित दीनदयाळ उपाध्याय सरकारी रुग्णालयात वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.

मोदिजी – तुम्ही लस घेतलीत?

रमेश चंद राय – हो सर, पहिल्याच टप्प्यात आम्हाला लस दिली ही तर माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे.

मोदिजी- वाह! आता बाकीच्यांचा विश्वासही वाढला असेल. जेव्हा तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत व्यक्ती जेव्हा लस घेते तेव्हा उर्वरित लोकांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो.

रमेश चंद राय – अगदी बरोबर सर. आम्ही सर्वजण लोकांना हेच सांगत आहोत, तुम्हाला पहिला डोस मिळाला आहे आणि दुसरा देखील तयार आहे. सुरक्षित रहा, आपल्या कुटुंबाचे रक्षण करा, समाजाचे रक्षण करा आणि देशाचेही रक्षण करा.

मोदिजी – तुम्ही विश्वास निर्माण केलात. आता तुमच्या संपूर्ण टीममध्ये काय परिणाम झाला आहे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे?

रमेश चंद राय – अगदी सर. लोकांमध्ये उत्साह आहे, पहिल्या टप्प्यात 81 जणांना लसी दिली आहे. 19 लोक बहुधा कुठेतरी गेले होते. आजही लसीकरण चालू आहे.

मोदिजी - चला, रमेश जी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमच्या संपूर्ण टीमला देखील खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद

मोदिजी – श्रुंखला जी नमस्ते

श्रुंखला चौहान - सर, श्रुंखला चौहानचा तुम्हाला नमस्कार. सर, सीएससी हाथी बाजार, पीएससी सेवापुरी, एसडब्ल्यूसी वर्गात एएनएम पदावर कार्यरत आहे.

मोदिजी - सर्व प्रथम, मी तुमचा आभारी आहे; कारण सेवापुरीमध्ये सेवा करून खऱ्या अर्थाने तुम्ही सेवापुरीचे नाव आणि आपल्या कुटुंबाचे नाव सार्थक करत आहात. तुम्ही ही खूप मोठी सेवा करत आहात. आणि अशा प्रकारच्या संकटकाळात जेव्हा तुम्ही सेवा करता, तेव्हा ती खूप मौल्यवान असते. ज्याचे मोजमाप करणे शक्य नाही. आणि तुमच्यासारख्या लोकांमुळेच जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत तुम्ही किती लोकांन लस दिली आहे? एका दिवसात आपण किती लोकांना लस देता?

श्रुंखला चौहान - सर, पहिल्या टप्प्यात सर्वप्रथम, 16 जानेवारी 2021 रोजी मी कोविशील्डचा पहिला डोस घेतला आणि त्या दिवशी मी 87 लोकांना देखील लस दिली.

मोदिजी – अच्छा! म्हणजे तुम्ही ज्या दिवशी स्वतः लस घेतलीत, त्याच दिवशी इतके काम केले?

श्रुंखला चौहान – हो सर

मोदिजी - अरे वाह ! 87 लोकांना लस देणे हे काही छोटे-मोठे काम नाही. मग ते सर्व तुम्हाला आशीर्वाद देत असतील?

श्रुंखला चौहान – हो सर. आम्ही शेवटी घेतली, त्या दिवशी कामावर असणाऱ्या सर्व लोकांना लस दिल्यानंतर आम्ही लस घेतली.

मोदिजी – तुम्हाला शुभेच्छा. आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे तुम्ही सगळे सुरक्षित झाल्यानंतर तुम्ही समाजातील इतर लोकांना देखील लस द्याल. मला आज आपल्या सर्वांशी बोलण्याची संधी मिळाली. मला खूप आनंद झाला. या लसीकरणाच्या कामात देखील मी माझ्या काशीच्या जनतेला भेटू शकलो, त्यांच्याशी बोलू शकलो आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील लोकं जे या कार्याचे खरोखर नेतृत्व करत आहेत त्यांना पाहण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. तर माझ्यासाठीही हा भाग्याचा क्षण आहे. काशीवासियांना, पहिल्या फेरीतील लसीकरणाचे काम लवकरात लवकर 100 टक्के पूर्ण करण्याचा मी आग्रह करतो जेणेकरून आपल्याल पुढील टप्प्यात 50 वर्षे वयाच्या लोकांचे लसीकरण करण्याची संधी मिळेल. काशीचा सेवक म्हणून मी नक्की म्हणेन की काशीमध्ये हे काम आपण लवकरच पूर्ण करूया.

तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

धन्‍यवाद।

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers

Media Coverage

Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जानेवारी 2025
January 02, 2025

Citizens Appreciate India's Strategic Transformation under PM Modi: Economic, Technological, and Social Milestones