जी-20 नेत्यांची 15 वी शिखर परिषद

Published By : Admin | November 21, 2020 | 22:51 IST
COVID-19 pandemic an important turning point in history of humanity and the biggest challenge the world is facing since the World War II: PM
Time has come to focus on Multi-Skilling and Re-skilling to create a vast Human Talent Pool: PM Modi at G20 Summit
At G20 Summit, PM Modi calls for greater transparency in governance systems which will inspir citizens to deal with shared challenges & enhance their confidence

सौदी अरेबियाने 21-22 नोव्हेंबर  2020 रोजी बोलावलेल्या 15 व्या जी-20 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.  कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर  19  सदस्य देश , युरोपीय संघ,   इतर आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख नेते या व्हर्चुअल परिषदेत सहभागी झाले होते.

2. कोविड 19 महामारीमुळे आव्हाने आणि अडचणी उद्भवूनही यावर्षी जी –20 चे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवल्याबद्दल आणि दुसरी जी –20 शिखर परिषद व्हर्चुअल स्वरूपात आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे आणि त्याच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले.

3. सध्याच्या कोविड19 महामारीच्या पार्श्वभूमीवर “सर्वांसाठी एकविसाव्या शतकाच्या संधी साकारणे” या संकल्पनेवर आधारित सौदीच्या अध्यक्षतेखालील शिखर परिषदेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महामारीवर मात, अर्थव्यवस्थेला पुन्हा भरारी देणे , रोजगार पूर्ववत  करणे आणि सर्वसमावेशक,शाश्वत आणि लवचिक भविष्य घडवण्यावर या परिषदेचा कार्यक्रम केंद्रित होता.  दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत महामारी सज्जता आणि वसुंधरेच्या संरक्षणाविषयी अन्य कार्यक्रमांचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

4. पंतप्रधानांनी कोविड –19 महामारी ही मानवतेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वळण आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले.  त्यांनी जी –20 देशाना निर्णायक कृतीचे आवाहन केले जे केवळ आर्थिक भरारी , रोजगार आणि  व्यापारापुरती मर्यादित असू नये तर वसुंधरेचे संवर्धन करण्यावरही केंद्रित असायला हवे असे सांगून आपण सर्व मानवतेच्या  भविष्याचे विश्वस्त असल्याचे नमूद केले.

5. पंतप्रधानांनी कोरोना नंतरच्या जगासाठी नवीन जागतिक सूचकांकाचा प्रस्ताव मांडला ज्यात प्रतिभावंतांची मोठी साखळी तयार करणे;  समाजातील सर्व घटकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोच  सुनिश्चित करणे; प्रशासन यंत्रणेत  पारदर्शकता; आणि  विश्वस्त या भावनेने वसुंधरेचे संवर्धन हे चार मुख्य घटक आहेत  याच्या आधारे  जी –20 नवीन जगाची पायाभरणी करू शकेल.

6.  पंतप्रधानांनी अधोरेखित केले की गेल्या काही दशकांत, भांडवल आणि वित्तपुरवठा यावर भर  देण्यात आला आहे, परंतु प्रतिभावंतांची मोठी साखळी तयार करण्यासाठी बहुआयामी कौशल्य  यावर  लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. यामुळे केवळ नागरिकांची प्रतिष्ठाच वाढणार  नाही तर संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या नागरिकांना अधिक लवचिक बनवेल. ते म्हणाले की नवीन तंत्रज्ञानाचे कोणतेही मूल्यांकन जीवन सुलभता आणि जीवनाची गुणवत्ता यावर होणाऱ्या परिणामावर आधारित असले पाहिजे.

7. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले ज्यामुळे आपल्या नागरिकांना सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल  आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. ते म्हणाले की पर्यावरण आणि निसर्गाकडे मालक म्हणून न पाहता विश्वस्त म्हणून पाहण्यामुळे आपल्याला एक समग्र आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरणा मिळेल ज्याचा मापदंड दरडोई कार्बन फूटप्रिंट असू शकतो.

8 कोविड नंतरच्या जगात ‘कुठूनही काम करा’ ही एक नवीन साधारण गोष्ट आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी पाठपुरावा आणि दस्तावेजीकरण म्हणून जी-20 आभासी सचिवालयाची स्थापना करण्याची सूचना केली.

9. 15 व्या जी –20 नेत्यांची शिखर परिषद 22 नोव्हेंबर 2020 रोजी देखील सुरू राहणार असून समाप्तीच्या वेळी नेत्यांच्या  घोषणापत्राला मान्यता दिली जाईल  आणि सौदी अरेबिया इटलीकडे अध्यक्षपद सोपवेल.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"