राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील राज्यसभेतल्या आभारदर्शक प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी वरिष्ठ सभागृहातल्या सदस्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी राज्यसभेचे दिवंगत सदस्य मदनलाल सैनी यांना श्रद्धांजली वाहिली.

2019 च्या लोकसभा निवडणुकांमधून नागरिकांची स्थैर्याची इच्छा दिसून आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्थिर राज्य सरकारे निवडून देण्याचा कल आता विविध राज्यांमधूनही दिसून आला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निवडणूक प्रक्रियेचे त्यांनी कौतुक केले. संपूर्ण प्रक्रियेचा दर्जा अत्यंत उच्च होता, असे ते म्हणाले. लोकशाही नष्ट झाल्याचे काही नेत्यांचे विधान दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारांच्या समंजसपणाबद्दल शंका उपस्थित न करण्याचे आवाहन त्यांनी सदस्यांना केले. आपल्या निवडणूक प्रक्रियेचा आणि लोकशाहीचा आदर राखणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत उपस्थित केलेल्या शंकांवर पंतप्रधानांनी टीका केली. बूथ कॅप्चरिंग आणि हिंसेला ईव्हीएममुळे आळा बसला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. वाढते मतदान हे सुदृढ लोकशाहीचे चिन्ह असल्याचे ते म्हणाले. व्हीव्हीपॅटमुळे केवळ ईव्हीएसची विश्वासार्हता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील निवडणूक प्रक्रिया अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सुधारणा नक्कीच आवश्यक आहेत. ‘एक देश एक निवडणुका’ सारख्या निवडणुका सुधारणा प्रस्तावावर चर्चा होणे आणि त्यावर आपली मते व्यक्त करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले असून, त्याचा लाभ नागरिकांना होऊ शकतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकाचे सक्षमीकरण झाले पाहिजे, असे सरकारला वाटते. देशातल्या नागरिकांसाठी सरकारने केलेली कामे, घर, वीज, गॅसजोझी, शौचालयबांधणी, इत्यादी त्यांनी नमूद केली.

भारताला पाच ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याकरिता काम करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी सर्वांना केले. हे उद्दिष्ट साह्य करण्यासाठी सकारात्मक मनोवृत्तीने काम करण्याचे आणि आपल्या सूचना, संकल्पना मांडण्याचे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.

झारखंडमध्ये अलिकडे घडलेल्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले. कायद्यानुसार दोषींना आवश्यक ती शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. मात्र यासाठी संपूर्ण राज्याची बदनामी करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. कुठलेही राज्य असो, अशा प्रकारच्या घटनांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, हिंसाचारासाठी दोषी असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

आयुषमान भारत अधिक बळकट करणे, ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या देशातल्या गरीबांना सर्वोच्च दर्जाचे आणि परवडणारे उपचार मिळाले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

ईशान्येकडच्या राज्यांच्या तसेच आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेसोबत प्रादेशिक आकांक्षा महत्त्वाच्या असल्याचे संघराज्य सहकार्याबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले.

देशाला अधिक उत्तम आणि बलशाली बनवण्यासाठी जे योगदान देता येईल, त्या ते देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. देशाला नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी आणि नवभारताच्या निर्माणासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi