पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 71 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांच्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :- 

  1. स्वातंत्र्यदिनानिमित्त माझ्या भारतीय देशबांधवांना शुभेच्छा.

  2. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि गौरवासाठी ज्यांनी योगदान दिलेज्यांनी यातना भोगल्या आणि प्राणांचे बलिदान दिलेत्या सर्व वीरांना,माता आणि भगिनींना देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या वतीने लाल किल्याच्या तटावरून मी वंदन करतो.

  3. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महिला आणि पुरुषांनी कठोर परिश्रम घेतले त्यांचे आपण स्मरण करतो.

  4. देशातील काही भागात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांच्या आणि रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भारतीय जनतेने खंबीरपणे उभे राहायला हवे.

  5. हे विशेष वर्ष आहे-भारत छोडो आंदोलनाला 75 वर्षे पूर्णचंपारण्य सत्याग्रहाचे शताब्दी वर्षगणेश उत्सवाची 125 वर्षे

  6. ती "भारत छोडो" चळवळ होतीमात्र आजचा नारा आहे "भारत जोडो"

  7. 'नवीन भारतनिर्माण करण्याच्या निर्धारासह आपण देशाला पुढे न्यायचे आहे

  8. 1942 ते 1947  या काळात देशाने सामूहिक सामर्थ्याचे दर्शन घडवलेपुढील पाच वर्षातत्याच सामूहिक सामर्थ्यकटिबद्धता आणि कठोर परिश्रमाने आपल्याला देशाला पुढे न्यायचे आहे.

  9. आपल्या देशातकुणीही मोठा नाही किंवा कुणीही लहान नाहीप्रत्येकजण समान आहे. एकत्रितपणे आपण देशात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

  10. लहान-मोठा भेदभाव न करता 125 कोटी लोकांच्या सामूहिक सामर्थ्यानिशी नवीन भारत बनवण्यासाठी आपल्याला पुढे जावे लागेल.

  11. 1 जानेवारी 2018 हा साधारण दिवस असणार नाही- या शतकात जन्मलेले वयाची 18 वर्षे पूर्ण करतील. ते आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत.

  12. आपल्याला ही 'चलता हैची वृत्ती सोडावी लागेल. 'बदलू शकतेयाबद्दल आपण विचार करायला हवा- एक राष्ट्र म्हणून ही वृत्ती उपयोगी पडेल.

  13. देश बदलला आहेबदलतो आहे आणि बदलू शकतो. या विश्वासासह आणि कटिबध्दतेसह आपल्याला पुढे जायचे आहे.

  14. देशाच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. अंतर्गत सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. महासागर असो किंवा सीमासायबर जगत असो किंवा अंतराळसर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी भारत सक्षम आहे.

  15. नक्षलवाददहशतवादघुसखोरीशांतता भंग करणाऱ्या बाह्य शक्ती असोतआपल्या जवानांनी बलिदानाची पराकाष्ठा केली आहे. जगाला भारताचे सामर्थ्य आणि लक्ष्यभेदी हल्ल्यातील ताकद मान्य करावेच लागले. 

  16. एक पदएक निवृत्तीवेतन धोरणामुळे आपल्या सुरक्षा दलांचे मनोधैर्य वाढले.

  17. ज्यांनी आपला देश लुटलागरीबांना लुटलेते आज शांतपणे झोपू शकत नाहीत.

  18. बेनामी संपत्ती असलेल्यांसाठी अनेक वर्षे कुठलाही कायदा पारित करण्यात आला नव्हता. अलिकडेचबेनामी संपत्ती कायदा पारित झाल्यानंतरसरकारने 8०० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली. जेव्हा अशा गोष्टी घडत असताततेव्हा सामान्य माणसाला वाटते कि हा देश प्रामाणिक लोकांसाठी आहे.

  19. आजआपण "प्रामाणिकपणाचा उत्सव" साजरा करत आहोत.

  20. जीएसटीने सहकारी संघवादाच्या  भावनेचे दर्शन घडवले. जीएसटीचे समर्थन करण्यासाठी देश एकत्र आला आणि तंत्रज्ञानाची भूमिका सहाय्यभूत ठरली.

  21. आज आपल्या देशातील गरीब मुख्य प्रवाहात सहभागी होत आहे आणि देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.

  22. सुशासन प्रक्रियेचा वेग आणि सुलभीकरण देते.

  23. भारताची मान जगात उंचावत आहे. दहशतवादाविरुध्दच्या लढाईत  जग आपल्याबरोबर आहे. या मदतीसाठी मी सर्व देशांचे आभार मानतो.

  24. जम्मू-काश्मिरच्या  प्रगतीसाठी आपल्याला काम केले पाहिजे.

  25. दहशतवाद  किंवा दहशतवादांविरुध्द  नरमाईचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

  26. गोळीने किंवा हेटाळणीने नव्हे तर प्रेमानेच आपण काश्मीरची समस्या सोडवू शकतो.

  27. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुध्दची आमची लढाई सुरुच राहील. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

  28. दहशतवाद किंवा दहशतवाद्यांविरुध्द नरमाईचा  प्रश्नच उद्‌भवत नाही.

  29. व्यवस्थेप्रमाणे जनता नाही तर जनतेप्रमाणेच व्यवस्था चालली पिाहजे.

  30. नवीन भारत लोकशाहीची सर्वात मोठी ताकद असेल.

  31. मागणी आणि तंत्रज्ञानाच्या बदलानुसार रोजगाराचे स्वरुप बदलत आहे.

  32. आम्ही आमच्या युवकांना रोजगार मिळवणारा बनवण्यापेक्षा रोजगार देणारा बनवत आहोत.

  33. तीन-तलाकमुळे त्रास सहन करावा लागलेल्या महिलांच्या धैर्याचा  मी आदर करतो. आम्ही सर्वजण त्यांच्या  या आंदोलनात त्यांच्या सोबत आहोत.

  34. भारत हा शांती, एकता आणि सद्‌भावना यांचे प्रतिक आहे. जातीयवादाला येथे थारा नाही.

  35. आस्थेच्या नावाखाली हिंसाचाराला भारतात  स्वीकारले जाणार नाही.

  36. देश शांततासद्‌भावना आणि एकतेने वाटचाल करतो. सर्वाना बरोबर घेऊन जायचे हा  या देशाच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे.

  37. आपण देशाला विकासाच्या नव्या मार्गावर पूर्ण गतीने घेऊन चाललो आहोत.

  38. आम्ही पूर्व भारताकडे (बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, ओदिशा, ईशान्य भारत) प्रामुख्याने लक्ष  देत आहोत. या भागांचा आणखी विकास व्हायला हवा.

  39. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करण्यासाठी आमचे शेतकरी अधिक मेहनत घेत आहे.

  40. प्रधानमंत्री कृषी विमा योजनेंतर्गंत सुमारे 5.75 कोटी अधिक शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

  41. देश शांतताएकता आणि सद्‌भावनेने पुढे वाटचाल करत आहे.

  42. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत, 30 प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर 50 प्रकल्पावर काम सुरु आहे.  

  43. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत,शेतकऱ्याला बियाणे खरेदीपासून ते उत्पादन बाजारात जाईपर्यंत आम्ही  आधार पुरवत आहोत.

  44. जिथे अद्याप वीज पोहोचली नव्हती अशा, 14000 पेक्षा जास्त खेड्यात वीज पोहोचवण्यात आली.

  45. 29 कोटी जन धन खाती उघडण्यात आली.  

  46. कोणत्याही तारणाशिवाय 8 कोटीपेक्षा जास्त युवकांना कर्ज पुरवण्यात आले.

  47. भारताच्या उज्वल भविष्यासाठी आणि आपल्या जनतेच्या कल्याणासाठी आम्हीभ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहोत.

  48. काळा पैसा आणि  भ्रष्टाचाराविरोधातला आमचा लढा जारी राहीलदेशाची लूट होऊ दिली जाणार नाही.

  49. भ्रष्टाचारमुक्त  भारतासाठीच्या आमच्या प्रयत्नांना फळे येत आहेत.  

  50. 1.25 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा उघड.

  51. 1.75 लाखाहुन अधिक बनावट कंपन्या बंद करण्यात आल्या.

  52. वस्तू आणि सेवा कर लागू केल्यानंतर वाहतूक क्षेत्रात क्षमता वृद्धी,कार्यक्षमतेत 30 टक्क्यापर्यंत वाढ

  53. विमुद्रीकरणामुळेबँकात अधिक पैसा आल्याने त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना येईल.

  54. जगातील सर्वाधिक युवा वर्ग आपल्या देशात आहे.सध्या माहिती तंत्रज्ञानाचा दबदबा असून डिजिटल व्यवहारांच्या दिशेने वाटचाल करूया.

  55. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करूयाभीम अँपचा वापर करूया.

  56. सहकार्यात्मक संघीयवादाकडून आपण स्पर्धात्मक संघवादाकडे वळलो आहोत. 

  57. आपल्या पुराणशास्त्रात म्हटले आहे,की योग्य वेळी एखादे काम पूर्ण केले नाही तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.

  58. टीम इंडियानेनव भारत बनवण्याचा  संकल्प करण्याची हीच  योग्य वेळ.

  59. आपण सर्व मिळून असा भारत घडवू, जिथे गरिबाकडे पक्के घर असेल, त्यात वीज असेल, पाणी असेल.

  60. आपण सर्व मिळून असा भारत घडवू, जिथे,शेतकऱ्याला विवंचना नसतीलतो सुखाची झोप घेऊ शकेल,  त्याचे उत्पन्न आजच्यापेक्षा दुप्पट होईल.

  61. असा भारत घडवण्याचा निर्धार करूजिथे युवकांनामहिलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध असेल.

  62. असा भारत घडवण्याचा निर्धार आहेजिथे,दहशतवाद,जातीयवादाला थारा नसेल

  63. आपण सर्व मिळून असा भारत घडवुयाजिथे भ्रष्टाचारालावशिलेबाजीला  थारा नसेल

  64. आपण सर्व मिळून असा भारत घडवुयाजो स्वच्छतंदुरुस्त असेल आणि स्वराजाचे स्वप्न पूर्ण करेल. 

  65. दिव्य आणि भव्य भारत घडवण्याची आकांक्षा धरूया.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Global aerospace firms turn to India amid Western supply chain crisis

Media Coverage

Global aerospace firms turn to India amid Western supply chain crisis
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Former UK PM, Mr. Rishi Sunak and his family meets Prime Minister, Shri Narendra Modi
February 18, 2025

Former UK PM, Mr. Rishi Sunak and his family meets Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

Both dignitaries had a wonderful conversation on many subjects.

Shri Modi said that Mr. Sunak is a great friend of India and is passionate about even stronger India-UK ties.

The Prime Minister posted on X;

“It was a delight to meet former UK PM, Mr. Rishi Sunak and his family! We had a wonderful conversation on many subjects.

Mr. Sunak is a great friend of India and is passionate about even stronger India-UK ties.

@RishiSunak @SmtSudhaMurty”