केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या,अतिरिक्त सचिव आणि सह सचिवांच्या सुमारे 80 जणांच्या गटाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संवाद साधला. पंतप्रधान अशा प्रकारचे पाच संवाद साधणार असून त्यातला हा चौथा संवाद आहे.
प्रशासनात नाविन्य पूर्ण उपक्रम आणि सांघिक भावना,आरोग्य शिक्षण,कृषी,जल संसाधने, ई प्रशासन,कर प्रशासन, वस्तू आणि सेवा कर,व्यापारासाठी सुलभता,तक्रारींचे निवारण आणि बाल हक्क याविषयी या अधिकाऱ्यांनी आपले अनुभव विशद केले.
प्रशासन प्रक्रियेत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन, पंतप्रधानांनी या अधिकाऱ्यांना केले.सांघिक भावना वाढण्यासाठी,मानवी दृष्टिकोनाची आवश्यकता असून त्यामुळे उत्तम सामूहिक परिणाम साध्य होऊ शकतो असे पंतप्रधान म्हणाले.
भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आपल्याला अनुकूल असाच आहे याकडे लक्ष वेधत 2022 पर्यंत नव भारताची निर्मिती करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.