The Rajya Sabha gives an opportunity to those away from electoral politics to contribute to the nation and its development: PM
Whenever it has been about national good, the Rajya Sabha has risen to the occasion and made a strong contribution: PM
Our Constitution inspires us to work for a Welfare State. It also motivates us to work for the welfare of states: PM Modi

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनानिमित्त आयोजित विशेष चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाषण केले.

देशाच्या इतिहासात राज्यसभेने महत्वाचे योगदान दिले आहे आणि या सदनाने इतिहास घडतानाही बघितले आहे, असे पंतप्रधानांनी ऐतिहासिक अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. द्विसदन संसद रचना करण्यामागच्या भारतीय राज्यघटनाकर्त्यांच्या दूरदृष्टीने आपली लोकशाही समृद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या वैविध्यतेचे प्रतिक आणि भारताच्या संघराज्य रचनेचे प्रतिबिंब राज्यसभा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

राज्यसभा कधी भंग होत नाही आणि हे सदन चिरंतन असल्याचा उल्लेख त्यांनी केला. निवडणुकांच्या राजकारणापासून दूर राहणाऱ्या, देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्यांना राज्यसभा संधी पुरवते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारतीय राज्यघटनेत असलेल्या सहकार्यात्मक संघराज्याचे तत्व जपण्यात राज्यसभेची भूमिका महत्वाची असल्याचे ते म्हणाले.

राज्यसभेने देशाचे हित नेहमीच जपले आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी वस्तू आणि सेवा कर, तीन तलाक आणि कलम 370 यासारख्या महत्वाच्या विधेयकांमध्ये राज्यसभेच्या भूमिकेचा उल्लेख केला.

राज्यसभेचे महत्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शब्द उद्‌धृत केले. देशाच्या प्रगतीसाठी राज्यसभेचा सक्रिय पाठिंबा आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले.

सदनाच्या कामकाजात व्यत्यय न आणता प्रभावीपणे मते मांडणे आणि संसदीय परंपरा जपण्यात संसदेचे काही सदस्य सांभाळत असलेल्या नीतीतत्वांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या प्रथांमधून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

प्रभावी लोकशाहीसाठी राज्यसभा महत्वाची असल्याचे ते म्हणाले. वरिष्ठ सदनाच्या चेक्स ॲण्ड बॅलन्सेसचा वापर विधेयके अडवण्यासाठी होऊ नये, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers

Media Coverage

Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जानेवारी 2025
January 02, 2025

Citizens Appreciate India's Strategic Transformation under PM Modi: Economic, Technological, and Social Milestones