नीमराना परिषद 2016 मध्ये भाग घेणारे अभ्यासक आणि अर्थतज्ञांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. जागतिक संशोधनातल्या कल्पकतेशी सांगड घालत मॅक्रो-इकॉनॉमी, व्यापार, वित्तीय धोरण, स्पर्धात्मकता, उत्पादकता आणि उर्जा यावर चर्चेचा रोख होता.
नियमाधारित बहुविध व्यापार व्यवस्था, उत्तरदायित्व असणारे हवामान धोरण आणि दारिद्रय निर्मुलन तसंच रोजगार निर्मिती करणारा विकास याप्रती भारताची कटिबध्दता पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.
कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि नवीकरणीय उर्जेकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावलं उचलत आहे याची तपशीलवार माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली.