पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी ओएनजीसी अर्थात तेल आणि भूगर्भ वायू महामंडळाने एक आव्हान स्वीकारावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. वीजेचा वापर करुन स्वयंपाक करणे शक्य होईल, अशी सुलभ इलेक्ट्रीक शेगडी तयार करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी काम करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.सौभाग्य योजनेच्या शुभारंभ समारंभात पंतप्रधान ओएनजीसीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते.
या संशोधनामुळे देशाच्या आयात तेलावरील अवलंबित्वावर मोठा परिणाम होईल. सर्व जग इलेक्ट्रीक कारच्या दिशेने कार्य करत असतांना, भारतात लोकांच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रीक कारच्या बरोबरच इलेक्ट्रीक शेगडया मोठी मजल मारु शकतात, ओएनजीसीने या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी स्टार्टअप्स् आणि युवकांना आमंत्रित करावे, असे पंतप्रधानांनी सांगितले.