पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती-म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि प्रकल्पांची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठीचे बहुआयामी व्यासपीठच्या अठ्ठावीसाव्या बैठकीत विविध योजना आणि प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी प्राप्तिकरासंबंधी नागरिकांकडून आलेल्या तक्रारींच्या निपटाऱ्याचा त्यांनी आढावा घेतला. यासंदर्भात झालेल्या कारवाईविषयी अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. सर्व व्यवस्था तंत्रज्ञानावाच्या माध्यमातून चालवल्या जाव्यात आणि त्यात मानवी सहभाग कमीतकमी असावा, या सूचनेचा त्यांनी पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधातील कारवाईची मोदी यांनी नोंद घेतली. तसेच, प्राप्तिकर विभागाने यांदर्भात केलेल्या कारवाया आणि उपाययोजनांची माहिती तसेच कर सुलभतेसाठी दिलेल्या सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यत पोचवाव्यात, अशी आग्रही सूचना पंतप्रधानांनी केली.
याआधी झालेल्या प्रगतीच्या 27 बैठकांमध्ये देशभरात सुरु असलेल्या 11.5 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्याशिवाय इतर क्षेत्रातील सार्वजनिक तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
आजच्या 28 व्या बैठकीत, पंतप्रधानांनी रेल्वे आणि रस्ते तसेच पेट्रोलियम क्षेत्रातील महत्वाचा नऊ पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक,पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथे हे प्रकल्प सुरु आहेत.
नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-आयुष्यमान भारताच्या प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच प्रधानमंत्री जन औषधी प्रकल्पाचाही पंतप्रधानांनी या बैठकीत आढावा घेतला.