पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीआरएजीएटीआय-आयसीटीच्या बहुमाध्यमातून प्रोॲक्टीव गव्हर्नन्स आणि वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी आज 15 व्या अंतरकृती कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.
पंतप्रधानांनी आयकर प्रशासनाशी संबंधित तक्रारींचे उपाय शोधण्यासाठी पाहणी केली. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, करदात्यांनी सांगितलेल्या मोठ्या प्रमाणावरील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सक्षम यंत्रणा स्थापन करणे गरजेचे असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित तक्रारींचा निपटारा केला पाहिजे.
पंतप्रधानांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने’च्या अंमलबजावणीच्या विकासाची पाहणी केली. असे लक्षात आले की 12 अतिश्रीमंत खनिज राज्यांद्वारे 3,214 कोटी रुपये गोळा करण्यात आले असून यापेक्षा जास्त रक्कम अपेक्षित आहे.
त्यांनी राजस्थान, आसाम, मेघालय, सिक्कीम, प.बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर इत्यादी राज्यांच्या रस्ते, रेल्वे, ऊर्जा क्षेत्र या पायाभूत प्रकल्पांच्या विकासाची पाहणी केली.