Shri Narendra Modi campaigns in Srinagar & Pithoragarh districts of Uttarakhand
Congress has turned ‘Dev Bhoomi’ into “Loot Bhoomi: Shri Modi
Samajwadi party & Congress ruined Uttarakhand. They played with aspirations of people here: PM
Dev Bhoomi can attract tourists from all over the country. This land has so much potential for tourism sector to flourish: PM
Congress did not even note the difficulties our ex-servicemen faced: PM Modi
Why development projects are stalled in Uttarakhand? This has badly hit progress of the state: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडच्या श्रीनगर आणि पिथोरागढ इथे जाहीर सभेत भाषण केले.

जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या निर्मितीमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की “अटलजींनी तीन राज्य बनवली, छत्तीसगढ, झारखंड, उत्तराखंड. छत्तीसगढ आणि झारखंडने भाजपच्या राजवटीखाली प्रगती केली आहे.” ते पुढे म्हणाले की “कॉंग्रेसने उत्तराखंडच्या निर्मितीला विरोध का केला, जे इथल्या लोकांचे हित जोपासू शकत नाही त्यांना इथे शासन कसे करता येईल?”

विरोधी पक्षांवर टीका करून मोदी म्हणाले की, समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसने उत्तराखंड राज्याची वाताहत केली आणि लोकांच्या भावनाशी खेळ केला. उत्तराखंड राज्यातल्या पर्यटनाच्या संभावानांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की देवभूमी देशभरातल्या पर्यटकांना आकर्षित करू शकते. इथे पर्यटनाला भरपूर वाव आहे. श्री मोदी यांनी सांगितलं की चारधाम तीर्थक्षेत्रांना चांगल्या रस्त्यांनी जोडण्यासाठी केंद्राने 12000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, “आम्ही उत्तराखंड राज्याला इतर देशाशी, सर्व हवामानात टिकणाऱ्या रस्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. चारधाम साठी आम्ही 12000कोटी रुपये दिले आहेत.”

उत्तराखंड राज्याचा आणि इथल्या अर्थव्यवस्थेचा विकास हे आमचं प्राधान्य आहे असं ते म्हणाले आणि त्यांनी म्हटलं की, “ जेव्हा कधी योगाभ्य्साबद्दल बोललं जातं तेव्हा प्रत्येकाच्या मनात हरिद्वार ऋषिकेश चं नाव येतं. आम्ही इथे योग्य संरचना उभारून या क्षेत्राला प्रोत्साहन देऊ. आता सर्व जण पुन्हा पारंपारिक उपचारांकडे वळत आहेत, या क्षेत्रात उत्तराखंड मोठं योगदान देऊ शकतं.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की यापूर्वीच्या सरकारने निवृत्त सैनिकांबद्दल कधीच विचार केलं नाही. ते म्हणाले की, “ आपल्या निवृत्त सैनिकांना काय काय समस्या येतात याची दखलही कधी कॉंग्रेसने घेतली नाही. जे देशासाठी लढले त्यांच्याबद्दल असं कसं करू शकतो? कॉंग्रेसने एक श्रेणी एक निवृत्तीवेतन योजनेची थट्टा केली आहे. कार्यभार हातात घेतल्यानंतर आम्हीच ती लागू केली.  

त्यांनी ठासून सांगितलं की, कॉंग्रेसने 70 वर्ष देशाला लुटलं आहे, आणि ते सतत भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. ते पुढे म्हणाले की, “आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध कडक पावलं उचलली आहेत आणि काही जणांना त्याची झळ पोचली आहे. ज्यांनी देशाला लुटलं आहे त्यांना क्षमा केली जाणार नाही.” त्यांनी सांगितलं की गरिबांच्या हिताचा कुठलाही निर्णय घेण्यास आपण मागे पुढे बघणार नाही. आम्ही प्रत्येक अडचणीचा सामना करू पण गरिबांच्या भावनांशी कोणालाही खेळू देणार नाही असं ते म्हणाले.

उत्तराखंडच्या लोकांना उत्तम जीवनमान देण्यास आपलं सरकार कटिबद्ध आहे असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की, “आमचं सरकार गरिबांची सेवा करण्यास तत्पर आहे. आम्ही गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन देत आहोत. यामुळे अनेक घरांना लाभ झाला आहे.”

उत्तराखंड राज्याला विकासाची गरज आहे पण सध्याच्या सरकारने या बाबतीत कुठलंही पाउल उचललेलं नाही असं पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, “ काहीजण कराविषयी बोलतात पण विकासाची कामं का थांबली आहेत, त्यामुळे राज्याच्या प्रगतीवर दुष्परिणाम झाला आहे.”

याप्रसंगी भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

Click here to read the full Srinagar text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report

Media Coverage

Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 डिसेंबर 2024
December 27, 2024

Citizens appreciate PM Modi's Vision: Crafting a Global Powerhouse Through Strategic Governance