पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील अन्नप्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रातील अव्वल कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी आज संवादन साधला. भारतात सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचा हा एक भाग होता.
अमेझॉन(भारत), ॲमवे, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, कारगिल एशिया पॅसिफिक, कोका-कोला इंडिया, डॅनफोस, फ्युचर ग्रुप, ग्लॅक्सोस्मिथ क्लाईन, आईस फूडस, आयटीसी, किकोमॉन, लुलु ग्रुप, मॅककेन, मेट्रो कॅश ॲण्ड कॅरी, मॉन्डेलेझ इंटरनॅशनल, नेस्ले, ओएसआय ग्रुप, पेप्सिको इंडिया, सिलड एअर, शराफ ग्रुप, स्पार इंटरनॅशनल, द हाईन सेलेशिअल ग्रुप, द हर्शे कंपनी, ट्रेन्ट लि. आणि वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल, अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता अहवालातील भारताच्या मानांकनात लक्षणीय सुधारणा झाल्याबद्दल विविध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. अनेक अधिकारी म्हणाले की, गेल्या तीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणांना दिलेली गती तसेच कृषी उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न यांनी ते प्रेरित झाले आहेत. वस्तू आणि सेवा कर आणि थेट परदेशी गुंतवणुकीचे उदारीकरण यांसारख्या रचनात्मक सुधारणा आणि धाडसी निर्णयांची त्यांनी विशेष प्रशंसा केली.
कृषी उत्पादकता वाढवणे, अन्न आणि पोषण सुरक्षा, रोजगार निर्मिती आणि कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन यासाठी अन्न प्रक्रिया क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्यावर उपस्थितांनी भर दिला.
भारताच्या अन्न प्रक्रिया, कृषी, मालवाहतूक आणि किरकोळ क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादरीकरण केले. पीक घेतल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करण्यात असलेल्या संधींमध्ये त्यांनी स्वारस्य दाखवले. भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची मते आणि सूचना व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि म्हणाले की त्यांच्या निरीक्षणातून भारताप्रती अमाप उत्सुकता दिसून येते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या लक्षवेधी सूचनांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहभागी कंपन्यांकडून राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे पंतप्रधानांनी स्वागत केले. ते म्हणाले कि भारताचा वाढता मध्यमवर्ग आणि सरकारचे धोरणात्मक निर्णय यामुळे अन्नप्रक्रिया व्यवस्थेतील सर्व संबंधितांसाठी समाधन संधी उपलब्ध होत आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि कृषी मालाच्या नासाडीमुळे होणारे नुकसान टाळण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताबरोबर अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आमंत्रित केले.
त्यापूर्वी हरसिमरत कौर बादल यांनी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार राबवत असलेल्या धोरणांची थोडक्यात माहिती दिली.