Quote2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे, याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातल्या लोकांनी सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन करून एक स्थिर सरकार पुन्हा एकदा निवडून दिले आहे.
Quoteपंतप्रधान यावेळी म्हणाले की, देशाची प्रगती होणे महत्वाचे आहे. प्रत्येक भारतीय नागरिक अधिकार संपन्न आहे आणि आमच्या देशाकडे आधुनिक पायाभूत सुविधा आहेत.
Quoteया निर्णयांमुळे शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग, युवक आणि समाजातल्या वेगवेगळ्या इतर वर्गांनाही लाभ मिळू शकणार आहे. ते म्हणाले की, सरकारने देशाला केलेले वायदे पूर्ण करण्याचं काम सुरू केलं आहे.
Quoteपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये भ्रष्टाचाराला कोणतंही स्थान असणार नाही, हे यावेळी अगदी निक्षून सांगितलं.

लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करताना, सदनामधल्या सदस्यांपैकी, विशेषतः पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांनी चर्चेमध्ये भाग घेतला, त्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले, राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे नवीन भारताचे ‘व्हिजन’ आहे. या नवभारताचे स्वप्न लाखो भारतीय पहात आहेत.

2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे, याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातल्या लोकांनी सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन करून एक स्थिर सरकार पुन्हा एकदा निवडून दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून हे स्पष्ट होतं की, भारतातले लोक देशाच्या भल्याचा विचार करत आहेत. ही भावना कौतुकास्पद आहे. त्यांना 130 कोटी देशवासियांची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळत आहे, असं सांगून नागरिकांच्या जीवनामध्ये आलेल्या सकारात्मक परिवर्तनामुळे समाधान मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की, सरकार जनकल्याण आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर विश्वास ठेवते. ते म्हणाले की, सरकार कधीही विकासाच्या मार्गावरून भरकटले नाही, तसेच विकासाच्या कार्यक्रमापासून दूरही गेले नाही. पंतप्रधान यावेळी म्हणाले की, देशाची प्रगती होणे महत्वाचे आहे. प्रत्येक भारतीय नागरिक अधिकार संपन्न आहे आणि आमच्या देशाकडे आधुनिक पायाभूत सुविधा आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या प्रत्येक नागरिकाने भारताच्या प्रगतीमध्ये योगदान दिले आहे, असे आपल्या सरकारला वाटते. त्यांनी यावेळी आणीबाणी जारी झाल्यानंतर किती अवघड कालखंड या देशाने पाहिला, ते एक ‘काळं पर्व’ होतं, याचं स्मरण त्यांनी आपल्या भाषणात केलं .

महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आणि भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण होत असलेली 75 वर्ष, ही भारताच्या इतिहासामधली महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना आहे, असं सांगून, ही घटना सर्वांनी अतिशय उत्साहात साजरी करावी, असा आग्रह पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सर्वांना केला. आपल्या स्वातंत्र्य सेनानींच्या स्वप्नातला भारत आपण बनवला पाहिजे आणि देशासाठी जगलं पाहिजे असंही ते भाषणात म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र सरकारनं कार्यभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांतच जनतेच्या हितांचे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग, युवक आणि समाजातल्या वेगवेगळ्या इतर वर्गांनाही लाभ मिळू शकणार आहे. ते म्हणाले की, सरकारने देशाला केलेले वायदे पूर्ण करण्याचं काम सुरू केलं आहे.

जल संरक्षणाचे महत्व अधोरेखित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. यासाठी सरकारने ‘जल शक्ती’ मंत्रालयाची स्थापना केल्याचंही सांगितलं. पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांनी अतिशय ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पाणी संकटाचे दुष्परिणाम गरीब लोकांबरोबरच महिलांना सर्वात जास्त भोगावे लागतात. आपले सरकार प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पाणी पोहोचण्यासाठी कटिबद्ध असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची बनवण्यासाठी सर्वांनी मिळून, सामुहिक प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याबरोबरच पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व पायाभूत सोई-सुविधा अधिक चांगल्या, समृद्ध करण्याची विशेष आवश्यकता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि कौशल्य विकास यांचे महत्व असल्याचं नमूद केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये भ्रष्टाचाराला कोणतंही स्थान असणार नाही, हे यावेळी अगदी निक्षून सांगितलं. भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारनं सुरू केलेला लढा असाच यापुढेही कायम चालू रहाणार असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. सर्व नागरिकांना अतिशय सुकर, सुलभ जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सर्व नागरिकांनी ‘नवीन भारता’च्या निर्माणाच्या दिशेने कार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्वांना केलं.

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

Media Coverage

"Huge opportunity": Japan delegation meets PM Modi, expressing their eagerness to invest in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses concern over earthquake in Myanmar and Thailand
March 28, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi expressed concern over the devastating earthquakes that struck Myanmar and Thailand earlier today.

He extended his heartfelt prayers for the safety and well-being of those impacted by the calamity. He assured that India stands ready to provide all possible assistance to the governments and people of Myanmar and Thailand during this difficult time.

In a post on X, he wrote:

“Concerned by the situation in the wake of the Earthquake in Myanmar and Thailand. Praying for the safety and wellbeing of everyone. India stands ready to offer all possible assistance. In this regard, asked our authorities to be on standby. Also asked the MEA to remain in touch with the Governments of Myanmar and Thailand.”