PM Modi inagurates first of a kind global textiles exhibition – #TextilesIndia2017
Textile sector offers significant employment opportunities and it was the second largest employer after agriculture: PM
Our government is emphasizing the growth of textile sector: PM Modi
We have one the most liberal policies in textiles and apparels sector: PM Modi

टेक्सटाईल इंडिया 2017 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्रातला  हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे ज्यामध्ये जगभरातल्या 100  पेक्षा जास्त देशांनी हजेरी लावली आहे.वस्त्रोद्योग मंत्रालयया कार्यक्रमाचे आयोजकयात सहभागी झालेले उद्योजककारागीरया सर्वाना शुभेच्छा देतोत्यांचे अभिनंदन करतो. 

केंद्र सरकार आणि देशातली वेगवेगळी राज्य सरकारे आणि वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व लोक  पहिल्यांदाच एकत्र आले आहेत आणि या मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाद्वारेसंपूर्ण जगाला भारतीय  वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या संधीचे दर्शन घडवत आहेत.

 

वस्त्रोद्योग एक असे क्षेत्र आहे जे कृषी आणि उद्योग या मधला सेतू म्हणून काम करते.कापूस असो रेशीम उत्पादन असोत्याचे अंतिम उत्पादन जास्त करून  वस्त्रोद्योग  क्षेत्रावर अवलंबून असते. शेतकऱ्याच्या मेहनतीतून पिकवलेला हा कच्चा मालबाजारात आणण्याचे काम हे वस्त्रोद्योग क्षेत्र करते.म्हणजेच एका दृष्टीने वस्त्रोद्योगहे कृषी आणि उद्योग या दोन्हीचा भाग आहे. 

भारताच्या इतिहासात  कोणत्या उद्योग क्षेत्राला नेहमीच महत्व  राहिले असेल तर ते  वस्त्रोद्योग क्षेत्र आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय शास्त्रात वस्त्रमहिमा वर्णन आढळते.शेकडो वर्षांपूर्वीही हा वस्त्रोद्योगदुसऱ्या देशांबरोबरव्यापाराचा मुख्य आधार राहिला होता. ज्या मार्गाने कपडे आणि धाग्यांची दुसऱ्या देशात वाहतूक केली  जायचीत्या रस्त्यालाही कोणत्या ना कोणत्या धाग्याच्या नावावरून ओळखले जायचे या मार्गाने अनेक विदेशी पर्यटक भारताविषयी जाणून घ्यायला इथे आले आणि  महान भारतीय संस्कृतीच्या दर्शनाने भारावून गेले.आपल्या साहित्यातही त्यांनी भारतीय वस्त्रे आणि वस्त्रोद्योगाची ताकत यांना ठळकपणे स्थान दिले.

वेग-वेगळ्या कालखंडात आपल्या देशाच्या साहित्यात याची छाप पडलेली दिसून येते.साधारणतः दीड वर्षांपूर्वीचेन्नई मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय हातमाग दिनाचा कार्यक्रम झाला होता त्यावेळी मला,बनारसमधल्या एका  विणकर बांधवाने उपरण्यासारखे वस्त्र दिले होते. त्यावर कबीरदास यांचा प्रसिद्ध दोहा हाताने विणला होता


झीनी झीनी बिनी चदरिया 

काहे के ताना काहे के भरनी, कौन तार से बिनी चदरिया।

कबीर स्वतः सूत कातत  असतकापड विणत असत आणि कापडाला रंगही देत असत.त्यांनी केवळ आपल्या कामात जीवनाच्या सत्याचा शोध घेतला असे नव्हे तर त्या कामातले शब्द  घेऊन दोह्यांमधून ते व्यक्तही केले.

मित्रहोवस्त्रआपल्या सांस्कृतिक विविधतेशी जोडले गेले आहे.आपण असेही म्हणू शकतो की वस्त्रआपल्या देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक राहिले आहे. अनेक शहरे आणि भागाची ओळखतिथल्या वस्त्रोद्योग उद्योगामुळे निर्माण झाली आहे.कांचीपुरमबनारस,आसामचे रेशीम असोकाश्मीरचे पश्मिना आणि जामावर  असो,बंगालमधले मुस्लिन असोलखनौमधले चिकन काम असोओडिशा आणि तेलंगणा मधले हाताने विणलेले इक्कत असो,गुजरातमधले पटोला असोशेकडो वर्षांपासून ते आपापल्या क्षेत्राची ओळख देत आहेत.

 

उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग

जागतिक अर्थव्यवस्थेतभारताचे  वर्णनदैदीप्यमान स्थान असे करण्यात आले आहे. जागतिक गुंतवणुकीसाठी एक आकर्षक स्थान म्हणून भारत झपाट्याने पुढे येत आहे.धोरणात्मक पुढाकार  घेण्याच्या अविरत सुरु ठेवलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. 

व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठी सात हजारहून अधिक सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शी करण्यात आल्या आहेत.बाराशेहून अधिक कालबाह्य कायदेसरकारने मोडीत काढले आहेत.ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. 

जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मकता सूचि मध्येगेल्या दोन वर्षात भारताने 32 स्थानांची झेप घेतली आहे. एखाद्या देशाने घेतलेली ही सर्वोच्च झेप आहे.2016  च्या  जागतिक बँक लॉजिस्टिक कामगिरी सूची मध्ये भारताने 19 स्थानांची प्रगती केली आहे.2016 मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संस्थेच्या जागतिक नाविन्यता सूची मध्ये भारताने  16 स्थानांची भरारी घेतली आहे.व्यापार आणि विकास यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेच्यापरकीय थेट गुंतवणुकीसाठीच्यासर्वोच्च दहास्थानांमध्ये आपला तिसरा क्रमांक आहे. 

मेक  इन इंडिया अभियानावर आधारित संघटित वस्त्रोद्योग,कौशल्यगती हा मूलमंत्र घेऊन,पर्यावरणाची हानी न करणारे  उत्पादन आणि रोजगार तसेच निर्यात वृद्धी  यांची सांगड घालत आहे. 

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आपली उदार गुंतवणूक धोरणे आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आपण  100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.

उपस्थित महिला आणि पुरुषवर्ग

भारतीय अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योगाला महत्वाचे स्थान आहे.कापूसलोकररेशीमतागआणि मानव निर्मित धागे  यासारख्या कच्च्या मालाची भारतात विपुलता आहे.भारत हा जगातला सर्वात मोठा कापूस आणि ताग उत्पादक देश आहे,रेशीम आणि मानव निर्मित धाग्याचा दुसरा मोठा उत्पादक देश आहे.  याशिवायभारताकडे कताई,   विणणे आणि वस्त्र प्रावरणे  उत्पादनाच्या दृढ क्षमता आहेत.युवाकुशल कामगार वाजवी दरात उपलब्ध आहे. 

आपल्या वाढत्या विकास दरामुळे क्रय शक्ती वाढली आहे.त्याच्या परिणामीउत्पादनासाठी मागणी  मोठ्या प्रमाणात  वाढली आहेत्यामुळे देशांतर्गत प्रचंड बाजारपेठ निर्माण होत आहे. आकांक्षा बाळगणारा आपला युवा वर्ग,वस्त्रोद्योगवस्त्रप्रावरणे आणि हस्तकला उत्पादनावर खर्च करू इच्छितो.वस्त्र प्रावरणे आणि जीवन शैली साठीची उत्पादने यासाठीची सध्याची देशांतर्गत बाजारपेठ 85  अब्ज अमेरिकी डॉलर अंदाजित आहे तर 2025 पर्यंत ती 160 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचेल असा अंदाज आहे. वाढत्या मध्यम वर्गामुळे या विकासाला चालना मिळेल. 

आपल्या देशात उत्पादित  कापड आणि वस्त्र प्रावरणे यांना जगात मोठी मागणी आहे.  कापड क्षेत्राचा 5 टक्के हिस्सा बाळणाराभारत हा जगातलादुसरा मोठा कापड  निर्यातदार देश आहे. पारंपरिक हातमाग आणि हस्तशिल्प उत्पादनासहभारतीय कापडशंभरहून अधिक देशांना निर्यात केले जाते.कधी कधी भारतीय पर्यटकपरदेशात कपडे खरेदी करतातत्यानंतर हे कपडे भारतातच तयार झाल्याची जाणीव त्यांना होते. वस्त्रोद्योग क्षेत्र मोठ्या रोजगार संधी देऊ करते. सद्य स्थितीत,रोजगार पुरवणारेकृषी क्षेत्रानंतरचे ते दुसरे मोठे क्षेत्र आहे. 45  दशलक्ष  पेक्षा जास्त लोकांना या वस्त्रोद्योग क्षेत्रात थेट रोजगार आहे तर 60 दशलक्षपेक्षा जास्त लोकांना  या क्षेत्राच्या पूरक क्षेत्रात रोजगार पुरवला जात आहे. 

हे ध्यानात घेऊनचसरकारवस्त्रोद्योग क्षेत्रावर विशेष लक्ष देत आहे.गेल्या वर्षी एक वस्त्रोद्योग पॅकेज दिले गेले.त्याअंतर्गत वस्त्रप्रावरणे आणि निर्मिती क्षेत्राला बळ देण्यात आले. 

वस्त्रप्रावरणे आणि निर्मिती क्षेत्रातनव्या श्रमिकांना रोजगार पुरवणाऱ्या कंपनी किंवा मालकाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी साठी जी 12 टक्के रक्कम दिली जाते ती रक्कम सरकार स्वतः देणार आहेअशा पद्धतीने ही आर्थिक मदत केली जाईल. 

याशिवाय सरकारने वस्त्रप्रावरणे क्षेत्रात निश्चित मुदतीच्या रोजगाराचा मार्गही खुला केला आहे.म्हणजेच या कामगारांना एका विशिष्ट काळासाठी नियुक्ती मिळेल आणि त्या कालावधीत त्यांनाएखाद्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व सुविधा पुरवण्यात येतील.यामुळेही कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा होईल. 

 

उपस्थित स्त्री-पुरुषहो

कुशल मनुष्य बळाची कमतरता भरून काढण्यासाठीउद्योग केंद्री प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे एकात्मिक कौशल्य विकास योजना राबवण्यात येत आहे. 

उत्पादन आणि निर्यात या आपल्या शक्ती स्थानांना,  जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्था विकसित करण्याच्या क्षमतेची जोड देण्यात येत आहे. 

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेचेव्यावसायिक दृष्ट्या व्यवस्थापन करण्यात येणाऱ्या   16  परिसरांचे जाळे   आहे. फॅशन शिक्षणसंशोधन आणि विकासप्रशिक्षण आणि सल्ला यासारख्या विभागात ही संस्था महत्वाची भूमिका बजावत आहे. 

आपापल्या राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी निकोप स्पर्धा आपण गेल्या वर्षात अनुभवली.परिणामी राज्यांमध्ये काही महत्वाच्या सुधारणा झाल्या. प्रत्येक राज्यानेवस्त्रोद्योगासहित नव्या उद्योगांच्या उभारणीला सुविधा देण्याचा आपापल्या परीने प्रयत्न  केला. 

प्राप्ती कर कायद्यांतर्गतही या क्षेत्रातल्या कंपन्यांना सूट देण्यात आली आहे.ज्या उत्पादन कारखान्यात कमीत कमी 100  कामगार आहेत अशा कारखान्याने  एखाद्या नव्या कामगाराला 150 दिवसांचा रोजगार दिल्यास त्यालाही कर सवलत दिली जाते. कापड निर्यातीवर मोठ्या प्रमाणात लक्ष  केंद्रित करण्याची ही वेळ आता आली आहे असे मला वाटते. 

भारत हा  वैविध्यपूर्ण परंपरापेहेरावाच्या वैविध्यपूर्ण पद्धती यांनी नटलेला देश आहे.विविध भागातल्या पेहेरावाच्या पद्धतीत ही विविधता स्पष्ट प्रतिबिंबित होते.हे वैविध्य आपण सूचिबद्ध करून प्रत्येक राज्य आणि विभागाच्या वैशिष्ट्याचा छाप आपण निश्चित करायला हवा. प्रत्येक राज्यानेसुपरिचित अशा उत्पादनासाठी  उत्पादक आणि व्यापाऱ्यांना मदत  करण्याच्या दृष्टीने  नोडल अधिकारी नेमावेत.देशांतर्गत आणि निर्यात बाजाराच्या विशिष्ट गरजांची याद्वारे पूर्तता करण्यात यावी. 

जागतिक बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणात असलेले कल लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि फॅशन जगतातले समयोचित  नवे  कल जाणून घेण्यासाठी आपण कृती आराखडा तयार करायला हवा. यासंदर्भात सरकारी परिषद आणि उद्योगविषयक मंडळे यांच्यातले सहकार्य  आणखी वाढायला हवे.यामुळे या गरजा भागवण्यासाठी आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला मदत होईल.

 

मित्रहो

विकास आणि समृद्धीसाठी नावीन्य आणि संशोधन हे दोन नवे मंत्र असून या  उद्योगालाविकासासाठी,सातत्याने नावीन्य आणि संशोधनाची जोड देऊन नव्या  बाजारपेठेचा शोध घ्यावा लागेल.उदाहरणच द्यायचे   झाले तर जगातल्या काही भागातल्या लोकांची शरीरयष्टी इतरांपेक्षा जास्त मोठी असू शकतेत्यामुळे  त्यांना आपल्या देशात  साधारणतः वापरल्या जाणाऱ्या कपडयांच्या मापापेक्षा जास्त रुंदीचे कपडे लागतील.यासाठी आपल्याला हातमागाचा आकार वाढवावा लागेल. इतरत्र गरजा  वेगवेगळ्या असू शकतात.निर्यात बाजारपेठेत अग्रस्थानी राहण्यासाठी असे तपशीलवार लक्ष असणे आवश्यक असते. 

कार्बन उत्सर्जन कमीत कमी म्हणजे शून्य असले पाहिजे ही आजच्या काळाची मागणी आहे.समग्र जीवनशैली  प्रचलित झाली आहे. सेंद्रिय रंगकपडेसेंद्रिय उत्पादनापासून बनवलेले धागे यांची बाजारपेठ वाढते आहे.सेंद्रिय उत्पादने शोधण्याच्या प्रयत्नांवर आपला भर असला पाहिजे. 

कापूस आणि ताग यांच्याशिवाय आपल्याकडे केळीच्या रोपापासून आणि बांबूपासून बनवलेले धागे आधीपासूनच आहेत.अशा उत्पादनांसाठी वैशिष्ट्यपूर्ण  बाजारपेठ आहे. इतर स्रोतापासून धागे बनवण्यासाठीराष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था आणि विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थांनी आणखी संशोधन करण्याची गरज आहे.

 

उपास्थित महिला आणि पुरुष वर्ग,

वस्त्रोद्योग क्षेत्रात आवश्यक गुंतवणूक सुलभपणे होण्याच्या दृष्टीनेकापड निर्मिती करणारी राज्येही,  उद्योग क्षेत्राला अनुकूल  धोरणे  राबवत आहेत.

येत्या दोन दिवसातआपल्याला काही राज्य सरकारांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. मंत्रिमंडळातले माझे काही सहकारीही आपल्याशी संवाद साधतील. आपल्याला ही सत्रे रुचीपूर्ण आणि माहितीप्रद ठरतील याची मला खात्री आहे.

या कार्यक्रमामुळे भारतीय आणि  जागतिक नेत्यांनाभारताची धोरणेया देशातल्या गुंतवणुकीसाठीच्या संधी यांच्याशी परिचय करून घेता येईल. यामुळे आपल्या देशातून काम करून दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी तसेच गुंतवणुकीच्या संधीसाठी मौल्यवान भागीदार म्हणून भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी मदत होईल.वस्त्रोद्योग आणि वस्त्र प्रावरणे त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी महत्वाचे स्थान ठरण्याच्या भारताच्या पूर्वापारपासून असलेल्या क्षमता जाणून घेण्यासाठी हा मार्ग ठरेल अशी मला आशा आहे. 

 

उपास्थित महिला आणि पुरुष वर्ग,

गांधीनगरमधले हे  तीन दिवसांचे वास्तव्य आपणासाठी फलदायी ठरावे ही सदिच्छा.

भारतात या,गुंतवणूक करा आणि भारतात वस्त्रोद्योग निर्मिती करा.

धन्यवाद.              

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'

Media Coverage

'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi condoles loss of lives due to stampede at New Delhi Railway Station
February 16, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives due to stampede at New Delhi Railway Station. Shri Modi also wished a speedy recovery for the injured.

In a X post, the Prime Minister said;

“Distressed by the stampede at New Delhi Railway Station. My thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that the injured have a speedy recovery. The authorities are assisting all those who have been affected by this stampede.”