पंतप्रधान नरेंद्रमोदीयांनी आज 25 मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान केले.
पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या शौर्यातून त्यांचा दृढनिश्चिय आणि धाडसी वृत्ती दिसून येते. हा पुरस्कार मिळवणे हे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय समजू नका तर ही केवळ सुरुवात आहे असे मानून पुढे जा असा प्रोत्साहनपर सल्लाही त्यांनी मुलांना दिला.
23 जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, या दिवसाचे महत्व विशद करताना पंतप्रधानांनी मुलांना शक्य तितके वाचन करायची, विशेषत: नेते, खेळाडू आणि अन्य लोक ज्यांनी आयुष्यात भरीव कामगिरी केली आहे, अशांचे आत्मचरित्र वाचण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, शौर्य ही मनाची एक अवस्था आहे, निरोगी शरीराची मदत होते, मात्र मुख्य शक्ती मनाची असते. म्हणून आपण आपले मन कणखर बनवायला हवे असे ते म्हणाले. त्यांचे होत असलेले कौतुक आणि प्रसिध्दी त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी अडथळा बनू नये याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी मुलांना केले. यावेळी महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या.
भारतीय बाल कल्याण परिषदेने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार योजना सुरु केली. धाडसी कामगिरी करणाऱ्या मुलांना ओळख मिळवून देण्यासाठी इतर मुलांना त्यांचे अनुकरण करण्यासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने हे पुरस्कार सुरु करण्यात आले.
Children Honoured with National Bravery Awards 2016:
1. Bharat Award to Tarh Peeju
2. Geeta Chopra Award to Tejasweeta Pradhan & Shivani Gond