रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेंट पीटर्सबर्ग इथल्या दास्तान गुंजेकोईनेई बौद्ध मठाला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी या मंदिराचे मुख्य धर्मगुरु जाम्पा डोनर, बुडा बादमायेएव्ह यांना ‘उर्गा कांजुर’ या धर्मग्रंथाचे 100 खंड भेट दिले.
तिबेटन कांजुर ची उर्गा आवृत्ती 1955 पर्यंत अप्रकाशित होती. 1955 साली प्राध्यापक रघु वीरा यांनी त्याचे 104 खंड भारतात आणले. मंगोलियाच्या तेव्हाच्या पंतप्रधानांनी त्यांना हे ग्रंथ भेट दिले होते.
1908 ते 1920 या काळात हे कांजुर पुन्हा लिहून, संपादित करुन त्याची आवृत्ती काढण्यात आली.
PM presents Urga Kanjur to Jampa Donor, Buda Balzheivich Badmayev, Head Priest, Datsan Gunzechoinei Buddhist Temple, St Petersburg. pic.twitter.com/TINSiWKCDH
— PMO India (@PMOIndia) June 2, 2017