देशातील विविध भागांचा दौरा करत असलेल्या दोन आयटीबीपी अर्थात इंडो- तिबेट सीमा पोलीस भ्रमंती गटाशी संलग्न सिक्कीम आणि लडाख मधील 53 विद्यार्थ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी समृद्ध आणि भ्रष्टाचार-मुक्त भारताचे स्वप्न असल्याचे सांगितले.
हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तंदुरुस्त राहायला सांगितले. या संदर्भात, योगाच्या महत्वावर देखील चर्चा झाली.
पंतप्रधानांनी शिकण्याच्या महत्वावर भर दिला आणि म्हणाले सदैव नवीन काहीतरी शिकण्याकडे आपला कल असायला हवा.
विद्यार्थ्यांनी डिजिटल भारतात विशेष स्वारस्य दाखवले. रोकडविरहित व्यवहारांवर देखील यावेळी चर्चा झाली. सामान्य जनतेला थेट लाभ हस्तांतरणाचा कशा प्रकारे फायदा होत आहे याची माहिती पंतप्रधानांनी त्यांना दिली.
या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांनी लिहिलेल्या “एक्साम वॉरियर्स “या पुस्तकाचा उल्लेख केला, ज्यात त्यांनी विद्यार्थ्यांना अनावश्यक तणाव आणि दबावाशिवाय आयुष्य जगण्याविषयी प्रोत्साहित केले आहे.