-
2017 च्या मध्यात गुजरात, राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरमध्ये पूरामुळे जीवसृष्टी व मालमत्तेचे नुकसान झाले. या बातम्या मिळताच संबंधित केंद्रीय संस्था आणि सरकारी विभागांना कार्यरत करण्यात आले, आपत्ती प्रतिसाद यंत्रणेवर पंतप्रधानांनी स्वतः देखरेख ठेवली.
.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले आणि पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी योजण्यात येणाऱ्या उपायांची माहिती घेण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिका-यांशी लागोपाठ बैठकी घेतल्या. त्यांनी पूरग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली आणि केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या मदतीची त्यांना खात्री दिली
.
- गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात त्यांनी गुजरातच्या भूकंपग्रस्त भागाचे मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन केले होते आणि राज्याच्या आपत्ती यंत्रणा सुव्यवस्थित केल्या होत्या. भूज शहर भूकंपामुळे (2001) पूर्णतः जमिनदोस्त झाले होते, तत्कालीन नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोदी यांच्या देखरेखीखाली हे शहर पुन्हा नव्या जोमाने आणि अत्यंत वेगवान गतीने पुन्हा उभं राहिलं. काम तत्परतेने हातावेगळे करण्याची त्यांची शैली पुन्हा प्रदर्शित झाली जेव्हा उत्तराखंडच्या केदारनाथ इथे आलेल्या भयंकर प्रलयात अडकलेल्या गुजरातच्या लोकांना सोडविण्यासाठी ते स्वतः तिथे दाखल झाले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा असलेला व्यावहारिक अनुभव त्यांना देशाच्या विविध भागात आलेल्या नैसर्गिक संकटांच्या व्यवस्थापनात उपयुक्त ठरला. 2014 मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्यात आलेल्या पुरामुळे राज्यात हाहाकार उडाला होता. पंतप्रधान मोदी यांनी, स्थितीचा आढावा घेण्यासाठी इथे भेट दिली होती. तो पूर राष्ट्रीय स्तराची आपत्ती असल्याचे घोषित करून त्यांनी राज्यात पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी 1000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचे जाहीर केले होते.
- ज्या राज्यात नैसर्गिक संकट ओढवले आहे तिथे त्वरित बचाव यंत्रणा पाठवून राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. 2015 मध्ये जेव्हा चेन्नई मध्ये मुसळधार पावसाने संकट ओढवले तेव्हा पंतप्रधानांनी त्याची स्वतः दखल घेतली. सर्व रस्ता वाहतुकीशी चेन्नईचा संपर्क तुटल्यामुळे, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि डॉक्टर्स असलेले, आरमार दलाचे INS ऐरावत हे जहाज चेन्नईच्या तटावर सज्ज ठेवण्यात आले होते.
-
2015 मध्ये नेपाळमध्ये भयानक भूकंप झाला तेव्हा भारत प्रथम मदतीला उतरला आणि संकटात पडलेल्या शेजारी राष्ट्राला मदतीचा हात दिला. संकटकालीन राजनैतिक संबंधांना नवा आयाम देऊन पंतप्रधान मोदी यांनी भारतीय उपखंडात नेतृत्व करण्याची भारताची ताकद जगाला दाखवून दिली. मोठ्या प्रमाणात मदत साहित्य आणि आवश्यक उपकरणांसह एनडीआरएफच्या तुकड्या शेजारी राष्ट्रात पाठविण्यात आल्या. भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकलेल्या इस्रायली नागरिकांना बाहेर काढण्यात सहाय्य केल्याबद्दल आणि त्यांची बचाव विमाने भारतात येऊ देण्याची परवानगी दिल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि भारताच्या मदतीचे जगभरांत कौतुक झाले. हवामान बदल तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती यासारख्या संकटांवर तोडगा शोधण्यासाठी विविध देशांशी परस्पर सामंजस्य वाढविण्यावर पंतप्रधान मोदी यांच्या राजनैतिक प्रयत्नाचा भर असतो.
- आपत्तीच्या वेळी संपर्कासाठी लिंक्स उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इस्रोच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात पंतप्रधान मोदी यांनी नेतृत्व केले. भारताने शेजारी राष्ट्राला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे आणि 7 सार्क देशाच्या प्रमुखांनी याची वाखाणणी केली आहे.
- हवामान बदलामुळे दुष्प्रभावीत होणाऱ्या या पृथ्वीवर स्थायी विकास घडवून आणायचा असेल तर आपत्तीच्या काळासाठी सज्जता आणि निवारण या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. घाईघाईने शहरीकरण केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अशा संकटात प्रकर्षाने पुढे येतात. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सेनाडाय आराखडा अमलात आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे शहरी व्यवस्थापन, जागतिक आपत्ती जोखीम निवारण मानकांना अनुसरून करण्याचे योजले आहे.
- संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या सर्व स्तरांवर एक सर्वसमावेशक संरचनात्मक तयारीचा भारतात फार पूर्वीपासून अभाव होता. व्यवस्थापनातील त्रुटी ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना कार्यान्वित केली. एनडीएमपी सेनाडाय आराखड्याला अनुसरून तयार करण्यात आला असून प्रत्येक स्तरावर विकासात्मक प्रक्रिया आणि आपत्ती व्यवस्थापनाची सांगड त्यात घालण्यात आली आहे.
- नोव्हेंबर 2016 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या प्रथम आशियाई मंत्रिस्तरीय परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेनाडाय आराखड्याचे ठोस आणि दृश्यात्मक कृतींमध्ये रुपांतर करण्यासाठी 10 सूत्रीय कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमांत आपत्ती निवारण क्षेत्रात महिलांच्या वाढीव सहभागाचे तसेच संकटकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध देशातले सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.
- नोव्हेंबर 2016 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या प्रथम आशियाई मंत्रिस्तरीय परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेनाडाय आराखड्याचे ठोस आणि दृश्यात्मक कृतींमध्ये रुपांतर करण्यासाठी 10 सूत्रीय कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमांत आपत्ती निवारण क्षेत्रात महिलांच्या वाढीव सहभागाचे तसेच संकटकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध देशातले सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.