गुरुग्राम येथे हरियाणा राज्याच्या सुवर्ण जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले.
हरियाणा राज्याची निर्मिती झाली होती, तो दिवस आठवण्याचा आणि ज्या हेतूने या राज्याची निर्मिती झाली होती, तो हेतू आठवण्याचा आजचा दिवस आहे , असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
हरियाणा हे तुलनात्मकरित्या लहान राज्य असले तरी या राज्याने विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिले आहे. हरियाणा हे शेतकऱ्यांचे राज्य आहे, असे मानले जाते. मात्र या राज्यातील उद्योजकांनी असामान्य यश मिळविले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
देशाच्या सैन्यात भरती होऊन हरियाणाच्या अनेक नागरिकांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले आहे, असेही ते म्हणाले.
अशा विशेष राज्यात स्त्री-भ्रूण हत्या होणे योग्य नाही, असे सांगत हरियाणा राज्याने स्त्री-भ्रूण हत्या होऊ नये यासाठी आता अनेक प्रयत्न सुरु केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हरियाणाच्या प्रत्येक नागरिकाने बालिकांच्या रक्षणाची शपथ घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या सुवर्ण महोत्सवी वर्षात हरियाणातील नागरिकांनी आपले राज्य उघडयावरील शौचमुक्त करावे, असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या गावांपासून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु व्हावी असे सांगत, ती सुरु होईल तेव्हा हरियाणाच्या विकासाला खऱ्या अर्थाने उत्तेजन मिळेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
Today is a day to look back at the time when Haryana was formed and the aims with which the state was formed: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
The Prime Minister is speaking at the golden jubilee celebrations of Haryana state. Watch LIVE. https://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
Haryana is a relatively small state but it has contributed in so many areas: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
It is believed that Haryana has only farmers but see the exemplary success of businessmen from Haryana: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
People of Haryana have given their lives for the nation by serving in the armed forces: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
In such a distinguished state, female foeticide cannot exist. Haryana has undertaken an effort to ensure female foeticide doesn't happen: PM
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
The daughters of Haryana have made India very proud on multiple occasions: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
Let every citizen of Haryana pledge to protect the girl child: PM @narendramodi during golden jubilee celebrations of Haryana state
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
Let us think about making Haryana ODF in this golden jubilee year: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016
May the process of transformation begin in our villages and when this happens, the development of Haryana will receive an impetus: PM
— PMO India (@PMOIndia) November 1, 2016