Extraordinary transformation in India-Bangladesh relationship is a clear recognition of your strong and decisive leadership: PM Modi
Your decision to honour Indian soldiers who laid down their lives in 1971 war has deeply touched people of India: PM to Bangladesh PM
India has always stood for the prosperity of Bangladesh and its people: PM Modi
India will continue to be a willing partner in meeting the energy needs of Bangladesh: PM Modi
Agreement to open new Border Haats will empower border communities through trade and contribute to their livelihoods: PM
Bangabandu Sheikh Mujibur Rahman was a dear friend of India and a towering leader: PM Modi

माननीय,

पंतप्रधान शेख हसीना,

प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी

माननीय पंतप्रधान शेख हसीना यांचे भारतात स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे.

माननीय महोदया,

अतिशय शुभ प्रसंगी, पोयला बोइशाखच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भारत भेटीवर आला आहात. या निमित्ताने मी तुम्हाला आणि बांगलादेशच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा(शुवो नबा बर्षो). तुमची ही भारतभेट म्हणजे आपले देश आणि आपल्या देशाची जनता यांच्यातील मैत्रीचा आणखी एक शोनाली अध्याय(सुवर्ण अध्याय) निर्माण करत आहे. आपले संबंध आणि आपल्या भागीदारीने साध्य केलेल्या कामगिरीमुळे झालेले असामान्य परिवर्तन तुमच्या भक्कम आणि निर्णयक्षम नेतृत्वाची प्रचिती देत आहे. 1971च्या मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणा-या भारतीय सैनिकांचा सन्मान करण्याच्या तुमच्या निर्णयामुळे भारतीय जनता अतिशय भारावून गेली आहे. भारतीय सैनिक आणि बीर मुक्तिजोधा यांनी बांगलादेशला दहशतीच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी एकत्रितपणे दिलेला लढा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.

मित्रांनो,

आज, माननीय शेख हसीना आणि मी दोन्ही देशांच्या भागीदारीविषयीच्या सर्व पैलूंसंदर्भात अतिशय फलदायी आणि सर्वसमावेशक चर्चा केल्या. आमच्या सहकार्याचा जाहीरनामा पूर्णपणे उद्देशपूर्ण कृतीवर आधारित असावा याबाबत आमची सहमती झाली. आमच्या देशांच्या संबंधाना पुढे नेण्यासाठी नव्या संधींचा शोध घेणे आणि नवी दालने खुली करण्याकडे आम्ही विशेषत्वाने पाहात आहोत. आम्हाला नव्या क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य वाढवायचे आहे, विशेषतः उच्च तंत्रज्ञानाची काही क्षेत्रे, ज्यामध्ये आमच्या दोन्ही देशांच्या समाजातील तरुणांचा खोलवर संबंध असेल. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, अंतराळ संशोधन, नागरी अणुऊर्जा आणि इतर क्षेत्र यांचा त्यात समावेश असेल.

मित्रांनो,

बांगलादेश आणि या देशाची जनता यांच्या समृद्धीसाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आम्ही बांगलादेशचे एका दीर्घ काळापासूनचे आणि विकास प्रक्रियेतील विश्वासू भागीदार आहोत. आमच्या सहकार्याची फळे आमच्या जनतेला फायदा मिळवून देणारी असली पाहिजेत हा देखील भारत आणि बांगलादेशचा निर्धार आहे. यासंदर्भात मला बांगलादेशमधील प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमधील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सवलतीच्या दराने 4.5 अब्ज ड़ॉलरचे नवे कर्ज जाहीर करायला आनंद होत आहे. यामुळे गेल्या सहा वर्षात आम्ही बांगलादेशसाठी उपलब्ध करून दिलेल्या संसाधनाचे मूल्य 8 अब्ज डॉलरच्याही वर पोहोचले आहे. आमच्या विकासविषयक भागीदारीमध्ये उर्जा सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे आणि आमची उर्जाविषयक भागीदारी सातत्याने वृद्धिंगत होत आहे. भारतातून बांगलादेशमध्ये आधीपासूनच दिल्या जात असलेल्या 600 मेगावॅटची भर घातली आहे. सध्याच्या अंतर्गत जोडणीद्वारे आणखी 500 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्याचे देखील यापूर्वीच मान्य करण्यात आले आहे. नुमालीगढ ते परबतीपूर अशी डिझेल ऑइल पाइपलाईन जोडण्यासाठी देखील अर्थसाहाय्य देण्याचे आम्ही मान्य केले आहे. बांगलादेशाला हाय स्पीड डिझेलचा पुरवठा करण्यासाठी आमच्या कंपन्या दीर्घ मुदतीचे करार करत आहेत.

ही पाइपलाईन पूर्ण होईपर्यंत नियमित पुरवठा करण्यासाठी एका वेळापत्रकावरही आमची सहमती झाली आहे. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आम्ही दोन्ही देशातील कंपन्यांना प्रोत्साहन देत आहोत. आगामी दिवसांमध्ये बांगलादेशमधील उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात अनेक भारतीय कंपन्यांकडून करार होण्याची अपेक्षा आहे. बांगलादेशाच्या उर्जाविषयक गरजा भागवण्यासाठी आणि 2021 पर्यंत सर्वांसाठी उर्जा हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत नेहमीच एक उत्सुक भागीदार असेल.

मित्रांनो,

द्विपक्षीय विकासविषयक भागीदारीच्या यशस्वितेसाठी तसेच उपप्रादेशिक आर्थिक प्रकल्प आणि विशाल प्रादेशिक आर्थिक समृद्धीसाठी एकमेकांमधील संपर्कव्यवस्था फार महत्त्वाची आहे. आज, पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही आमच्या वाढत्या संपर्क व्यवस्थे संदर्भात आम्ही अनेक नव्या लिंकची आमच्या वाढत्या संपर्क व्यवस्थेत भर घातली आहे. कोलकाता व खुलना आणि राधिकापूर-बीरोल यांच्या दरम्यानची बस आणि रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अंतर्गत जलमार्ग योग्य प्रकारे वाहतूकयोग्य केले जात आहेत आणि किनारपट्टी नौवहन करार कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. दोन्ही बाजूंनी चालणा-या ट्रान्स शिपमेंट वाहतुकीमध्ये होत असलेली प्रगती पाहून आम्हाला आनंद होत आहे. बी. बी. आय. एन मोटर वाहन करार तातडीने अंमलात येण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. यामुळे उपप्रादेशिक एकात्मतेचा एक नवा अध्याय सुरू होऊ शकेल.

मित्रांनो,

पंतप्रधान शेख हसीना आणि मी आमच्या वाणीज्यविषयक भागीदारीमध्ये विविधता आणण्याची गरज लक्षात घेतली आहे. दोन्ही देशांदरम्यान केवळ विस्तृत व्यावसायिक भागीदारीला बळकट करण्याचाच नव्हे तर अधिक जास्त प्रादेशिक फायदे मिळवून देण्याचा त्यामागे उद्देश आहे. यामध्ये दोन्ही देशांचे व्यवसाय व उद्योग यांचा सर्वाधिक वाटा असला पाहिजे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सोबत आलेल्या उच्च अधिकारप्राप्त व्यावसायिक शिष्टमंडळाचे स्वागत करायला आम्हाला आनंद होत आहे. सीमेवर नवे हाट सुरू करण्याच्या आमच्या करारामुळे सीमेवरील समुदायांना व्यापाराच्या माध्यमातून सक्षम करता येईल आणि त्यांच्या चरितार्थामध्ये भर घालता येईल.

मित्रांनो,

आमच्या देशांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षणविषयक उपक्रम यांचे यश पंतप्रधान शेख हसीना आणि मी लक्षात घेतले आहे. बांगलादेशच्या 1500 सनदी सेवकांचे भारतातील प्रशिक्षण जवळजवळ पूर्ण झाले आहे. अशाच प्रकारे बांगलादेशच्या 1500 न्यायालयीन अधिका-यांना आमच्या न्यायालयीन शिक्षण संस्थांमध्ये आम्ही प्रशिक्षण देणार आहोत.

मित्रांनो,

आमच्या भागीदारीमुळे आमच्या जनतेला एकीकडे समृद्धी प्राप्त होत असताना, दुसरीकडे त्यांचे मूलतत्ववादी आणि कट्टरवादी शक्तींपासून रक्षण देखील होत आहे. या शक्तींचा प्रसार केवळ भारत आणि बांगलादेश यांच्यासाठीच नव्हे तर या संपूर्ण प्रदेशासाठी एक गंभीर धोका निर्माण करत आहे.

दहशतवादाशी सामना करण्यासाठी दाखवलेल्या खंबीर निर्धाराबद्दल आम्ही पंतप्रधान शेख हसीना यांची प्रशंसा करतो. दहशतवादाला अजिबात थारा न देण्याचे त्यांच्या सरकारचे धोरण आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शांतता, सुरक्षितता आणि आमच्या जनतेचा आणि या प्रदेशाचा विकास आमच्या भागीदारीच्या केंद्रस्थानी असेल याबाबत आम्ही सहमती व्यक्त केली आहे. आमच्या संरक्षण दलांमध्ये निकटचे सहकार्य निर्माण करण्यासंदर्भातही एका करारावर स्वाक्ष-या करून आम्ही एक बहुप्रतिक्षित मोठे पाऊल उचलले आहे. तसेच बांगलादेशाच्या संरक्षण संबंधित सामग्रीच्या खरेदीसाठी 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. हे कर्ज उपलब्ध करून देताना बांगलादेशाच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाच्या बाबींना विचारात घेतले जाईल.

मित्रांनो,

आमच्या दोन्ही देशांदरम्यान सर्वाधिक लांब सीमारेषांपैकी एक आहे. जून 2015 मध्ये माझ्या ढाका भेटीदरम्यान आम्ही भू-सीमा कराराची पूर्तता केली होती. त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे. आमच्या सामाईक भू-सीमांबरोबरच आमच्या नद्यादेखील सामाईक आहेत. त्यांच्यावर आमच्या देशातील जनतेचे जीवनमान आणि चरितार्थ अवलंबून आहे आणि यामध्ये सर्वाधिक लक्ष केंद्रित झाले आहे ते तीस्ता नदीवर. भारतासाठी, बांगलादेशसाठी आणि भारत-बांगलादेश संबंधांसाठी ती अतिशय महत्त्वाची आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज आमच्या सन्माननीय अतिथी असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. माझ्याप्रमाणेच बांगलादेशबाबत त्यांच्या भावना देखील तितक्याच जिव्हाळ्याच्या आहेत याची मला कल्पना आहे. मी तुम्हाला आणि बांगलादेशच्या जनतेला आमच्या बांधिलकीची व सातत्यपूर्ण प्रयत्नांची हमी देत आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की माझे सरकार आणि माननीय शेख हसीना, तुमचे सरकार हेच केवळ तिस्ता पाणीवाटपाबाबत तातडीचा तोडगा काढू शकेल आणि काढेल.

मित्रांनो,

बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान हे भारताचे प्रिय मित्र आणि उत्तुंग नेते होते. बांगलादेशच्या राष्ट्रपित्याबाबत आमची आदरभावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या राजधानीतील एका महत्त्वाच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. बंगबंधूचे जीवन आणि कार्य यावर आधारित एका चित्रपटाची संयुक्तपणे निर्मिती करण्याबाबतही आमची सहमती झाली आहे. हा चित्रपट 2020मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रदर्शित करण्यात येईल. पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत बंगबंधुंच्या अप्रसिद्ध स्मृतींचे हिंदी भाषांतर प्रकाशित करताना मला अतिशय सन्मान वाटत आहे. त्यांचे आयुष्य, संघर्ष आणि बांगलादेशच्या निर्मितीमधील योगदान नेहमीच भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहिल. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे 2021 मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी आम्ही बांगलादेश मुक्तिसंग्रामावर एक माहितीपट निर्माण करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे.

माननीय महोदया,

तुम्ही बंगबंधूचा वारसा आणि त्यांचा दृष्टिकोन यशस्वीरित्या पुढे नेत आहात. आज तुमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश उच्च वृद्धी आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. बांगलादेशबरोबरच्या संबंधांचे आम्ही भारतात स्वागत करत आहोत. हे संबंध आमच्या रक्तामध्ये मिसळून गेले आहेत आणि अतिशय दृढ नातेसंबंधांच्या पिढ्या निर्माण झाल्या आहेत. आमच्या जनतेच्या समृद्ध आणि सुरक्षित भवितव्याची निर्मिती करणारे हे संबंध आहेत. या शब्दांबरोबरच, महोदया मी पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करत आहे.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi