महामहिम,
नमस्कार आणि आपण मांडलेल्या विचारांकरीता खूप खूप धन्यवाद.
आपल्या नेतृत्वात आपल्या पक्षाचा सलग चौथ्यांदा मोठा विजय झाला आहे. तेव्हाच Twitter वर मी आपल्याला लगेच शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र आता या आभासी व्यासपीठावरील भेटीत पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा देत आहे.
महामहीम,
आपले संबंध लोकशाही आणि कायद्याचे राज्य यासारख्या समान मूल्यांवर आधारीत आहेत. हवामान बदल, दहशतवाद, महामारी यासारख्या जागतिक आव्हानांवर आपली भूमिका समान आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात सुविहित पुरवठा साखळी, जागतिक डिजिटल व्यवस्थापन यासारख्या नव्या क्षेत्रातही आपल्यात चांगला ताळमेळ साधला जात आहे. पाण्यासंबधित धोरणात्मक भागिदारीच्या माध्यमातून आज आपण या संबंधांना एक नवा आयाम देणार आहोत. गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगाने मागोवा घेणाऱ्या यंत्रणेची उभारणी आपल्या मजबूत आर्थिक सहकार्याला नव्याने चालना देईल.
मला विश्वास आहे कोविड नंतरच्या कालखंडात, अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत, अशावेळी आपल्या सारखे समविचारी देश परस्पर सहकार्य अधिक वृद्धींगत करु शकतील.
महामहीम,
2019 मधे महामहीम यांच्या भारत दौऱ्याने भारत-नेदरलँड संबंधांना नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. मला विश्वास आहे कि आजच्या आपल्या आभासी संवादाने त्याला अधिक गती मिळेल.
महामहीम,
भारतीय वंशाच्या लोकांबद्दल आपण उल्लेख केला. हे खरं आहे, संपूर्ण युरोपात भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने राहातात. कोरोनाच्या काळात, या महामारी दरम्यान आपण भारतीय वंशाच्या लोकांची ज्याप्रकारे काळजी घेतली, त्यांचा सांभाळ केलात त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो, आणि COP-26 वेळी किंवा युरोपीय राष्ट्रसंघासोबत भारताची परीषद होईल तेव्हाही आपल्यासोबत अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.