It is only partnerships that will get us to our goals: PM Modi
The health of mothers will determine the health of the children and the health of children will determine the health of our tomorrow: PM Modi
The India story is one of hope: PM Narendra Modi at Partners' Forum
We are committed to increasing India’s health spending to 2.5 percent of GDP by 2025: Prime Minister

मंचावरील प्रतिष्ठित व्यक्ती,

भारत आणि परदेशातील प्रतिनिधी,

बंधू आणि भगिनींनो,

नमस्ते,

भागीदारी परिषद, २०१८च्या जगभरातील सर्व प्रतिनिधींचे सहर्ष स्वागत.

ही अशी एकमेव भागीदारी आहे जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाईल. नागरिकांमधील भागीदारी, समुदायांमधील, देशांमधील भागीदारी. शाश्वत विकास विषयपत्रिका हे ह्याचे प्रतिबिंब आहे.

देश आता सामाईक प्रयत्न करत आहेत. समुदायांचे सशक्तीकरण करणे, आरोग्य आणि शिक्षण सुधारणे, दारिद्रय निर्मुलन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि सरतेशेवटी कोणीही मागे रहायला नको. आईच्या आरोग्यावरून मुलांचे आरोग्य ठरते आणि मुलांच्या आरोग्यावरून आपले उद्याचे आरोग्य ठरते.

माता आणि मुलांचे आरोग्य, कल्याण साधण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यावर चर्चा करण्यासठी आपण येथे एकत्र जमलो आहोत. आजच्या आपल्या चर्चेतून जी निष्पत्ती होणार आहे त्याचा आपल्या उद्यावर चांगला परिणाम दिसून येईल.

भागीदारी व्यासपीठाचे व्हिजन हे भारताच्या प्राचीन “वसुधैव कुटुंबकम” ह्या एका वाक्यात सामावले आहे, ‘हे जग हे एक कुटुंब आहे’. माझ्या सरकारच्या “सबका साथ सबका विकास” ह्या तत्वाशी देखील सहमत आहे, याचा अर्थ समावेशी विकासासाठी एकत्रित प्रयत्न आणि भागीदारी असा होतो.

मातृ, नवजात शिशु आणि बालकांच्या आरोग्यासाठीची भागीदारी हे एक अद्वितीय आणि प्रभावी व्यासपीठ आहे. आम्ही केवळ चांगल्या आरोग्यासाठी प्रकरणं तयार करत नाही. आम्ही वेगवान विकासासाठी युक्तिवाद देखील करत आहोत.

जलद विकास सुनिश्चित करण्यासाठी जग नवीन मार्ग शोधत असतानाच, महिलांचे चांगले आरोग्य सुनिश्चित करणे हे तसे करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही खूप प्रगती केली आहे. अद्याप बरेच काही करणे बाकी आहे. मोठ्या बजेटपासून ते चांगल्या उत्पन्नापर्यंत आणि दृष्टीकोन बदलण्यापासून ते निरीक्षणापर्यंत, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.

भारतीय गाथा ही एक आशा आहे. वाहतूक कोंडीवर मात करता येईल अशी आशा आहे. वर्तणुकीत बदल घडेल अशी आशा आहे. जलद विकास साध्य होईल अशी आशा आहे.

जगामध्ये स्त्रिया आणि मुलांचा मृत्युदर हा भारतात सर्वाधिक आहे हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ने मान्य केले होते. शाश्वत गती आणि वेगाने घसरण झाल्यामुळे, 2030 च्या निश्चित तारखे आधीच भारत, मातृ आणि बाल आरोग्यासाठीचे एसडीजी चे लक्ष्य साध्य करेल.

किशोरवयीन मुलांवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि किशोरवयीन मुलांसाठी व्यापक आरोग्य संवर्धन आणि बचाव कार्यक्रम अंमलात आणणाऱ्या देशांमध्ये ‘भारत’ हा पहिला देश होता. आमच्या प्रयत्नांनी हे सुनिश्चित केले आहे की, 2015 मधील महिला, मुले आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याच्या जागतिक धोरणात त्यांना त्यांची योग्यता मिळाली पाहिजे.

मला आनंद आहे की, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्र आणि भारत या परिषदे दरम्यान जागतिक धोरणासाठी अनुकूलता दर्शवित आहेत. मला आशा आहे की, ही परिस्थिती इतर देशांना आणि प्रदेशांना समान धोरण विकसित करण्यास प्रेरित करेल.

मित्रांनो,

जसे आपल्या ग्रंथात म्हटले आहे: , “यत्र नार्यस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता”; याचा अर्थ “जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो, तिथे देवत्व फुलते”. माझा दृढ विश्वास आहे की जेव्हा देशाचे लोक आणि महत्वाचे म्हणजे महिला आणि मुले शिक्षित असतील आणि स्वतंत्र, सशक्त आणि निरोगी आयुष्य जगण्यास सक्षम असतील तेव्हा देशाचा विकास होईल.

मला हे ऐकून आनंद होत आहे की, भारतातील लसीकरण कार्यक्रम, माझ्या हृदयाजवळील एक विषय, याचा या परिषदेमध्ये यशो गाथा म्हणून समावेश केला आहे. मिशन इंद्रधनुष अंतर्गत, गेल्या तीन वर्षात आम्ही 32.8 दशलक्ष मुले आणि 8.4 दशलक्ष गर्भवती महिलांपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत लसींची संख्या 7 वरून 12 पर्यंत वाढविली आहे. आमच्या लसींमध्ये आता न्युमोनिया आणि अतिसार या सारख्या जीवघेण्या रोगांच्या लसींचा देखील समावेश करण्यात आला आहे.

मित्रांनो,

2014 मध्ये जेव्हा माझ्या सरकारने कार्यभार स्वीकारला तेव्हा, बालपणा दरम्यान दरवर्षी 44,000 पेक्षा जास्त मातांचा मृत्यू होत होता. गर्भधारणेदरम्यान मातांना सर्वात चांगली काळजी प्रदान करण्यासाठी आम्ही प्रधान मंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू केले. या मोहिमेत प्रत्येक महिन्यातील एक दिवस लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही डॉक्टरांना विनंती केली आहे. या मोहीम अंतर्गत, 16 दशलक्ष प्रसूतीपूर्व तपासणी केली गेली आहेत.

देशामध्ये 25 दशलक्ष नवजात बालकांनी जन्म घेतला आहे. आमची मजबूत सुविधा नवजात बालक सुरक्षा प्रणालीवर अवलंबून आहे, जिथे 794 विशेष नवजात बालक सुरक्षा केंद्रांच्या माध्यमातून 1 दशलक्ष नवजात बालकांची काळजी घेतली जाते, हे एक यशस्वी मॉडेल म्हणून काम करते. आमच्या हस्तक्षेपामुळे मागील ४ वर्षांच्या तुलनेत भारतात 5 वर्षाखालील 840 अतिरिक्त मुलांचे प्राण वाचवले आहेत.

पोषण अभियानाच्या माध्यमातून मुलांच्या पोषण आहारावर लक्ष केंद्रित केले जात आहे. कुपोषण मुक्त भारताचे सामाईक ध्येय साध्य करण्याच्या दिशेने अनेक योजना एकत्र आणल्या आहेत. मुलांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहोत. गेल्या चार वर्षात 800 दशलक्ष आरोग्य तपासणी आणि 20 दशलक्ष मुलांना मोफत रेफरल उपचार देण्यात आले आहेत.

एक गोष्ट जी सतत आम्हाला चिंतीत करते ती म्हणजे वैद्यकीय सेवा घेण्यासाठी कुटुंबांचा होणारा अवाढव्य खर्च. म्हणून आम्ही आयुषमान भारत योजना सुरू केली. आयुषमान भारत योजनेचे द्वी-स्तरीय धोरण आहे.

समुदायाजवळ सर्वसमावेशक प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देणे ही पहिली तरतूद आहे, यामध्ये आरोग्य आणि निरोगी केंद्राद्वारे निरोगी जीवनशैली आणि योगाचे मार्गदर्शन देखील केले जाईल. आरोग्य आणि निरोगीपणाच्या आमच्या धोरणाचा “फिट इंडिया” आणि “इट राइट” चळवळ देखील महत्त्वाचा घटक आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि तीन सामान्य कर्करोग स्तन, गर्भाशय आणि तोंड यांसारख्या सामान्य आजारांसाठी विनामूल्य तपासणी आणि काळजीचा लाभ समुदायाला मिळू शकेल. रुग्णांना त्यांच्या घराजवळ मोफत औषधे आणि निदान सुविधा मिळेल. 2022 पर्यंत आम्ही अशाप्रकरची 150 हजार आरोग्य केंद्र सुरू करणार आहोत.

आयुष्मान भारतची दुसरी बाजू प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आहे. हे दरवर्षी 500 दशलक्ष गरीब आणि असुरक्षित नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस, आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते. हा आकडा कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेच्या एकत्रित लोकसंख्येच्या जवळपास आहे. ही योजना लागू केल्यानंतर 10 आठवड्यांच्या आता आम्ही 5 लाख कुटुंबांना 700 कोटी रुपयांचे मोफत उपचार प्रदान केले आहेत.

आज, जागतिक सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती दिनानिमित मी पुन्हा सांगतो की, आम्ही सर्वांसाठी सार्वत्रिक आरोग्य प्रदान करण्यासाठी कार्य करत राहू.

एक दशलक्ष नोंदणीकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ते किंवा आशा कामगार आणि 2.32 लाख अंगणवाडी परिचारिका आयांसह, आपल्याकडे महिला आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रचंड शक्ती आहे. ते आमच्या कार्यक्रमाची ताकद आहेत.

भारत एक मोठा देश आहे. काही राज्ये आणि जिल्ह्यांनी विकसित देशांच्या बरोबरीने काम केले आहे. इतर त्यांची कामे करत आहेत. मी माझ्या अधिकाऱ्यांना 117 ‘आकांक्षा जिल्हे’ निवडण्याची सूचना केली आहे. अशा प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी एका प्रशिक्षण गटाकडे सोपवली आहे, जे शिक्षण, पाणी आणि स्वच्छता यासारख्या क्षेत्रांमध्ये काम करत असून ग्रामीण विकासासाठी आरोग्य आणि पोषणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

आम्ही इतर विभागांद्वारे महिला केंद्रित योजनांवर काम करीत आहोत. 2015 पर्यंत भारतातील अर्ध्या स्त्रियांना स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ इंधन मिळत नव्हते. आम्ही उज्ज्वल योजनेच्या माध्यमातून हे चित्र बदलले, ज्यामुळे 58 दशलक्ष स्त्रियांना स्वयंपाक बनवण्यासाठी स्वच्छ पर्याय उपलब्ध झाला.

वर्ष 2019 पर्यंत भारताला हागणदारी मुक्त करण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर ‘स्वच्छ भारत मिशन’ सुरू केले आहे. गेल्या चार वर्षांत, ग्रामीण भागात स्वच्छतेचे क्षेत्र 39 टक्क्यांवरून 95 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

आपल्या सर्वांना हे माहित आहे की, जर आपण एखाद्या पुरुषाला शिक्षित केले तर आपण त्या एका व्यक्तीला शिक्षित करततो; परंतु आपण एखाद्या स्त्रीला शिक्षण दिले तर आपण संपूर्ण कुटुंब शिक्षित करतो. आम्ही याचे रुपांतर “बेटी बचाओ बेटी पढाओ” मध्ये केले आहे – हा कार्यक्रम मुलींवर लक्ष केंद्रित करतो आणि तिला उत्तम दर्जाचे जीवन आणि शिक्षण प्रदान करतो. याव्यतिरिक्त, आम्ही मुलींसाठी “सुकन्या समृद्धि योजना” ही एक लहान ठेव बचत योजना देखील तयार केली आहे. या योजनेंतर्गत, 12.6 दशलक्षांहून अधिक खाती उघडली आहेत, ही योजना आम्हाला मुलीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यात मदत करीत आहे.

आम्ही प्रधान मंत्री मातृ वंदना योजना देखील सादर केली आहे, ज्याचा फायदा 50 दशलक्षांहून अधिक गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना होईल अशी अपेक्षा आहे. या महिलांच्या वेतनाचे होणारे नुकसान, पुरेसे पोषण आणि प्रसुतीपूर्वी आणि प्रसुतीनंतर महिलेला योग्य विश्रांती मिळावी यासाठी या योजनेंतर्गत, त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण केले जाते.

आम्ही याआधीच 12 आठवड्यांची प्रसूती सुट्टी 26 आठवड्यांपर्यंत वाढविली आहे. 2025 पर्यंत भारताचा आरोग्य सेवेवरील खर्च सकल ढोबळ उत्पनाच्या 2.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, जे 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके आहे. याचा अर्थ केवळ आठ वर्षांमध्ये सध्याच्या हिस्स्यामध्ये 345 टक्के वाढ होईल. आम्ही लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करत राहू. महिला, मुले आणि युवक प्रत्येक धोरण, कार्यक्रम किंवा उपक्रमाच्या केंद्रस्थानी राहतील.

यश मिळविण्यासाठी बहु-हितधारक भागीदारीच्या आवशक्यतेवर मी भर देऊ इच्छितो. आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये, आम्हाला माहित आहे की प्रभावी आरोग्य सेवा, विशेषतः स्त्रिया आणि मुलांसाठी, एकत्रित कृतीद्वारे उत्तम प्रकारे आयोजित केली जाते.

मित्रांनो,

मला सांगण्यात आले आहे की पुढील दोन दिवसात या व्यासपीठावर जगभरातील 12 याशोगाथांवर चर्चा केली जाणार आहे. देशांदरम्यान संवाद साधण्याची आणि एकमेकांपासून चांगले शिकण्याची ही खरोखरच एक चांगली संधी आहे. कौशल्य आणि प्रशिक्षण कार्यक्रम, परवडणारी औषधे आणि लस, ज्ञान हस्तांतरण आणि विनिमय कार्यक्रमांच्या माध्यमातून विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या आपल्या सहकारी देशांना पाठिंबा देण्यासाठी भारत तयार आहे.

 

मी मंत्रिमंडळातील सभेचे परिणाम ऐकण्यास उत्सुक आहे जे या चर्चेत योगदान देण्यासाठी तयार केले गेले आहेत. ही परिषद एक क्रियाशील व्यासपीठ आहे, जे आपल्याला योग्य क्षण प्रदान करत आहे, ज्यामुळे आपल्या “जगणे-सुधारणे-रुपांतर करणे” या वचनबद्धतेला प्रोत्साहन मिळत आहे.

आमचे कार्य उत्तम प्रकारे सुरु आहे आणि सर्वांसाठी आरोग्य प्रदान करण्यासाठी आम्ही अत्यंत समर्पण आणि तन्मयतेने कार्य करत आहोत. भारत सर्व भागीदारांसोबत एकत्र उभा राहील.

जे आमच्यासोबत सहभागी झाले आहेत त्या सर्वांना हे खऱ्या भावनेने साध्य करण्यासाठी मी आवाहन करतो, जेणेकरुन आम्ही संपूर्ण मानवतेला आपला पाठिंबा देऊ शकतो.

या महान कार्याच्या दिशेने आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आपण सर्व एकत्र येवू या.

धन्यवाद !

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi