पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उज्वल डिस्कॉम आश्वासन योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला.कर्ज, देखरेख ठेवणारी यंत्रणा, वित्तीय निकषातली सुधारणा, कार्यात्मक कामगिरी,ग्राहक सबलीकरण अशा विविध पैलूंवर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी, पंतप्रधानांना माहिती दिली.
कोळसा खाणी आणि खाण पट्टे लिलावाबाबत, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. त्यावेळी, लिलावानंतर, खाणी जलदगतीने कार्यान्वित करण्याच्या पथदर्शी आराखड्यावर पंतप्रधानांनी भर दिला. खनिजे सापडण्याची शक्यता असलेले भाग शोधण्यासाठी सर्वेक्षण करताना, खाणींशी संबंधित सर्व विभागांमध्ये अधिक समन्वय ठेवावा असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासह आणखीही काही मंत्री,नीती आयोग,पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.