माननीय अध्यक्ष मून,
येथे उपस्थितीत सर्व प्रतिनिधी,
प्रसार माध्यमातील मित्रांनो,
राष्ट्रपती मून यांच्या भारतातील पहिल्या राजकीय दौऱ्यादरम्यान त्यांचे स्वागत करणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
अंदाजे एका वर्षापूर्वी हॅमबर्ग येथे G-20 परिषदे दरम्यान राष्ट्रपती मून यांच्यासोबत पहिल्यांदा माझी भेट झाली होती. आणि यावेळी मी त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. आज संपूर्ण विश्व कोरियन द्विकल्पात घडत असलेल्या घटनाक्रमाकडे खूप बारकाईने पाहत आहे. अशा परिस्थित त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून भारत दौऱ्यासाठी वेळ काढला आहे. आणि यासाठी मी त्यांचे विशेष आभार मानतो.
मित्रांनो,
कदाचित खूप कमी लोकांना हे माहित असेल की, भारत आणि कोरिया मधील संबंध हे कौटुंबिक आहेत. शेकडो वर्षांपूर्वी अयोध्येची एक राजकुमारी, सुरी-रत्ना यांचा विवाह कोरियाच्या एका राजाशी झाला होता. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आजही कोरियामध्ये लाखो लोकं स्वतःला त्यांचे वंशज मानतात. आधुनिक काळांतही, भारत आणि कोरियाचे संबंध मजबूत होते. कोरियातील युद्धकाळात, भारताच्या पॅराशूट फील्ड एम्बुलेंस युनिटच्या कामाची प्रशंसा आजही केली जाते.
मित्रांनो,
कोरियाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती हे जगातील एक अद्वितीय उदाहरण आहे. कोरियाच्या सामान्य जनतेने हे दाखवून दिले आहे की, जर कोणता देश समान दृष्टी आणि उद्देशाप्रती वचनबद्ध झाला तर अशक्य लक्ष्य देखील सहज साध्य करू शकतो.
कोरियाची ही प्रगती भारतासाठी देखील प्रेरणादायी आहे. आणि ही खूप आनंदाची बाब आहे की कोरियातील कंपन्यांनी भारतामध्ये केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकच केली नाही, तर आमच्या “मेक इन इंडिया” अभियानात सहभागी होऊन भारतामध्ये रोजगाराच्या संधी देखील निर्माण केल्या आहेत. कोरियन कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवल्यामुळे, कोरियन उत्पादनांनी भारताच्या घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे.
मित्रांनो,
आजच्या आमच्या चर्चेत आम्ही केवळ आमच्या द्विपक्षीय संबंधांचाच आढावा घेतला नाही तर क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवर देखील आमच्या विचारांचे आदान प्रदान केले.मला असे वाटते की, धोरणात्मक स्तरावर भारताची अॅक्ट इस्ट पॉलिसी आणि कोरियाची न्यू सदर्न स्ट्रॅटेजीमध्ये एकसमानता आहे. राष्ट्रपती मून यांच्या, भारत आणि कोरियाच्या संबंधांमध्ये त्यांची न्यू सदर्न स्ट्रॅटेजी ही एक आधारस्तंभ आहे या विचाराचे मी हार्दिक स्वागत करतो.
आमच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एक दृष्टी परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. आमच्या विशेष धोरणात्मक भागीदारीला अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे. या संबंधांचा एक स्तंभ आमचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. आज थोड्यावेळाने आम्ही दोन्ही देशांच्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊ. आपले व्यापार आणि गुंतवणूक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या सूचना मिळतील अशी आशा मला वाटते.
मला आनंद आहे की, आमच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराला अद्ययावत करण्याच्या दिशेने आम्ही आज अर्ली हार्वेस्ट पॅकेजच्या स्वरुपात ठोस पाऊल उचलले आहे. भविष्यातील आमचे संबंध आणि जगात तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे जलद बदल यांना लक्षात घेत आम्ही एकत्रितपणे नवोन्मेश सहकार्य केंद्र आणि भविष्य धोरण गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो,
कोरियन द्विकल्पामध्ये शांती प्रक्रियेला गती देणे, ती कायम ठेवणे याचे संपूर्ण श्रेय राष्ट्रपती मून यांना जाते. मला असे वाटते की, जी सकारात्मक वातावरण निर्मिती झाली आहे ती राष्ट्रपती मून यांच्या अथक प्रयत्नांचेच फलित आहे. या प्रगतीसाठी मी राष्ट्रपती मून यांचे अभिनंदन करतो. आजच्या आमच्या चर्चेत मी त्यांना सांगितले की, पूर्वोत्तर आणि दक्षिण आशियाचे वाढते संबंध हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. आणि म्हणूनच या शांती प्रक्रियेच्या यशात भारत देखील एक लाभधारक आहे.
तणाव कमी करण्यासाठी जेवढी मदत शक्य आहे तेवढी आम्ही नक्कीच करू. सचिव स्तरावरील चर्चा आणि मंत्रीस्तरीय संयुक्त आयोगाच्या आगामी भेटी या संदर्भात खूप महत्वपूर्ण ठरतील.
मित्रांनो,
मी पुन्हा एकदा राष्ट्रपती मून, त्यांची धर्मपत्नी आणि प्रतिनिधी मंडळांचे भारताचे हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या सर्व शांती प्रयत्नांना भविष्यात यश प्राप्त होवो यासाठी मी माझ्यातर्फे आणि सव्वाशे कोटी भारतीयांतर्फे त्यांना अनेक शुभेच्छा देतो.
दासी-मान्नायो. (पुन्हा भेटूया)
गोम्प-सुमनिदा. (धन्यवाद)
आपण पुन्हा भेटूया.
खूप खूप धन्यवाद .
कोरिया गणराज्य की प्रगति विश्व में अपने आप में एक अनूठा उदाहरण है। कोरिया के जनमानस ने दिखाया है कि यदि कोई देश एक समान vision और उद्देश्य के प्रति वचनबद्ध हो जाता है तो असंभव लगने वाले लक्ष्य भी प्राप्त किए जा सकते हैं। कोरिया की यह प्रगति भारत के लिए भी प्रेरणादायक है: PM
— PMO India (@PMOIndia) July 10, 2018
यह बहुत प्रसन्नता का विषय है कि कोरिया की कंपनियों ने भारत में न सिर्फ़ बड़े स्तर पर निवेश किया है, बल्कि हमारे Make in India mission से जुड़ कर भारत में रोजगार के अवसर भी पैदा किया हैं: PM
— PMO India (@PMOIndia) July 10, 2018
भारत की Act East Policy और कोरिया गणराज्य की New Southern Strategy में स्वाभाविक एकरसता है। मैं राष्ट्रपति मून के इस विचार का हार्दिक स्वागत करता हूँ कि भारत और कोरिया गणराज्य के संबंध उनकी New Southern Strategy का एक आधार स्तम्भ हैं: PM
— PMO India (@PMOIndia) July 10, 2018
हमारी बातचीत के परिणामस्वरूप एक vision statement जारी किया जा रहा है। हमारा focus अपनी Special Strategic Partnership को मजबूत करने पर है।
— PMO India (@PMOIndia) July 10, 2018
इस relationship का एक स्तम्भ हमारे आर्थिक और व्यापारिक संबंध हैं: PM