पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील वाद्यांच्या निर्यातीत वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
भारतातील वाद्यांच्या निर्यातीमध्ये, वर्ष 2013 मधील याच कालावधीच्या तुलनेत वर्ष 2022 च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीत 3.5 पेक्षा अधिक पटीने वाढ झाली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे एक ट्विट सामायिक करून, पंतप्रधानांनी ट्विट केले;
"हे उत्साहवर्धक आहे. भारतीय संगीत जगभर लोकप्रिय होत असताना, या क्षेत्रात आणखी वाढ करण्याची ही उत्तम संधी आहे."
This is encouraging. With Indian music gaining popularity worldwide, there is a great opportunity to further grow in this sector. https://t.co/bEyJmQ7BKP
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2022