मान्यवर,
भारताने हवामान अनुकूलन शिखर परिषदेचे स्वागत केले असून याकार्यासाठी पंतप्रधान मार्क रुट्टे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
पूर्वीच्या तुलनेत आज हवामान अनुकूलन अधिक महत्त्वपूर्ण आहे.
आणि हे भारताच्या विकासात्मक प्रयत्नांचा मुख्य घटक आहे.
आम्ही स्वतःला वचन दिले आहे कीः
- आम्ही केवळ आमच्या पॅरिस कराराच्या उद्दिष्टांची पूर्तता करणार नाही, तर त्याहूनही अधिक करू;
- आम्ही केवळ पर्यावरणाचा र्हास रोखणार नाही तर त्याचे संवर्धन देखील करू; आणि,
- आम्ही केवळ नवीन क्षमता तयार करणार नाही तर त्यांना जागतिक हितासाठी कारक बनवू.
आमची कृती आमची वचनबद्धता दर्शविते.
2030 पर्यंत आम्ही नवीकरणीय उर्जा क्षमतेचे 450 गीगावॅट्स चे लक्ष्य निर्धारित केले आहे.
आम्ही एलईडी दिव्यांना प्रोत्साहन देत आहोत आणि वर्षाकाठी 38 दशलक्ष टन कार्बन-डाय-ऑक्साईड उत्सर्नाला आळा घालत आहोत.
आम्ही 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर माळरान जमीन सुपीक करणार आहोत.
आम्ही 80 दशलक्ष ग्रामीण घरांना स्वच्छ स्वयंपाक इंधन पुरवित आहोत.
आम्ही 64 दशलक्ष कुटुंबांना पाईपलाईन ने पाणीपुरवठा करत आहोत.
आणि आमचे हे उपक्रम केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत.
आंतरराष्ट्रीय सौर युती आणि आपत्ती निवारण मूलभूत सुविधा युती जागतिक हवामान भागीदारीची शक्ती दर्शवते.
जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांची लवचिकता वाढविण्यासाठी मी अनुकुलनावरील जागतिक आयोगाला सीडीआरआय सोबत काम करण्याचे आवाहन करतो.
आणि मी आपणा सर्वांना या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आपत्ती निवारक पायाभूत सुविधांवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रित करतो.
मान्यवर,
भारताची संस्कृती मूल्ये आपल्याला निसर्गाशी सुसंगत राहण्याचे महत्त्व शिकवतात.
आपला प्राचीन ग्रंथ यजुर्वेद आपल्याला आपले पृथ्वी सोबतचे नाते हे आई आणि मुलाप्रमाणे असल्याचे शिकवतो.
आपण जर आपल्या पृथ्वीची काळजी घेतली तर ती आपले संगोपन करेल.
हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आपली जीवनशैलीसुद्धा या आदर्शाशी अनुकूल असणे आवश्यक आहे.
या भावनेने आपण पुढे गेले पाहिजे.
धन्यवाद !