पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारिनचे युवराज आणि पंतप्रधान सलमान बिन हमद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. युवराज सलमान यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा कळवल्या.

भारत आणि बहारिन यांच्यामधील द्विपक्षीय संबंधाचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला आणि हे संबंध राजकारण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, आरोग्य, सुरक्षा आणि जनतेमधील संबंध या सर्व स्तरांवर विकास पावत आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले. 2021-22 हे वर्ष दोन्ही देशांमधील परराष्ट्र संबंधांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

पंतप्रधानांनी बहारिनमधील भारतीय समुदायाची कोविड महामारीच्या कालखंडात उत्कृष्टपणे काळजी घेतल्याबद्दल तसेच भारतीय समुदायाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गरजांची पूर्तता केल्याबद्दल बहारिनच्या नेतृत्वाचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहीम राजे हमद बिन इसा अल खलिफा यांना शुभेच्छा कळवल्या. तसेच महामहीम युवराज सलमान बिन हमद अल खलिफा यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'India is our top performing market in the world': Blackstone CEO Stephen Schwarzman

Media Coverage

'India is our top performing market in the world': Blackstone CEO Stephen Schwarzman
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 मार्च 2025
March 12, 2025

Appreciation for PM Modi’s Reforms Powering India’s Global Rise