रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, सर्गेई लावरोफ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लावरोफ यांनी पंतप्रधानांना युक्रेनमधील सध्या सुरू असलेल्या शांतता वाटाघाटींसह सर्व परिस्थितीची माहिती दिली. हिंसा लवकर थांबावी, या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि शांततेच्या प्रयत्नांमध्ये सर्वप्रकारे योगदान देण्याची भारताची तयारी दर्शवली.
डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या प्रगतीबद्दलही रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.