PM Modi, PM Key recognize need for greater economic engagement to effectively respond to growing uncertainties in global economy
Food processing, dairy, agriculture & related areas in their supply chain are areas of particular potential for Ind-NZ cooperation: PM
India and New Zealand agree to work closely towards an early conclusion of balanced & mutually beneficial CECA
Ind-NZ to strengthen security & intelligence cooperation against terror & radicalization including in cyber security
Thankful for New Zealand’s support to India joining a reformed UN Security Council as a permanent member: PM Modi
New Zealand backs India’s membership of the Nuclear Suppliers Group

माननीय पंतप्रधान जॉन के,

शिष्टमंडळाचे सदस्य, प्रसार माध्यम प्रतिनिधी,

न्यूझिलंडचे पंतप्रधान के यांचे भारतात स्वागत करतांना मला अतिशय आनंद होत आहे.

महोदय, दिवाळीचा सण साजरा करणे हे न्यूझिलंड संसदेला नवीन नाही आणि आपण स्वत:ही अनेकदा या उत्सवात सहभागी झाले आहात, असे मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळी सणाच्या दिवसांमध्येच आपले भारतात स्वागत करतांना मला मन:पूर्वक आनंद होत आहे.

मित्रांनो, यापूर्वी अनेक बहुपक्षीय संमेल्लनात पंतप्रधान की आणि माझी परस्पर भेट झाली आहे. आज भारतात द्विपक्षीय भेटीसाठी आलेल्या आदरणीय की यांचे स्वागत करायची संधी मिळणे, हा माझा बहुमान आहे.

आता थोडयाच वेळात रांची येथे आमचे क्रिकेट संघ चौथ्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी मैदानात उतरतील. अनेक अर्थानी आमच्या द्विपक्षीय संबंधाच्या प्रगतीबाबत क्रिकेटमधील संज्ञा चपखल बसतात असे मला वाटते, आमच्या संबंधांबाबत आम्ही क्षेत्र रक्षणाच्या भूमिकेमधून नव्या दमाने फटकेबाजी करण्यासाठी मैदानात उतरलो आहे. संरक्षणात्मक खेळापासून सुरुवात करुन आता आक्रमक फटकेबाजीकडे वळलो आहे.

मित्रांनो,

आमचे द्विपक्षीय संबंध आणि बहुपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्दयांबाबत पंतप्रधान की आणि मी सविस्तर आणि सफल चर्चा केली आहे.

आमच्या संभाषणात प्रामुख्याने व्यापार आणि गुंतवणूक संबंधांमध्ये प्रामुख्याने चर्चा झाली. जागतिक अर्थकारणातील वाढत्या अनिश्चिततेला प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी मोठया आर्थिक सहभागाची गरज दोन्ही देशांनी व्यक्त केली. तसेच उद्योगाचा आणि व्यावसायिक संबंधांचा विस्तार याला आमच्या भागिदारीत सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत सहमती झाली. भारताच्या विकास गाथेत सहभागी होण्यासाठी गुंतवणूक संधीच्या उपलब्धतेचा अंदाज पंतप्रधान के यांच्यासोबत असणाऱ्या शिष्टमंडळाला नक्कीच येईल असा विश्वास मला वाटतो. या परस्पर संवादातून दोन्ही देशांमधील व्यावसायिक भागीदारीही निर्माण होईल. अन्नप्रक्रिया दुग्ध व्यवसाय, कृषी आणि संबंधित क्षेत्रांसंबंधात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृध्दिंगत होईल, अशी मला आशा वाटते.. या क्षेत्रांमध्ये न्यूझिलंडची क्षमता आणि भारताच्या मोठया तंत्रज्ञानविषयक आवश्यकता यांची भागीदारी दोन्ही देशातील समाजासाठी लाभदायक ठरेल.

दोन्ही अर्थव्यवस्था आणि समाजामध्ये कुशल व्यावसायिकांसह अधिक चांगल्या उद्योग जोडणीला दोन्ही सरकारने प्रोत्साहन देण्याबाबतही आम्ही सहमत आहोत. या संदर्भात संतुलित आणि दोन्ही पक्षांना लाभधारक असा एकात्मिक आर्थिक सहकार्य करार करण्यासाठी कार्यरत राहण्याबाबतही आमच्यात सहमती झाली आहे.

मित्रांनो,

प्रभावी द्विपक्षीय संबंधांबरोबरच जागतिक पातळीवरही आमच्यात नजिकचे सहकार्य निर्माण झाले आहे. प्रादेशिक पातळीवर पूर्व आशिया संमेलन प्रक्रियेसह इतर बाबींविषयी सहकार्य वाढविण्याबाबत आमच्यात सहमती झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणणे हे दोन्ही देशांचे प्राधान्य आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी आम्‍ही न्यूझिलंडचे आभारी आहोत. पॅसिफिक बेटांवरील देशांच्या विकासासाठीच्या प्रयत्नांमध्ये योगदान देतांना परस्परांच्या प्रयत्नांना पूरक ठरण्यासाठी आम्ही न्यूझिलंडबरोबर सातत्याने संपर्कात आहोत.

अण्वस्त्र पुरवठा गटात भारताचे सदस्यत्व विचारात घेण्यासाठीच्या न्यूझिलंडच्या भूमिकेबद्दलही पंतप्रधान के यांचा मी आभारी आहे.

मित्रांनो,

जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने दहशतवाद हे आज घडीला सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाच्या आर्थिक, वस्तूविषयक आणि माहिती जालाचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. दहशतवादाचा हा धोका कोणत्याही भौगोलिक मर्यादांपुरता मर्यादित नाही. मानवतेवर विश्वास असणाऱ्या देशांनी या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी परस्पर समन्वयाने कृती आणि धोरणे निश्चित केली पाहिजेत.

सायबर सुरक्षेसह दहशतवादाविरोधात सुरक्षाविषयक सहकार्य वाढविण्याबाबत पंतप्रधान की आणि मी सहमत आहोत.

मित्रांनो,

जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने दहशतवाद हे आज घडीला सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाच्या आर्थिक, वस्तूविषयक आणि माहिती जालाचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. दहशतवादाचा हा धोका कोणत्याही भौगोलिक मर्यादांपुरता मर्यादित नाही. मानवतेवर विश्वास असणाऱ्या देशांनी या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी परस्पर समन्वयाने कृती आणि धोरणे निश्चित केली पाहिजेत.

सायबर सुरक्षेसह दहशतवादाविरोधात सुरक्षाविषयक सहकार्य वाढविण्याबाबत पंतप्रधान की आणि मी सहमत आहोत.

महोदय,

न्यूझिलंडच्या नागरिकांनी आपल्या नेतृत्वावर वेळोवेळी विश्वास दाखवला आहे आणि त्याचे कारण मला समजू शकते.
आपले द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठीची आणि आपल्या देशांमधील नागरिकांमध्ये मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठीची आपली वचनबध्दता यासाठी मी आपला आभारी आहे.

आपले आणि आपल्या शिष्टमंडळाचे मी पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत करतो आणि तुमची भारत भेट यशस्वी ठरेल अशी सदिच्छा व्यक्त करतो.

मन:पूर्वक आभार.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22, 2024
PM to interact with prominent leaders from the Christian community including Cardinals and Bishops
First such instance that a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India

Prime Minister Shri Narendra Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi at 6:30 PM on 23rd December.

Prime Minister will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.

This is the first time a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India.

Catholic Bishops' Conference of India (CBCI) was established in 1944 and is the body which works closest with all the Catholics across India.