The values and principles of democracy and rule of law are common to both our nations: PM Modi
Both India and Australia recognize the central value of education and innovation in the prosperity of our societies: PM Modi
Would like to thank Prime Minister for Australia's decision to join the International Solar Alliance: PM
India and Australia have made major strides in our bilateral relations in recent years: PM Modi

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान श्री माल्कम टर्नबुल ,माध्यम प्रतिनिधी आणि मान्यवर,

आपल्या पहिल्या वाहिल्या भारतभेटीत आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्याच महिन्यात आपण दोन्ही देशांच्या बॉर्डर-गावस्कर क्रिकेट चषक स्पर्धेचा चित्तवेधक अनुभव घेतला.ऑस्ट्रेलियाच्या संसदेत २०१४ साली मी केलेल्या भाषणात मी सर ब्रडमन आणि तेंडुलकर या दोघांचा उल्लेख केला होता. आज भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ हे क्रिकेटमधल्या युवा खेळाडूना आकार देत आहेत. मला आशा आहे, की तुमचा भारतातील दौरा हा स्मिथच्या फलंदाजीसारखाच फलदायी ठरेल.

मान्यवर महोदय ,

जी २० शिखर परिषदे दरम्यान आपल्या झालेल्या भेटी मला व्यवस्थित स्मरणात आहेत. त्या भेटींमध्ये एक निश्चित उद्देश आणि एकत्रित काम करण्याची इच्छाशक्ती होती. आपल्या संयुक्त उपक्रमांना पुढे नेण्यात तुम्ही दाखवलेली रुची आणि सक्रीय सहभागाबद्दल मी आपले व्यक्तिशः आभार मानतो. आपल्या सहकार्याचा हा प्रवास एका निश्चित आणि योग्य दिशेने होतो आहे. आपल्या नेतृत्वाखाली आपल्यातील संबधानी मैलाचा दगड गाठला आहे. आपल्या राजनैतिक भागीदारीत नवे प्राधान्यक्रम निश्चित करण्याची संधी आज तुमच्या भेटीमुळे आम्हाला मिळाली आहे.

मान्यवर महोदय ,

हिंदी महासागराच्या जलामुळे प्रस्थापित झालेल्या आपल्या दोन्ही देशांमधल्या ऐतिहासिक संबंधांची मला आठवण होते. हा महासागर आपल्या एकत्रित भाग्योदयाचेही निदर्शक आहे. आपल्या दोन्ही देशांमध्ये लोकशाहीची तत्वे आणि कायद्याचे राज्य याविषयीची मूल्ये समान आहेत. आज, सव्वाशे कोटी भारतीयांची आर्थिक प्रगतीची आस आणि ऑस्ट्रेलियाची क्षमता आणि ताकद या दोन परस्पर समन्वय असलेल्या बाबींमुळे आपल्यातले संबध अधिक दृढ करण्यास संधी निर्माण झाली आहे.

मित्रांनो,

आज आमच्यात झालेल्या चर्चेत,मी आणि पंतप्रधान टर्नबुल यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. आपली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. यात सर्वसमावेशक वित्तीय सहकार्य कराराच्या वाटाघाटी सुरु करण्याचीही चर्चा झाली. मला इथे विनोदाने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आम्ही घेतेलेले निर्णय हे क्रिकेटमधल्या ‘डी आर एस’ सारखे म्हणजेच निर्णय पुर्नआढावा प्रक्रियेतून जाण्यास बांधील नाहीत.

आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आणि संशोधन यांचे मध्यवर्ती स्थान आहे, ही गोष्ट भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश जाणून आहेत. त्यामुळेच, ही अजिबात आश्चर्याची गोष्ट नाही, की शिक्षण आणि संशोधन हा आमच्यातल्या संबधातला सर्वात महत्वाचा पैलू आहे. मी आणि पंतप्रधान टर्नबुल यांनी आताच नैनो आणि जैवतंत्रज्ञानविषयक टेरी- डायकिन संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. दोन्ही देशांमधे विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य अधिक बळकट करण्याविषयीचे हे केंद्र म्हणजे समर्पक उदाहरण आहे. दोन्ही देशांनी संयुक्तरीत्या उभा केलेला १०० दशलक्ष डॉलर्सचा संशोधन निधी नैनो तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी, पायाभूत सुविधा, कृषी आणि रोगनियंत्रण अशा क्षेत्रामधे संशोधन करण्यासाठी वापरला जाणार आहे. केळे आणि अ जीवनसत्व याविषयीचे आपले संयुक्त संशोधन पूर्ण झाले असून ते आता प्रत्यक्ष चाचणीसाठी वापरले जात आहे. डाळींच्या अधिक पोषणद्रव्य असलेल्या जातींवरही आमचे संशोधक काम करत आहेत. दोन्ही देशातील लोक, विशेषतः शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये काही नवे संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक सहकार्याची ही केवळ दोन उदाहरणे आहेत. पंतप्रधान टर्नबुल यांच्यासोबत व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांच्या कुलगुरूंचे शिष्टमंडळ आले आहे, त्यांचेही मी स्वागत करतो. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधल्या अनेकविध संस्थांमध्येही करार करण्यात आले. दोन्ही देशांमधील शैक्षणिक संबंधातील महत्वाचा भाग म्हणजे विद्यार्थी एकमेकांच्या देशात शिक्षणासाठी जाणे हा होय.ऑस्ट्रेलियामध्ये ६० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी शिकतात. तसेच भारतात येणाऱ्या ऑस्ट्रेलियन विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढते आहे. भारतीय युवकांच्या आशा आकांक्षांना प्रतिसाद देत भारतात जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था उभारणे, हे माझ्या सरकारचे लक्ष्य आहे. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे भारतीय विद्यापीठांशी जोडून या उद्दिष्टासाठी भारताला कशाप्रकारे मदत करु शकतील, पंतप्रधान टर्नबुल आणि मी मिळून आज चर्चा केली आहे.

मित्रांनो,

आपला आर्थिक विकास आणि समृद्धी साधताना आपण पर्यावरणाप्रति संवेदनशील असायला हवे यावर पंतप्रधान टर्नबुल आणि मी ,दोघांचाही दृढ विश्वास आहे. आम्हाला समाधान आहे की शाश्वत उर्जेसह, उर्जेच्या इतर प्रकारांविषयी आमच्यात संवाद आणि चर्चा सुरु आहे. ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा सहकार्य गटात सहभागी झाल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. तसेच,ऑस्ट्रेलियाच्या संसदेने द्विपक्षीय सहकार्याचे विधेयक संमत केल्यानंतर, आता ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा होऊ शकेल.

मित्रांनो,

भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य यावर दोन्ही देशांचे भविष्य अवलंबून आहे , याची आम्हा दोघांनाही जाणीव आहे. त्यामुळेच या क्षेत्रात काही नियम आणि सुरक्षेचे कायदे पाळले जावेत, यावर आमची सहमती आहे. आज जागतिकीकरण वेगाने घडत असताना,दहशतवाद आणि सायबर सुरक्षेसारखे धोके आता देशांच्या सीमा ओलांडून संपूर्ण प्रदेशासाठीच विघातक ठरत आहेत, याचीही आम्हाला कल्पना आहे.

आणि म्हणूनच, यावर जागतिक पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. दोन्ही देशाना भेडसावणाऱ्या या संकटांचा सामना करण्यासाठी प्रादेशिक व जागतिक प्रश्नाबाबत पंतप्रधानाची परिपक्व समज आणि दूरदृष्टी परस्पर सहकार्य वाढवण्यात नक्कीच उपकारक आहे.

संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रात आपले सहकार्य एका नव्या उंचीवर पोहचले आहे. संयुक्त सागरी अभ्यास आणि आदानप्रदान दोन्ही देशांसाठी उपयुक्त आहे. दहशतवादविरोधी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे तपास मोहिमेत दोन्ही देशांच्या यंत्रणा समन्वयातून काम करत आहेत. या भेटीदरम्यान, दोन्ही देशात सुरक्षा सहकार्यविषयक सामंजस्य करार पूर्ण झाला, याचे मला विशेष समाधान आहे. आपल्या प्रदेशाचा समतोल राखण्यासाठी तसेच, शांतता, समृद्धी कायम ठेवण्यासाठी सक्षम प्रादेशिक संस्था आवश्यक असल्याबाद्ल दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.त्यामुळेच, पूर्व आशिया शिखर परिषद आणि हिंदी महासागर क्षेत्रातील देश यांच्यासोबत काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

दोन्ही देशातील समाजांमध्ये असलेले संबंध हे आमच्या भागीदारीचे मुख्य स्तंभ आहेत. सुमारे पाच लाख भारतीय नागरिकांचे ऑस्ट्रेलियात वास्तव्य आहे. ‘कन्फ़्लुएन्स’, हा भारतीयांचा एकत्रित सोहळा गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील अनेक शहरात यशस्वीपणे आणि उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने केलेली मदत आणि पाठींबा याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो.

मान्यवर महोदय,

गेल्या काही वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या द्विपक्षीय भागीदारीत वेगाने वाढ झाली आहे.येत्या काही काळात दोन्ही देशांसाठी परस्पर सहकार्याची ग्वाही आणि संधी आम्हाला दिसते आहे. आमच्यातील ही भागीदारी दोन्ही देशांची सुरक्षा आणि समाजाच्या कल्याणासाठी लाभदायक तर आहेच, पण प्रादेशिक शांतता स्थैर्य आणि सुरक्षेसाठीही ती महत्वाची बाब आहे. यासोबतच महोदय, मी पुन्हा एकदा भारतात आपले स्वागत करतो आणि आपला हा दौरा फलदायी ठरो, अशा शुभेच्छा देतो.

धन्यवाद !

खूप खूप धन्यवाद !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.