टेक्सटाईल इंडिया 2017 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्रातला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे ज्यामध्ये जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांनी हजेरी लावली आहे.वस्त्रोद्योग मंत्रालय, या कार्यक्रमाचे आयोजक, यात सहभागी झालेले उद्योजक, कारागीर, या सर्वाना शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो.
केंद्र सरकार आणि देशातली वेगवेगळी राज्य सरकारे आणि वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व लोक पहिल्यांदाच एकत्र आले आहेत आणि या मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे, संपूर्ण जगाला भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या संधीचे दर्शन घडवत आहेत.
वस्त्रोद्योग एक असे क्षेत्र आहे जे कृषी आणि उद्योग या मधला सेतू म्हणून काम करते.कापूस असो रेशीम उत्पादन असो, त्याचे अंतिम उत्पादन जास्त करून वस्त्रोद्योग क्षेत्रावर अवलंबून असते. शेतकऱ्याच्या मेहनतीतून पिकवलेला हा कच्चा माल, बाजारात आणण्याचे काम हे वस्त्रोद्योग क्षेत्र करते.म्हणजेच एका दृष्टीने वस्त्रोद्योग, हे कृषी आणि उद्योग या दोन्हीचा भाग आहे.
भारताच्या इतिहासात कोणत्या उद्योग क्षेत्राला नेहमीच महत्व राहिले असेल तर ते वस्त्रोद्योग क्षेत्र आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय शास्त्रात वस्त्रमहिमा वर्णन आढळते.शेकडो वर्षांपूर्वीही हा वस्त्रोद्योग, दुसऱ्या देशांबरोबर, व्यापाराचा मुख्य आधार राहिला होता. ज्या मार्गाने कपडे आणि धाग्यांची , दुसऱ्या देशात वाहतूक केली जायची, त्या रस्त्यालाही कोणत्या ना कोणत्या धाग्याच्या नावावरून ओळखले जायचे या मार्गाने अनेक विदेशी पर्यटक भारताविषयी जाणून घ्यायला इथे आले आणि महान भारतीय संस्कृतीच्या दर्शनाने भारावून गेले.आपल्या साहित्यातही त्यांनी भारतीय वस्त्रे आणि वस्त्रोद्योगाची ताकत यांना ठळकपणे स्थान दिले.
वेग-वेगळ्या कालखंडात आपल्या देशाच्या साहित्यात याची छाप पडलेली दिसून येते.साधारणतः दीड वर्षांपूर्वी, चेन्नई मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय हातमाग दिनाचा कार्यक्रम झाला होता त्यावेळी मला,बनारसमधल्या एका विणकर बांधवाने उपरण्यासारखे वस्त्र दिले होते. त्यावर कबीरदास यांचा प्रसिद्ध दोहा हाताने विणला होता
झीनी झीनी बिनी चदरिया
काहे के ताना काहे के भरनी, कौन तार से बिनी चदरिया।
कबीर स्वतः सूत कातत असत, कापड विणत असत आणि कापडाला रंगही देत असत.त्यांनी केवळ आपल्या कामात जीवनाच्या सत्याचा शोध घेतला असे नव्हे तर त्या कामातले शब्द घेऊन दोह्यांमधून ते व्यक्तही केले.
मित्रहो, वस्त्र, आपल्या सांस्कृतिक विविधतेशी जोडले गेले आहे.आपण असेही म्हणू शकतो की वस्त्र, आपल्या देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक राहिले आहे. अनेक शहरे आणि भागाची ओळख, तिथल्या वस्त्रोद्योग उद्योगामुळे निर्माण झाली आहे.कांचीपुरम, बनारस,आसामचे रेशीम असो, काश्मीरचे पश्मिना आणि जामावर असो,बंगालमधले मुस्लिन असो, लखनौमधले चिकन काम असो, ओडिशा आणि तेलंगणा मधले हाताने विणलेले इक्कत असो,गुजरातमधले पटोला असो, शेकडो वर्षांपासून ते आपापल्या क्षेत्राची ओळख देत आहेत.
उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग,
जागतिक अर्थव्यवस्थेत, भारताचे वर्णन, दैदीप्यमान स्थान असे करण्यात आले आहे. जागतिक गुंतवणुकीसाठी एक आकर्षक स्थान म्हणून भारत झपाट्याने पुढे येत आहे.धोरणात्मक पुढाकार घेण्याच्या अविरत सुरु ठेवलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे.
व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठी सात हजारहून अधिक सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शी करण्यात आल्या आहेत.बाराशेहून अधिक कालबाह्य कायदे, सरकारने मोडीत काढले आहेत.ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मकता सूचि मध्ये, गेल्या दोन वर्षात भारताने 32 स्थानांची झेप घेतली आहे. एखाद्या देशाने घेतलेली ही सर्वोच्च झेप आहे.2016 च्या जागतिक बँक लॉजिस्टिक कामगिरी सूची मध्ये भारताने 19 स्थानांची प्रगती केली आहे.2016 मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संस्थेच्या जागतिक नाविन्यता सूची मध्ये भारताने 16 स्थानांची भरारी घेतली आहे.व्यापार आणि विकास यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेच्या, परकीय थेट गुंतवणुकीसाठीच्या, सर्वोच्च दहा, स्थानांमध्ये आपला तिसरा क्रमांक आहे.
मेक इन इंडिया अभियानावर आधारित , संघटित वस्त्रोद्योग,कौशल्य, गती हा मूलमंत्र घेऊन,पर्यावरणाची हानी न करणारे उत्पादन आणि रोजगार तसेच निर्यात वृद्धी यांची सांगड घालत आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आपली उदार गुंतवणूक धोरणे आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आपण 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.
उपस्थित महिला आणि पुरुषवर्ग,
भारतीय अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योगाला महत्वाचे स्थान आहे.कापूस, लोकर, रेशीम, ताग, आणि मानव निर्मित धागे यासारख्या कच्च्या मालाची भारतात विपुलता आहे.भारत हा जगातला सर्वात मोठा कापूस आणि ताग उत्पादक देश आहे,रेशीम आणि मानव निर्मित धाग्याचा दुसरा मोठा उत्पादक देश आहे. याशिवाय, भारताकडे कताई, विणणे आणि वस्त्र प्रावरणे उत्पादनाच्या दृढ क्षमता आहेत.युवा, कुशल कामगार वाजवी दरात उपलब्ध आहे.
आपल्या वाढत्या विकास दरामुळे क्रय शक्ती वाढली आहे.त्याच्या परिणामी, उत्पादनासाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे देशांतर्गत प्रचंड बाजारपेठ निर्माण होत आहे. आकांक्षा बाळगणारा आपला युवा वर्ग,वस्त्रोद्योग, वस्त्रप्रावरणे आणि हस्तकला उत्पादनावर खर्च करू इच्छितो.वस्त्र प्रावरणे आणि जीवन शैली साठीची उत्पादने यासाठीची सध्याची देशांतर्गत बाजारपेठ 85 अब्ज अमेरिकी डॉलर अंदाजित आहे तर 2025 पर्यंत ती 160 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचेल असा अंदाज आहे. वाढत्या मध्यम वर्गामुळे या विकासाला चालना मिळेल.
आपल्या देशात उत्पादित कापड आणि वस्त्र प्रावरणे यांना जगात मोठी मागणी आहे. कापड क्षेत्राचा 5 टक्के हिस्सा बाळणारा, भारत हा जगातला, दुसरा मोठा कापड निर्यातदार देश आहे. पारंपरिक हातमाग आणि हस्तशिल्प उत्पादनासह, भारतीय कापड, शंभरहून अधिक देशांना निर्यात केले जाते.कधी कधी भारतीय पर्यटक, परदेशात कपडे खरेदी करतात, त्यानंतर हे कपडे भारतातच तयार झाल्याची जाणीव त्यांना होते. वस्त्रोद्योग क्षेत्र मोठ्या रोजगार संधी देऊ करते. सद्य स्थितीत,रोजगार पुरवणारे, कृषी क्षेत्रानंतरचे ते दुसरे मोठे क्षेत्र आहे. 45 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांना या वस्त्रोद्योग क्षेत्रात थेट रोजगार आहे तर 60 दशलक्षपेक्षा जास्त लोकांना या क्षेत्राच्या पूरक क्षेत्रात रोजगार पुरवला जात आहे.
हे ध्यानात घेऊनच, सरकार, वस्त्रोद्योग क्षेत्रावर विशेष लक्ष देत आहे.गेल्या वर्षी एक वस्त्रोद्योग पॅकेज दिले गेले.त्याअंतर्गत वस्त्रप्रावरणे आणि निर्मिती क्षेत्राला बळ देण्यात आले.
वस्त्रप्रावरणे आणि निर्मिती क्षेत्रात, नव्या श्रमिकांना रोजगार पुरवणाऱ्या कंपनी किंवा मालकाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी साठी जी 12 टक्के रक्कम दिली जाते ती रक्कम सरकार स्वतः देणार आहे, अशा पद्धतीने ही आर्थिक मदत केली जाईल.
याशिवाय सरकारने वस्त्रप्रावरणे क्षेत्रात निश्चित मुदतीच्या रोजगाराचा मार्गही खुला केला आहे.म्हणजेच या कामगारांना एका विशिष्ट काळासाठी नियुक्ती मिळेल आणि त्या कालावधीत त्यांना, एखाद्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व सुविधा पुरवण्यात येतील.यामुळेही कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा होईल.
उपस्थित स्त्री-पुरुषहो,
कुशल मनुष्य बळाची कमतरता भरून काढण्यासाठी, उद्योग केंद्री प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे एकात्मिक कौशल्य विकास योजना राबवण्यात येत आहे.
उत्पादन आणि निर्यात या आपल्या शक्ती स्थानांना, जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्था विकसित करण्याच्या क्षमतेची जोड देण्यात येत आहे.
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेचे, व्यावसायिक दृष्ट्या व्यवस्थापन करण्यात येणाऱ्या 16 परिसरांचे जाळे आहे. फॅशन शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशिक्षण आणि सल्ला यासारख्या विभागात ही संस्था महत्वाची भूमिका बजावत आहे.
आपापल्या राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी निकोप स्पर्धा आपण गेल्या वर्षात अनुभवली.परिणामी राज्यांमध्ये काही महत्वाच्या सुधारणा झाल्या. प्रत्येक राज्याने, वस्त्रोद्योगासहित नव्या उद्योगांच्या उभारणीला सुविधा देण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला.
प्राप्ती कर कायद्यांतर्गतही या क्षेत्रातल्या कंपन्यांना सूट देण्यात आली आहे.ज्या उत्पादन कारखान्यात कमीत कमी 100 कामगार आहेत , अशा कारखान्याने एखाद्या नव्या कामगाराला 150 दिवसांचा रोजगार दिल्यास त्यालाही कर सवलत दिली जाते. कापड निर्यातीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आता आली आहे असे मला वाटते.
भारत हा वैविध्यपूर्ण परंपरा, पेहेरावाच्या वैविध्यपूर्ण पद्धती यांनी नटलेला देश आहे.विविध भागातल्या पेहेरावाच्या पद्धतीत ही विविधता स्पष्ट प्रतिबिंबित होते.हे वैविध्य आपण सूचिबद्ध करून प्रत्येक राज्य आणि विभागाच्या वैशिष्ट्याचा छाप आपण निश्चित करायला हवा. प्रत्येक राज्याने, सुपरिचित अशा उत्पादनासाठी उत्पादक आणि व्यापाऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी नेमावेत.देशांतर्गत आणि निर्यात बाजाराच्या विशिष्ट गरजांची याद्वारे पूर्तता करण्यात यावी.
जागतिक बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणात असलेले कल लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि फॅशन जगतातले समयोचित नवे कल जाणून घेण्यासाठी आपण कृती आराखडा तयार करायला हवा. यासंदर्भात सरकारी परिषद आणि उद्योगविषयक मंडळे यांच्यातले सहकार्य आणखी वाढायला हवे.यामुळे या गरजा भागवण्यासाठी आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला मदत होईल.
मित्रहो,
विकास आणि समृद्धीसाठी नावीन्य आणि संशोधन हे दोन नवे मंत्र असून या उद्योगाला, विकासासाठी,सातत्याने नावीन्य आणि संशोधनाची जोड देऊन नव्या बाजारपेठेचा शोध घ्यावा लागेल.उदाहरणच द्यायचे झाले तर जगातल्या काही भागातल्या लोकांची शरीरयष्टी इतरांपेक्षा जास्त मोठी असू शकते, त्यामुळे त्यांना आपल्या देशात साधारणतः वापरल्या जाणाऱ्या कपडयांच्या मापापेक्षा जास्त रुंदीचे कपडे लागतील.यासाठी आपल्याला हातमागाचा आकार वाढवावा लागेल. इतरत्र गरजा वेगवेगळ्या असू शकतात.निर्यात बाजारपेठेत अग्रस्थानी राहण्यासाठी असे तपशीलवार लक्ष असणे आवश्यक असते.
कार्बन उत्सर्जन कमीत कमी म्हणजे शून्य असले पाहिजे ही आजच्या काळाची मागणी आहे.समग्र जीवनशैली प्रचलित झाली आहे. सेंद्रिय रंग, कपडे, सेंद्रिय उत्पादनापासून बनवलेले धागे यांची बाजारपेठ वाढते आहे.सेंद्रिय उत्पादने शोधण्याच्या प्रयत्नांवर आपला भर असला पाहिजे.
कापूस आणि ताग यांच्याशिवाय आपल्याकडे केळीच्या रोपापासून आणि बांबूपासून बनवलेले धागे आधीपासूनच आहेत.अशा उत्पादनांसाठी वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ आहे. इतर स्रोतापासून धागे बनवण्यासाठी, राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था आणि विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थांनी आणखी संशोधन करण्याची गरज आहे.
उपास्थित महिला आणि पुरुष वर्ग,
वस्त्रोद्योग क्षेत्रात आवश्यक गुंतवणूक सुलभपणे होण्याच्या दृष्टीने, कापड निर्मिती करणारी राज्येही, उद्योग क्षेत्राला अनुकूल धोरणे राबवत आहेत.
येत्या दोन दिवसात, आपल्याला काही राज्य सरकारांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. मंत्रिमंडळातले माझे काही सहकारीही आपल्याशी संवाद साधतील. आपल्याला ही सत्रे रुचीपूर्ण आणि माहितीप्रद ठरतील याची मला खात्री आहे.
या कार्यक्रमामुळे भारतीय आणि जागतिक नेत्यांना, भारताची धोरणे, या देशातल्या गुंतवणुकीसाठीच्या संधी यांच्याशी परिचय करून घेता येईल. यामुळे आपल्या देशातून काम करून दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी तसेच गुंतवणुकीच्या संधीसाठी मौल्यवान भागीदार म्हणून भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी मदत होईल.वस्त्रोद्योग आणि वस्त्र प्रावरणे त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी महत्वाचे स्थान ठरण्याच्या भारताच्या पूर्वापारपासून असलेल्या क्षमता जाणून घेण्यासाठी हा मार्ग ठरेल अशी मला आशा आहे.
उपास्थित महिला आणि पुरुष वर्ग,
गांधीनगरमधले हे तीन दिवसांचे वास्तव्य आपणासाठी फलदायी ठरावे ही सदिच्छा.
भारतात या,गुंतवणूक करा आणि भारतात वस्त्रोद्योग निर्मिती करा.
धन्यवाद.
PM @narendramodi is speaking at the inaugural function of #TextilesIndia2017
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
Watch Live https://t.co/vbG9VFN31Q
वस्त्र हमारे देश की सांस्कृतिक विविधता का प्रतीक रहे हैं। कितने ही शहरों और क्षेत्रों की पहचान वहां की टेक्सटाइल इंडस्ट्री से ही है: PM
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
India is described as a bright spot in the global economy. It has emerged as one of the most attractive global investment destinations: PM
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
Based on #MakeInIndia, the textile industry is being infused with the mantras of 'skill,scale,speed' & 'zero-defect,zero-effect': PM
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
The textile sector offers significant employment opportunities. It is today our second largest employer after agriculture: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
We should catalogue & map our clothing diversity & clearly earmark strengths & specialities of each state or region: PM
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
#TextilesIndia2017
I hope this event will help familiarize global & Indian leaders with India’s enabling policy environment, strengths & vast opportunities: PM
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017