I congratulate all those who will be voting for the first time in the 2019 Parliamentary polls. Those born in the 21st century are now going to be voters and thus, they will play a role in shaping India's progress: PM
Our friends in the Congress see things in two time periods. BC- Before Congress, when nothing happened. AD- After dynasty- where everything happened: PM
India is seeing remarkable progress in the last four years. In all spheres, investment, steel sector, start ups, milk and agriculture, aviation, India's progress is outstanding: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहातील विविध सदस्यांनी आभार प्रस्तावावरील चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि अभ्यासपूर्ण मुद्दे मांडल्याबद्दल सदस्यांचे आभार मानले.

भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्या सरकारबद्दल बोलताना ते म्हणाले की, जनतेच्या आकांक्षा प्रती संवेदनशील, प्रामाणिक, पारदर्शक, भ्रष्टाचार विरोधी असून वेगवान विकासासाठी हे सरकार काम करत आहे.

गेल्या चार वर्षात भारताने उल्लेखनीय प्रगती पाहिली आहे, थेट परकीय गुंतवणुकीपासून पोलाद क्षेत्र, स्टार्ट अप, दूध आणि कृषी, विमान वाहतूक अशा विविध क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पोलाद उत्पादक, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक, जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वाहन उत्पादक बनलो आहोत. आपल्या देशात धान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे, असे ते म्हणाले.

आपल्या सरकारची ठळक वैशिष्ट सांगताना ते म्हणाले की, गेल्या 55 वर्षात जे साध्य केले त्यापेक्षा कितीतरी अधिक गेल्या 55 महिन्यात या सरकारने साध्य केले आहे. स्वच्छतेचे प्रमाण 98 टक्क्यांवर गेले आहे, आपल्या लोकांसाठी 10 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली आहेत. गेल्या 55 वर्षात 12 कोटी गॅस जोडणी देण्यात आल्या होता. तर गेल्या 55 महिन्यात 13 कोटी गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी 6 कोटी उज्ज्वलांतर्गत आहेत. केलेल्या कामाचा वेग आणि ज्यांच्यासाठी हे काम केले हे तुमचे तुम्हीच ठरवा, असे ते म्हणाले.

विरोधाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, स्पष्ट बहुमत असलेले सरकार काय करू शकते हे लोकांनी चार वर्षात पाहिले असून याआधीच्या सरकारचे काम पूर्णत्वाला न नेता सर्वांना नावे ठेवण्याचे धोरणही लोकांनी पाहिले आहे. जनतेला ‘महामिलावट’ वालं सरकार नको आहे आणि ते यशस्वी होणार नाही, असे ते म्हणाले.

आपल्यावर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे मात्र ती करताना त्यांनी देशावर टीका करू नये असे पंतप्रधान म्हणाले.

भ्रष्टाचाराबाबत कठोरपणे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा करण्यासाठी आपले सरकार अथक प्रयत्न करत आहे.

बेनामी कायद्याबाबत ते म्हणाले की, बेनामी कायद्याची अंमलबजावणी करणारे सरकार आपले असून बेनामी मालमत्ता असलेल्यांना अटकेचे सत्र आता आपल्या राज्यात चालू आहे.

संरक्षण मंत्र्यांनी सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले आहे त्यामुळे सतत टीका करण्यात अर्थ नाही. कुठलाही संरक्षण करार सरळ मार्गाने होऊ शकत नाही, असा विचार करणारे लोकचं वाद निर्माण करत आहेत, असे पंतप्रधानांनी राफेलबाबत सांगितले.

अनुत्पादक मालमत्तेबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारांनी हा वारसा मागे ठेवला आहे. आणि जे देश सोडून फरार झाले आहेत ते आज ट्विटरवर रडत आहेत, ‘ते म्हणात आहेत मी 7 हजार 800 कोटी रुपये घेतले होते मात्र, सरकारने आमची 13 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.’

सुमारे 20 हजार स्वयंसेवी संस्थांनी सरकारने निधीबाबत त्यांच्याकडे माहिती मागितल्यानंतर आपला गाशा गुंडाळला आहे आणि भविष्यात ही संख्या आणखी वाढू शकते असे ते पंतप्रधान म्हणाले.

सर्वांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी रालोआ सरकार कशाप्रकारे काम करत आहे हे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत महागाई नियंत्रणात आली आहे.

आरोग्यपूर्ण भारताबाबत आपली कटिबद्धता व्यक्त करत पंतप्रधानांनी, औषधांच्या किमती तसेच वैद्यकीय आणि सर्जिकल उपकरणांच्या किंमती कमी करण्यात आल्या असल्याचे सांगितले.

रोजगाराबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, परिवहन क्षेत्रात सर्वाधिक रोजगार वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षात 6 लाखांहून अधिक व्यावसायिक तयार झाले असून त्यांनी लोकांसाठी अधिकाधिक रोजगार निर्माण केले आहेत. सप्टेंबर 2017 ते नोव्हेंबर 2018 या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत 1.80 कोटी लोकांची नोंदणी झाल्याचे ते म्हणाले.यापैकी 64 टक्के 28 वर्षाखालील युवक आहेत. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 1.20 कोटींहून अधिक लोकांची नोंदणी झाल्याचे पंतप्रधानांनी लोकसभेत सांगितले.

भारताच्या परराष्ट्र धोरणाने भारताला जागतिक मंचाच्या केंद्रस्थानी आणले आहे. असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, भारताचे म्हणणे ऐकून घेतले जात आहेत. पॅरिस कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी जगातल्या अव्वल नेत्यांनी भारताशी चर्चा केली होती. भारत, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा मित्र बनू शकतो तसेच सौदी अरेबिया आणि इराणचाही मित्र बनू शकतो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारताच्या प्रगतीतील भावी पिढीची भूमिका विषद करतांना ते म्हणाले की, ‘21 व्या शतकात ज्यांचा जन्म झाला आहे ते आता मतदार बनणार आहेत आणि अशा प्रकारे भारताच्या प्रगतीला आकार देण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.’

भाषणाच्या शेवटी पंतप्रधान म्हणाले की, आपले सरकार नेहमीच देशाच्या, जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22, 2024
PM to interact with prominent leaders from the Christian community including Cardinals and Bishops
First such instance that a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India

Prime Minister Shri Narendra Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi at 6:30 PM on 23rd December.

Prime Minister will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.

This is the first time a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India.

Catholic Bishops' Conference of India (CBCI) was established in 1944 and is the body which works closest with all the Catholics across India.