QuoteTechnology is the bridge to achieve ‘Sabka Saath Sabka Vikas’: PM
QuoteChallenge of technology, when converted into opportunity, transformed ‘Dakiya’ into ‘Bank Babu’: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ब्रिजीटल नेशन’ या पुस्तकाचे आज अनावरण करुन त्याची एक प्रत रतन टाटा यांना नवी दिल्ली येथे 7 लोककल्याण मार्ग येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भेट दिली. हे पुस्तक एस. चंद्रशेखरन्‌ आणि रुपा पुरुषोत्तम यांनी लिहिले आहे.

|

तंत्रज्ञान: ‘सबका साथ, सबका विकास’ उदिृष्ट साध्य करण्यास जोडणीचे काम करणार

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, लेखकांनी आधुनिक युगात सकारात्मक आणि आशावादी दृष्टीकोन ठेवून तंत्रज्ञानाचे महत्व लोकांना या पुस्तकाद्वारे समजवून सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, हे पुस्तक अशावेळी प्रकाशित झाले जेव्हा दशलक्ष भारतीयांच्या जीवनात तंत्रज्ञानामुळे सकारात्मक परिवर्तन दिसून आले. त्यांनी तंत्रज्ञान समजून घेणे ही काळाची गरज असून हे तंत्रज्ञान उपयोगकर्ते आणि शासक यांच्यातल्या दुवा ठरेल यावर जोर दिला. तंत्रज्ञानामुळे आकांक्षा आणि उद्दिष्टपूर्ती, मागणी आणि वितरण, सरकार आणि प्रशासक यांच्यातली जोडणी साध्य होत असून यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’ सुकर होईल.


|

सरकारचा तंत्रज्ञानाद्वारे गेल्या पाच वर्षाचा प्रवास:

सुधारणा, परिवर्तन आणि कामगिरी याद्वारे सरकारी योजना राबवताना तंत्रज्ञान हा महत्वाचा घटक असल्याचे पंतप्रधानांनी उद्‌घृत केले. त्यांनी उज्ज्वला योजनेमध्ये टाटा इन्टलिजन्स, डिजिटल मॅपिंगद्वारे दशलक्ष महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. तसेच ‘जन धन’ योजना आणि ‘आयुष्मान भारत’ या योजना राबवताना तंत्रज्ञानाचा उपयोग लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी कसा झाला याबाबतही त्यांनी माहिती सांगितली.

तंत्रज्ञानाला संधींमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची निर्मिती हे एक उदाहरण आहे तसेच तंत्रज्ञानामुळे संपूर्ण टपाल विभागाला येणाऱ्या व्यत्ययाचे रुपांतर तंत्रज्ञान सुविधा बँकिग योजनेमध्ये केल्याने टपाल बँकद्वारे लाखो लोकांना फायदा झाला असून ‘पोस्टमनचे रुपांतर बँक बाबू’ मध्ये झाले आहे.

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian tea industry's export reaches decade high of 255 mn kg in 2024

Media Coverage

Indian tea industry's export reaches decade high of 255 mn kg in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 मार्च 2025
March 12, 2025

Appreciation for PM Modi’s Reforms Powering India’s Global Rise