इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील दोन शिल्पांच्या प्रतिकृती भेट दिल्या. भारतातील ज्यू समुदायाच्या इतिहासातील महत्वाचे असे शिल्प समजले जाते.

हे शिल्प नवव्या-दहाव्या शतकात तयार झाले असल्याची समजूत असून त्याची प्रतिकृती तांबे या धातूने बनविण्यात आली आहे. पहिल्या प्रतिकृतीमध्ये भारतातील कोचीनी ज्यू नागरिकांच्या जीवनशैलीचे अवशेष आहेत. ज्यू नेता जोसेफ रॅबन यांना त्यावेळेचे हिंदू राजा चेरामन पेरुमल यांनी दिलेला सन्मान आणि विशेष अधिकाराचे वर्णन या प्रतिकृतींमध्ये करण्यात आले आहे. ज्यू परंपरेनुसार जोसेफ रॅबन यांना नंतरच्या काळात शिंगलीचे युवराज पद बहाल करण्यात आले. शिंगली ही जागा क्रॅन्गानोरशी समतुल्य समजली जाते. कोचीन आणि मलबार येथे विस्थापित होण्यापूर्वी अनेक वर्षे ज्यू नागरिकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोंडीचे केंद्र म्हणून क्रॅन्गानोर ओळखले जात असे. क्रॅन्गानोर किंवा शिंगलीतील माती मृत ज्यू व्यक्तीच्या थडग्यावर टाकणे पवित्र विधी मानला जात असून क्रॅन्गानोर हे दुसरे जेरुसलेम म्हणून ओळखले जाते. या शिल्पकृतीची प्रतिकृती कोचीच्या परदेसी सायनागॉग यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आली आहे.

|

दुसरी तांब्याची शिल्पकृती भारतातील ज्यू नागरिकांच्या व्यापाराचा इतिहास सांगणारी आहे. या शिल्पावर त्या काळच्या हिंदू राजांनी कोल्लमपासून पश्चिम आशिया आणि भारतीय व्यापारी संघटनांसोबत ज्यू व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी दिलेली जमिन तसेच करात दिलेल्या सवलतीचे वर्णन आहे. या पश्चिम आशियाई संघटनेमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, झोरोस्ट्रियन यांचा समावेश होता. तसेच ज्यूडीओ-पर्शियन आणि अरेबिक व पाहलवी या नागरिकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. या शिल्प कृतींवर त्यांच्या स्वाक्षऱ्या दिसतात. केरळच्या मलनकारा मार थॉमा सिरियन चर्चच्या मदतीने या शिल्पकृतींची प्रतिकृती तयार करणे शक्य झाले.

|

याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी नेत्यनाहू यांना थोरा स्क्रोल हेही भेट दिले. केरळच्या परदेशी ज्यू समुदायाने हे स्क्रोल दान केले आहे. हजारो वर्षांपूर्वीचे हे हस्तलिखित असून ते 1568 साली बांधल्या गेलेल्या कोची येथील परदेशी सायनागॉगला अर्पण करण्यात आले आहे. एका लाकडी पाटीवर हे थोरा लावण्यात आले असून ते रुपेरी कागद असलेल्या लाकडी पेटीत ठेवण्यात आले आहे. दक्षिण भारतातल्या सजावट रचनेनुसार या थोराची सजावट करण्यात आली आहे.

|

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Explained: How PM Narendra Modi's Khelo India Games programme serve as launchpad of Indian sporting future

Media Coverage

Explained: How PM Narendra Modi's Khelo India Games programme serve as launchpad of Indian sporting future
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM condoles the passing of Shri Shivanand Baba
May 04, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing of Shri Shivanand Baba, a yoga practitioner and resident of Kashi.

He wrote in a post on X:

“योग साधक और काशी निवासी शिवानंद बाबा जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। योग और साधना को समर्पित उनका जीवन देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा। योग के जरिए समाज की सेवा के लिए उन्हें पद्मश्री से सम्मानित भी किया गया था।

शिवानंद बाबा का शिवलोक प्रयाण हम सब काशीवासियों और उनसे प्रेरणा लेने वाले करोड़ों लोगों के लिए अपूरणीय क्षति है। मैं इस दुःख की घड़ी में उन्हें श्रद्धांजलि देता हूं।”